Abu Qatal लष्कर -ए तोएबाचा दहशतवादी अबू कताल याला १६ मार्च २०२५ पाकिस्तानातील झेलममध्ये अज्ञात व्यक्तींना ठार मारले. घटनेच्या वेळी अबू कटालवर सुरक्षा रक्षकासोबत जात होता, तेव्हा काही लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी १५-२० राऊंड गोळीबार केली असल्याची धक्कादायक घटना घडली.या हल्ल्यात त्याच्यासोबत त्याचा रक्षकही मारला गेला आणि तो स्वत:ही जागीच मरण पावला गेला आहे.
Read More
Javed Munshi arrested पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन २०११ मध्ये जम्मू-काश्मीर येथे मौलानाच्या हत्येप्रकरणी मोस्ट वाँटेड असलेल्या जावेद मुन्शी या दहशतवाद्याला पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग परिसरातून अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर आणि प.बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली आहे.
दक्षिण भारतामध्ये विशेषत: बेंगळुरू दहशतवादाला खतपाणी घालणारा कुख्यात दहशतवादी सलमान रेहमान खान याला रवांडामध्ये अटक करण्यात भारताला यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सहकार्याने गुरुवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी इंटरपोल चॅनेलद्वारे रवांडा येथून दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांसाठी लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता सलमान रहमान खान याचे प्रत्यार्पण करण्यात भारताला यश आले आहे.
पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तींकडून वाँटेड दहशतवाद्यांच्या गूढ रित्या हत्येची मालिका सुरूच आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तय्यबा (एलईटी) च्या आणखी एक दहशतवादी हबीबुल्ला याची गोळ्या घालून हत्या केली. हा दहशतवादी हबीबुल्ला खान बाबा या नावानेही ओळखला जात होता. खैबर पख्तुनख्वा विभागातील टँक जिल्ह्यात त्यांची हत्या करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत धोरणामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात देशाने मोठी मजल मारली आहे. एकेकाळी संरक्षण उत्पादनांचा आयातदार असणारा भारत आज मोठा निर्यातक बनला आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तवांग येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करताना केले.
पाकिस्तानमध्ये लपलेला भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी मारला गेला आहे. या दहशतवाद्याचे नाव दाऊद मलिक असल्याचे सांगितले जात असून तो 'जैश-ए-मोहम्मद' या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा आहे. 'जैश-ए-मोहम्मद' व्यतिरिक्त दाऊद मलिक हा लष्कर-ए-जब्बारचा संस्थापकही होता. त्याचा लष्कर-ए-झांगवीशीही संबंध होता.
पंजाब पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधून दोन जणांना अटक करून लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलला उध्वस्त केले आहे. यावेळी दोन संशयितांकडून दोन आयईडी, दोन हातबॉम्ब, एक पिस्तूल, दोन मॅगझिन, २४ काडतुसे, एक टायमर स्विच, आठ डिटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत.
आपल्या ७०० नागरिकांच्या मृत्यूनंतर इस्रायलने हमासवर जोरदार हल्ल्याची तयारी केली आहे. इस्रायलने गाझा सीमेजवळ १ लाख सैनिक तैनात केले आहे. इस्रायली सैन्याचा गाझामध्ये प्रवेश करून हमासच्या दहशतवाद्यांची शिकार करण्याचा इरादा आहे. इस्रायलने आपल्या राखीव सैनिकांना हमाससोबतच्या युद्धासाठी आघाडीवर बोलावले आहे. भविष्यात कधीही हल्ला करण्याचा विचार करू नये म्हणून इस्रायलने हमासच्या लष्कराला पूर्णपणे नेस्तनाबूत करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, हमासवर जमिनीवर कारवाई होण्याची भीती असताना लेबनॉनच्या हिजबुल्लाहने इस्
सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे अचानक ढगफुटी होऊन तिस्ता नदीला पूर आला आहे. यामध्ये तिथे असलेला लष्कराचा कॅम्प वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच २३ सैनिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
केवळ पाकिस्तानच नव्हे, तर चीनलाही दहशतवाद्यांचा तितकाच कळवळा आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. नुकतेच कुख्यात दहशतवादी साजिद मीर याला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्रात आपला विशेषाधिकार वापरुन फेटाळून लावला. त्यानिमित्ताने या साजिद मीरची दहशतवादी पार्श्वभूमी, चीनकडून होणारी दहशतवाद्यांची पाठराखण आणि चीनचा इस्लामविरोध यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
दहशतवादावर चीनचा नवा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावाला चीनने आडकाठी आणली आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. चीनने यापूर्वी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावही रोखला आहे.
भारतातील २६/११ च्या हल्ल्यात सामील असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव रोखला असून भारताने त्यावर जोरदार टिका करून संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी लढ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मुंबई : २६/११ चा दहशतवादी हल्ला अजूनही मुंबईकर विसरु शकलेले नाहीत. या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. ही ट्रेनिंग देणारी व्यक्ती लष्कर ए तोयबाचा कमांडर अब्दुल सलाम भुट्टावी होती. याच भुट्टावीचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. कमांडर भुट्टावी हा पाकिस्तानात कैदेत होता. तेथे शिक्षा भोगत असताना त्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यु झाला. भुट्टावीला संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१२ साली दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तसेच, त्याला २०२० मध्ये दहशतवाद्
भारत सरकारच्या प्रतिनिधीने अधिकृतपणे एवढंच म्हटलं की, हा सैनिकी हल्ला नसून ‘जैश-ए-मुहम्मद’ या अतिरेकी संघटनेच्या छावणीवर केलेला हल्ला होता. म्हणजे हैदराबादवर हल्ला करताना सरदार पटेलांनी कशी भूमिका घेतली होती की, ‘ही लष्करी कारवाई नसून पोलीस अॅक्शन आहे.’ तसंच काहीसं!
जम्मू – काश्मीरच्या राजकारणामध्ये नवी सुरुवात करणारे काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गलाम नबी आझाद यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे.
भारतच्या 'इंटेलिजन्स ब्युरो'ने दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनापूर्वी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि इतर इस्लामवादी गटांद्वारे संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अलर्ट जारी केला आहे. 'आयबी'च्या दहा पानांच्या अहवालात एलईटी, जेईएम आणि इतर कट्टरपंथी गटांकडून धोका असल्याचे म्हटले आहे. दि. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनापूर्वी लाल किल्ल्यावर प्रवेशाचे कठोर नियम लागू करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना रविवारी गावकर्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
काश्मिरी अभिनेत्री अमरीना भटची हत्या करणाऱ्या एलईटीच्या दोन दहशतवाद्यांनी चकमकीत ठार मारण्यात आले आहे. आज दि. 27 रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काश्मिरी अभिनेत्री आणि गायिकेची हत्या करणाऱ्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दोन दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार केले. या दाध्शात्वाद्यानी बुधवारी अम्रीना भट्ट यांची हत्या केली होती.
मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात इस्लामी दहशतवाद्यांचे बळी ठरलेले काश्मिरी हिंदू राहुल भट यांच्या पार्थिवावर जम्मूमध्ये शुक्रवारी मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुडगाव येथे महसूल खात्यात काम करणाऱ्या राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची गुरुवारी दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली
केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी (७ फेब्रुवारी २०२२) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिली. एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लष्करातील अनेक अधिकार्यांना अटक करावी, अशी तक्रार पाकिस्तानच्या जिया मुस्तफाने युनायटेड किंग्डमच्या पोलिसांकडे नुकतीच केली, तीही ब्रिटनमध्ये असलेल्या एका कायद्याच्या आधारे! पाकिस्तानी सरकारच्या मते, जिया हा काश्मीरमुक्तीमधील स्वातंत्र्यसैनिक! पण, सत्य हेच आहे की, जिया हा पाकिस्तानी असून तो ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आहे. त्याने २४ काश्मिरी पंडितांची क्रूरपणे हत्या केली होती. काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुन्हा अमलात आणावे, अशीही जियाची मागणी. आपल्या द
मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात सुरक्षा दलांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला
सध्याची परिस्थिती पंडितांच्या पुनरागमनासाठी योग्य नसल्याचे, दहशतवाद्यांना पंडितांच्या मनात भीती निर्माण करायला लावणारे विधान फारुख अब्दुल्लांनी केले होते. यामुळे दहशतवाद्यांकडून परिस्थिती बिघडवण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले जाऊ शकतात. पण, अमित शाह यांनी आपल्या कृती आणि उक्तीतून, आपण अशा प्रयत्नाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज असल्याचेच दाखवून दिले.
स्वातंत्र्य दिनापूर्वी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, नवीन इंटेल इनपुट्समधून असे उघड झाले आहे की पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी सुरक्षा आस्थापना, फॉरवर्ड पोस्ट आणि देशात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवण्याची विस्तृत योजना आखली आहे.
नाशिक येथील मिलिटरी स्टेशनमुळे लष्कर हद्दीलगतच्या शून्य ते ५०० मीटर अंतर परिसरातील प्लॉटवरील बांधकामाबाबत प्रशासनाने निर्बंध घातल्याने प्लॉटधारक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नाशिक स्टेशनचा असंवेदनशील स्टेशनच्या यादीत समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी खा. हेमंत गोडसे आणि देवळाली ‘कँटोनमेंट बोर्डा’चे माजी उपाध्यक्ष व वॉर्ड क्र. ७ चे विद्यमान नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे भेट घेऊन येथील प्लॉटधारकांना दिलासा देण्यासाठी नाशिक लष्कर स्टेशनचा असंवे
जम्मू – काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामध्ये लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर मुदासिर पंडितसह अन्य दोन दहशतवाद्यांना यमसदमी धाडले आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश असल्याचे काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी सांगितले आहे.
‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने १६ डिसेंबर रोजी नायजेरियाच्या उत्तरी कतसिना प्रांताच्या सरकारी शाळेवर हल्ला केला. शाळेतील ३३० विद्यार्थ्यांचे त्यांनी अपहरणही केले. ‘बोको हराम’ संघटनेचे खरे नाव आहे ‘जमात-ए-हली-सुन्ना-लिदावती-वल जिहाद.’ या संघटनेच्या नावाचा अर्थ होतो की, मोहम्मद पैगंबरांची शिकवण आणि ‘जिहादा’चे जागरण करणे, त्यांना सर्वदूर पोहोचविणे. पण, अशी घृणास्पद हिंसा करून, शाळेतल्या अजाण बालकांचे अपहरण करून, या दहशतवादी संघटनेने जगाला कोणता संदेश आणि विचार दिला आहे? हा कोणता धर्मविचार आहे? हे तर मानवतेला
पाकिस्तानमध्ये इमरान खान यांच्या नेतृत्वातील ‘पीटीआय सरकार’ आणि लष्करादरम्यान सुुरू असलेल्या कुत्सित खेळाला सर्वांसमोर आणले. सध्याच्या घडीला पाकिस्तानचे शासन मंत्रालय वा असेम्ब्ली नव्हे, तर रावळपिंडीतील जनरल हेडक्वार्टर्समधून चालवले जात आहे.
चकमकीत लष्कर -ए-तोयबाचा प्रमुख ठार
‘एफएटीएफ’ने सुचवलेल्या २७ सूत्री कार्यक्रमावर पाकिस्तानने नेमकी काय कामगिरी केली, हे जोखले जाईल. त्यात जर त्याने समाधानकारक प्रगती केलेली असेल तर पाकिस्तान स्वतःला काळ्या यादीत समाविष्ट होण्यापासून वाचवू शकेल. मात्र, तिथे सरकारने दहशतवादविरोधात काही पावले उचलली तर कट्टर दहशतवादी संघटना त्याला प्रतिक्रिया म्हणून आणखी घातक कारवायाही करू शकतात.
अमेरिकेने शुक्रवारी 'कंट्री रिपोर्ट ऑफ टेरारिज्म २०१८' या अहवालात नमूद केले कि, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनावर कारवाई करून त्यांच्या भरती प्रक्रियेवर मर्यादा आणण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
चार मोठ्या दहशतवाद्यांवर कारवाई केली. कदाचित ते एखाददुसऱ्या संघटनेवरही कारवाई करतील. अन्य देशांबरोबर आर्थिक ते व्यापारविषयक हितसंबंधांच्या दृष्टीने पाकिस्तानने असे काहीतरी करणे अथवा केल्याचा बनाव रचणे अपरिहार्य आहे.
जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांत दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात एकूण चार चकमकी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेच्या सुमारास पुन्हा शोपियान जिल्ह्यातील इमाम साहबमध्ये चकमक सुरू झाली. या ठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपले आहेत.
जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ‘लष्कर-ए-तोयबा’च्या एका दहशतवाद्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली.
या दोन दहशतवाद्यांपैकी एक तरुण हा ‘हैदर’ या सिनेमातील अभिनेता असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
वर्षभरात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची पळता भुई थोडी केली आहे. मंगळवारी काश्मिर खोऱ्यात केरन सेक्टर भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
आपल्या राष्ट्राची प्रगती व्हावी, ही प्रत्येक नागरिकाची सुप्त कामना असते. मात्र, काही नतद्रष्ट नागरिक त्याला कशी खीळ बसेल यासाठी कार्यरत असतात.
गेल्या मंगळवारी अमेरिकेने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल रेहमान अल-दाखिल याच्यासह अन्य दोघाजणांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरणाचा सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असून, त्याने बंगळुरूतून एमबीए केल्याची माहिती समोर आली आहे.
लष्कर-ए-तोयबाचे कुख्यात अतिरेकी शाकोर दार आणि अबू बकर या दोघांचाही भारतीय लष्कराने आज खात्मा केला आहे.
जम्मू-काश्मीर भारताशी जोडलेला आहे तो डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच