मुंबई : राजकारणात ’शब्द’ पाळण्यासाठी परिचित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Fadanvis ) यांनी कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेला शब्दही पाळला आहे. पीडितेच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन देवाभाऊ रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी तिच्या भगिनीच्या विवाहाला पोहचले. या घटनेला आठ वर्षे उलटूनदेखील देवाभाऊंनी पीडित कुटुंबीयांची साथ सोडलेली नाही, हे विशेष.
Read More
( Kopri-Pachpakhadi )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ३ लाख, ३८ हजार, ३२० मतदार आहेत. मागील २०१९ ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदार संघात जेमतेम ५० ते ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची जालन्याच्या अंतरवली सराटीत विराट सभा होत आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर सभेसाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. १५० एकर मैदानावर ही सभा होत आहे. यावेळी सभेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "शांततेतल्या आंदोलनानेच मराठा समाजाला एकजुट केलं आहे. शांततेत प्रचंड शक्ती आहे. या पूढचेही आंदोलन हे मराठा समाज शांतीपूर्ण पद्धतीने करेल. २२ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार." असे जरांगे पाटील म्हणाले.
मध्यप्रदेश इंदौरमध्ये सायम कुरेशी याने तीन वर्षापूर्वी मोबाईलवरुन कोपरगावात एका वास वर्षीय तरुणीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एका वर्षाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपी सायम कुरेशी याने पीडित तरुणी आणि तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची घमकी दिली. तरुणीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला असता आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली.
देशातील पहिले वनवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले आहे. पहिले वनवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौरऊर्जेचावापर केला जात असून, ग्रामपंचायतीतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी झालेल्या सोडतीत प्रस्थापितांचे गड शाबुत राहिले आहेत. कोपरी, वागळे प्रभागात ५० टक्के महिलाना संधी असली तरी उर्वरित ठाण्यात मात्र महिलाराज साठी मैदान मोकळे झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीत चार सदस्यीय ३३ प्रभागातील १३१ जागांपैकी ६६ जागा महिलांसाठी आरक्षित असतानाही तब्बल ७२ जणी निवडुन आल्या होत्या.२०२२ मध्ये त्रिसदस्यीय ४७ प्रभागातुन १४२ जागांपैकी ७१ जागा महिलासाठी आरक्षित आहेत.
मंगळवार दि. २४ मे रोजी मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबई मध्ये कोपरखैरणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब रासायनिक कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशेच्या मार्गिका तूर्त सुरू झाल्याने आठवड्याभरात जुन्या रेल्वे पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक होणार असल्यामुळे कोपरी पुलाच्या कोंडीत वाहनांना अडकून पडावे लागण्याची शक्यता आहे.
कोपर पूलाचे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालवधी लागला आहे. या कामासाठी सगळ्य़ांनीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे पूलाच्या कामाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देऊन चालणार नाही. शिवसेनेच्या लोकांनी केलेली मागणी जनहिताची आणि भाजपाने केलेली मागणी विकास कामात अडथळा असा प्रतिप्रश्न भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी शिवसेनेला केला आहे.
शहरालगतच्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने अखेर बुधवार, दि. ३० जून रोजी मंजुरी दिली. या २३ गावांच्या समावेशामुळे महापालिकेची हद्द ५१६ चौरस किलोमीटर झाली असून पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे.
रिलायन्स हॉस्पिटल नवी मुंबईने ०-१८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी निःशुल्क 'हृदय तपासणी' शिबिराचे आयोजन शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी केले आहे.
बहुचर्चित कोपरी रेल्वेपुलाच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार ‘एमएमआरडीए’मार्फत कोपरी पूर्वेकडे जाणार्या रेल्वे पुलानजीक ‘रिटनिंग वॉल फाऊंडेशन’चे काम ‘एमएमआरडीए’कडून शनिवार दि. ३० जानेवारीपासून हाती घेण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच गुरुवारी पहाटे डोंबिवलीच्या कोपर रोड भागात 2 मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळला. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहत असणाऱ्या व्यक्तीमुळे इमारतीतील लोकांचा अगदी थोडक्यात जीव बचावला.
१५ मिनिटे विदुयत उपकरणे बंद ठेवून सरकारचा निषेध
संघ फक्त ठराविक लोकांचाच.... पण, संघ अमुक एक लोकांचा नाही. संघ शेतकर्यांचा कधी होता, असे प्रश्न विचारणाऱ्या मंडळींना उत्तमराव बडधे आणि त्यांचे बंधू यांचे जीवन हे एक कृतिशील उत्तर होते. बडधे घराण्याचे तिन्ही लेक संघसमर्पित जीवन जगले. आज उत्तमराव काळाच्या पडद्याआड गेले. पण, त्यांचे जीवनकार्य प्रेरणादायी आहे. उत्तमराव बडधे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे एका २६ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली आहे.
कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी घडलेल्या या बलात्कार आणि खून घटनेने संपूर्ण देश हादरला होता. १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात उघडकीस आली होती
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी विकण्याचा अनोखा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. सांडपाण्याचा वापर करण्याचा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भोपर ते कोपर रेल्वे स्थानक रस्त्यासाठी निधी देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अवघ्या १० मिनिटांत डोंबिवलीला जाता येणार आहे.
कोपरखैरणे येथे बालाजी मल्टिप्लेक्ससमोर सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा झोपड्यांवर कारवाई केल्याने संतप्त जमावाने पोलीस आणि अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक केली.