दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.6 इतकी मोजली गेली आहे.तीन दिवसांत भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.
Read More
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त मिळत आहे. अफगाणिस्ताननंतर उत्तर भारतात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. दरम्यान, उत्तर भारतातील दिल्ली-एनसीआर, नोएडामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दुपारी ४.०८ वाजता हे धक्के जाणवले. हरियाणातील फरिदाबाद येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.१ इतकी मोजली गेली आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये दोन आठवड्यांत भूकंपाची ही दुसरी वेळ आहे.
न्युयॉर्क : ‘पॅसिफीक’ महासागराच्या तळाशी 965 किमी लांबीच्या ‘फॉल्टलाईन’मध्ये एक छिद्र आढळले आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीवर नऊ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. हे छिद्र विनाशकारी भूकंपाची सुरुवात करू शकतं, अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या भूकंपामुळे वायव्येकडील शहरे नष्ट होण्याची भीती आहे.
न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर गुरुवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे नुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.१ होती. भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.