मराठी साहित्यामध्ये संशोधन आणि संवेदनशीलतेचा अनोखा मिलाप घडवून साहित्यनिर्मिती करणार्या ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे यांना यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
Read More
ज्यांच्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्य उजळून निघाले असे विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जन्मभूमी असणारे शिरवाडे वणी हे गाव ' कवितांचे गाव ' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी शालेय शिक्
राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्यादेखील उंचावते आहे. आर्थिक परिस्थिती नसताना पालक आपल्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. यामागील कारणांचा शोध घेतला असता, भाषेत उदरनिर्वाहाची असणारी क्षमता, भाषेमुळे मिळणारी प्रतिष्ठा या गोष्टी कारणीभूत आहेत. नोकरी मिळण्याची क्षमता एखाद्या भाषेच्या अंगी कशी येते, याचा शोध घेऊन मराठीला त्यादिशेने पावले टाकण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यानंतर मराठी ही शासकीय भाषा म्हणून स्वीकारली गेली असली, तरी तिचा प्रभावी वापर संपूर्णपणे रूढ झालेला नाही. इंग्रजी शब्दप्रयोग अजूनही सरकारी लिखाणात आणि संभाषणात सहजगत्या घुसखोरी करताना दिसतात. उदाहरणार्थ, मीटिंग, डिपार्टमेंट, ऑफिस, अटेन्डन्स, सर्क्युलर असे शब्द सहज वापरले जातात, जे बैठक, विभाग, कार्यालय, हजेरी, परिपत्रक असे सहजपणे मराठीत बदलता येऊ शकतात.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी आली आणि समस्त मराठी जनता सुखावून गेली. तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच ही गोष्ट साजरी केली. मात्र, अभिजात दर्जा मिळल्यानंतर नेमकी कोणती गोष्ट घडणार आहे, याचा विचार फार कमी तरुणांनी केला असेल, असे आपल्या आसपासचे वातावरण पाहिल्यावर लक्षात येते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. परंतु, मराठी भाषेच्या श्रेष्ठत्वासाठी काम करताना सर्व क्षेत्रांत ती उपयोगांत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय राज्यघटनेनुसार, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळणे हा एक मूलभूत हक्क आहे. परंतु, न्यायालयीन प्रक्रिया ही बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत चालत असल्याने, अनेक मराठी भाषकांना न्याय मिळवताना अडचणी येतात आणि भाषा म्हणून मराठी केवळ टिकवण्यासाठीच नाही, तर तिला समृद्ध करण्याच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. याच पार्श्वभूमीवर, न्यायव्यवस्
अलीकडच्या काळात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. एक प्रकाशक म्हणून माझ्यासाठीसुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठीमध्ये सकस साहित्यनिर्मिती होते. हे साहित्य वाचणारा चांगला वाचकवर्ग मराठीच्या नशिबी आहे. येणार्या काळात आपल्या अभिजात मराठीचा वाचकवर्ग वाढेल, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
विविध वस्तूंचा संग्रह करणारी जगभरात अनेक माणसे असतात. मात्र, अशा अनोख्या संग्राहकांना एकत्र आणणार्या नाशिकच्या छंदोमयी प्रसाद देशपांडे यांच्याविषयी...
कुसुमाग्रजांच्या अनेक अजरामर कलाकृतींमधील एक अविस्मरणीय कलाकृती म्हणजे 'नटसम्राट' नाटक. या नाटकात एकदा तरी अप्पासाहेब बेलवणकरांची भूमिका करावी किंवा या नाटकाचा लहानसा भाग व्हावा अशी इच्छा प्रत्येक नाट्यकर्मीला असतेच. मात्र, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना या 'नटसम्राट' नाटकात कधी काम करावेसे वाटलेच नाही. बऱ्याच वर्षांपुर्वी एका मुलाखतीत अण्णांनी अर्थात जयंत सावरकर यांनी याचा खुलासा केला. सोमवार दि. २३ जुलै रोजी जयंत सावरकर यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. २५ जुलै रोजी ठाण्यात अ
बारावीमध्ये तीनदा अपयशी ठरल्यानंतरही ते खचले नाही. नव्या उमेदीने उभे राहत ते रंगभूमीच्या सेवेसह रिक्षाचालक म्हणून हजारो लोकांना वाचनाचे महत्त्व पटवून देत आहेत. जाणून घेऊया प्रशांत प्रकाश कांबळे यांच्याविषयी.
पुस्तकं वाचन प्रत्येकालाच आवडत. पंरतू आज तरूणांचा वाचनाकडे कल फार कमी होताना दिसतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान द्वारे आयोजित मेडिकल कॉलेजच्या वाड्मय मंडळाच्या उद्घाटनात वाचन प्रवासावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले की, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सांगायचे की "वाचाल तर वाचाल आणि जो वाचणार नाही तो वाचणारंच नाही." त्यामुळे वाचन करणे हे फार गरजेचे आहे.
सर्जनशील शिल्पांची बोलकी अभिव्यक्ती, विविध शैली आणि माध्यमांतील सुरेख चित्राकृती आणि साथीला दिग्गज चित्र, शिल्पकारांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम असलेल्या ‘के. के. वाघ संस्थे’च्या लालित कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला.
“आशाताईंचे साहित्य निर्मळ गंगेइतकी पवित्र आहे. त्यांच्या जगण्याला जसे आध्यात्मिक अधिष्ठान आहे, तसेच त्यांच्या लिखाणातही संत वाङ्मयाचे, अध्यात्माचे भक्कम अधिष्ठान आहे. आशाताईंनी लिहिलेले साहित्य केवळ विरंगुळा म्हणून नव्हे, तर अत्यंत जबाबदारीने वाचण्याचे साहित्य आहे. वाचकांनी त्यासाठी आधी स्वत:च्या मनाची तयारी करून वाचल्यास त्याचा अर्थगर्भ समजतो. त्यासाठी भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म याची तोंडओळख वाचकाला असावी लागते, तेव्हाच आशाताईंचे साहित्य सुंदर जीवनानुभूती देते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार
उद्या, सोमवार, दि. ९ ऑगस्ट. हा दिवस ‘आदिवासी/मूलनिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच दि. ९ ऑगस्ट हा दिवस भारतातील स्वातंत्र्यसंग्रामातील देखील महत्त्वाचा दिवस आहे. त्यानिमित्ताने या दोन्ही दिवसांचे महात्म्य जाणून घेऊया.
आज मराठी राजभाषा दिवस. कुसुमाग्रज, तुमच्या जयंतीने या दिवसाचा जन्म झाला. कुसुमाग्रज, तुमचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला इतके जवळचे की, आमच्या तोंडून तुम्हाला आपसूकच ‘तात्यासाहेब’ म्हणून संबोधले जाते. तात्यासाहेब, आज ‘जागतिक मराठी गौरवदिना’ला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे... बरंच काही सांगायचं आहे...तेच या पत्रातून मांडतो आहे.
आज मराठी राजभाषा दिन. कुसुमाग्रज, तुमच्या जयंतीने या दिवसाचा जन्म झाला. कुसुमाग्रज, तुमचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला इतके जवळचे की, आमच्या तोंडून तुम्हाला आपसूकच ‘तात्यासाहेब’ म्हणून संबोधले जाते. तात्यासाहेब, आज ‘जागतिक मराठी गौरवदिना’ला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे... बरंच काही सांगायचं आहे...तेच या पत्रातून मांडतो आहे.
नाशिक महानगरपालिका व शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य घेत साहित्य संमेलनाचे आयोजन करून कोरोनाविषयक सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच नाशिकमध्ये होणारे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी सर्व साहित्यप्रेमी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.
दि. २६ ते २८ मार्च दरम्यान होणार्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’मध्ये आपल्या साहित्यविषयक पुस्तकांचे, ग्रंथांचे प्रकाशन मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते व्हावे, अशी अनेक लेखकांची व लेखिकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे.
नाशिक ही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी नाशिक असल्याने व ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्यासंदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात संमेलन नगरीस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केली होती.
"नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा, नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भूमिकेतून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी" असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ९४ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.
कृतिशील साहित्यिक, उत्तम कुस्तीपटू ते संवेदनशील समाजशील माणूस असे हे डॉ. भास्कर म्हरसाळे म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व...
मराठी अभिमान गीत, मराठी कविता ऐकायला मिळणार!
मराठी भाषा समृद्ध आहेच. तिचा जागर तिच्यातील गुणवैशिष्ट्यांनी होत असतोच. मात्र, गरज आहे ती मराठी जिवंत ठेवण्याची. त्यामुळे आपण केवळ दिन साजरा न करता मराठी जगविण्याचा निर्धार यानिमित्ताने करणे आवश्यक आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची आज जयंती. हा दिवस महाराष्ट्र सरकारतर्फे ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ही खर्या अर्थाने कुसुमाग्रजांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच आहे.
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात ‘कुसुमाग्रज’ म्हणजे साहित्यिक विश्वातले एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्या काव्याने पिढ्या घडल्या. मराठी साहित्य प्रांगणात अखंड तेजस्वी तारा म्हणून कुसुमाग्रजांचे स्थान अढळ आहे. त्यामुळेच की काय, त्यांचे नाव एका तार्यालाही दिले आहे. आज त्यांचा जन्मदिवस आणि मराठी राजभाषा दिनही... त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यसाहित्याचे हे रसग्रहण...
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आता लंडन शहरातदेखील सुरू करण्यात येणार आहे. ‘
‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत आहे. वाचकांना घरापर्यंत पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
२७ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्य शासनाच्यावतीने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगरभवन मुंबई येथे दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.