Kirit Somaiya भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारने वक्फनंतर आता मशिदींवरील भोंग्यावरून लक्ष्य केले आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्यावर भाष्य केले होते. ठरवून दिलेल्या नियमालीचे पालन करावे असा दावा फडणवीसांनी केला होता. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत भोंगे लावता येणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील भोंग्यांवर बंदी आणली आहे. अशातच आता राज्यातील मशिदींवर सुरू राहणाऱ्या भोंग्यांविरोधात राज्य सराकार पाऊल उचलत आहेत. क
Read More
अधिकार नसताना नायब तहसिलदारांकडून वाटप करण्यात आलेले तब्बल ४० हजार जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार, १७ मार्च रोजी महसूल विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील आदेश दिलेत.
सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली.
सुषमा स्वराज या अभ्यासू, व्यासंगी आणि प्रभावी नेत्या होत्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी केले.
मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला दिल्याचा प्रकार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता. दरम्यान, यासंदर्भात आता ४ हजार अर्जदारांची चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.
बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना देण्यात आलेल्या जन्म दाखला घोटाळ्याचे प्रकरण आता अकोल्यापर्यंत पोहोचले आहे. अकोला जिल्ह्यात १५ हजार ८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई : सैफ अली खानवर ( Saif Ali Khan ) हल्ला केलेल्या आरोपीला दि. १८ जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले. यावर माजी खासदार, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले. आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निदर्शनास आले असून यावर पोलिस अधिक चौकशी करणार आहेत.
Vote jihad भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव व्होट जिहाद फंडिंग घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखेत सिराज मोहम्मदची ५ बेनामी खाती सापडली. यामध्ये ५३ कोटी बेनामी व्यवहार केल्याप्रकरणाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस आणि एटीएसला महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकावरही कारवाई करण्याची विनंती केली होती, असे किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
vote jihad भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्होट जिहाद करत काही कट्टरपंथींच्या बँक खात्यात ८०० कोटी रूपये हस्तांतरित केले जात असल्याची माहिती दिली आहे. मालेगाव येथे व्होट जिहादच्या प्रकरणाची पोलखोल करत याप्रकरणात लक्ष घातले. त्यांनी X ट्विटवर याप्रकरणाची माहिती शेअर केली आहे. यामध्ये एक-दोन नाहीतर तब्बल २१ बँक खात्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई : घाटकोपरमधील भीमनगर परिसरात ‘लव्ह जिहाद’चा ( Love Jihad ) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलिसांकडे आरोपीसह त्यांच्या परिवारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : मालेगावमधील १२ तरुणांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, हा पैसा ‘उलेमा बोर्ड’ आणि ‘मराठी मुस्लीम सेवा संघा’च्या खात्यात गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Vote Jihad) शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
(Kirit Somaiya) सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
मेधा किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित प्रकरणात संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ते दोषी आढळले आहेत. माझगाव कोर्टाने हा निर्णय दिला.
वोट जिहादसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. यावर आता सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले.
मी मासांहार सोडलाय. तुरुंगात जाण्यासाठी योग्य कपडे खरेदी केलेत. ईडीने माझे खाते गोठवण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या बचतीबद्दल माझ्या कुटुंबाला सांगितले आहे. त्यामुळे बहुतेक वेळा, तुरुंगात जाण्याची भीती तुरुंगापेक्षा जास्त असते. मुळात आर्थिक अनियमितता प्रत्येक गोष्टीत असते. पण त्याला आर्थिक गुन्ह्याचे रुप देऊ नये, असे विधान ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांनी ईडीने पाठवलेल्या समन्ससंबधी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर केलयं. दरम्यान मुंबई महानगरपालिकेत झालेल्या खिचडी घोटाळ्यात नवा ट्विस्ट आलेला आहे. संजय निरुपम यां
अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी दि. २१ मार्च रोजी रात्री २ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक भुमिका घेतली. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. त्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुऊन घेत,सरकारवर हल्लाबोल केला. पण आता राऊतांवरच अशाच एका घोटाळ्याशी संबधी आरोप होऊ लागलेत. त्यानुसार, महाराष्ट्रातील काही प्रमुख घोटाळ्यांवर पुन्हा चर्चा होऊ लागली. त्यात दिल्ली मद्य घोटाळ्यासारखाचं एक घोटाळा महाराष्ट्र
लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येकासाठी कशाप्रकारे संघर्षांचा काळ होता. पंरतु यावेळी कामगार आणि गरीबांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत ही काही लोकांनी घोटाळा केला. आणि गरीब कामगारांसोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या मित्रपरिवाराने ही लाखो रुपयांची खिचडी खाल्ली. असा आरोप विरोधकांकडून सध्या केला जातोय. त्यातच आता कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे धाकटे बंधू संदिप राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे संदिप राऊत यांच्यावर कोणत्या घोटाळ्याचे आरोप आहेत? या घोटाळ्या प्रकरणी कोणाची नावे पुढे आली आहेत?
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ही धाड पडली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि इतर चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. याशिवाय रवींद्र वायकर यांच्या भागीदारांच्या घरावरही धाड पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्या घरी ईडीची धाड पडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक खात्यांसह शहरातील १२.२ कोटी रुपयांच्या तीन फ्लॅटची मालमत्ता जप्त केली आहे. सुजित पाटकर कोविड फील्ड हॉस्पीटल घोटाळ्यातील सहआरोपी आहेत.
गोरगरीब कामगार जनतेला कोविड काळात पोटाची खळगी भागवता यावी यासाठी मुंबई महापालिकेने खिचडी वाटप निर्णय घेतला होता. मात्र, यातूनही गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिसकावत स्वतःची तुंबडी भरवण्याचे काम करण्यात आले असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पालिका प्रशासन आणि संबंधितांवर केला आहे. विधानसभेच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते तेव्हा त्यांनी हा आरोप केला आहे.
आम्ही मुलूंडचं मुंब्रा होऊ देणार नाही! PAP हटाव मुलूंड बचाव! मुलूंडकरांचा एकच नारा PAP ला नाही थारा, या आशयाचे फलक घेऊन नारेबाजी करत काही नागरिक रविवार, दि. १० डिसेंबर रोजी मुलूंड, पूर्व येथे जमले होते. मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारने २२ मार्च २०२२ रोजी ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी कंपनीचे चोरडिया आणि स्वास कन्स्ट्रक्शन या कंपनीला मुलुंड येथील केळकर कॉलेजच्या जवळ असणाऱ्या एका जागेवर ७४३९ सदनिका बांधण्याचे कंत्राट देण्यात आलं. मात्र या प्रकल्पातून एक मोठा घोटाळा घडल्याचे आरोप तिथल्या स्थानिक नागरीकांनी, रहिवा
तत्कालीन ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल १८ हजार ६७५ कोटींचा 'क्रेडिट नोट' घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी गुरुवारी केला. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना सोमैया म्हणाले, तत्कालीन ठाकरे सरकार आणि मुंबई पालिकेने ३५ हजार प्रकल्प बधितांच्या पुनर्वसनासाठी दोन विकासकांना कंत्राट देण्याची प्रक्रिया २०२१ मध्ये सुरू केली. मार्च २०२२ मध्ये चोरडिया आणि बलवा बिल्डर्सना अशी चार कंत्राटे देण्यात आली. शिवाय, जुहू आणि मालाडच्या दोन करारां
मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिकेतर्फे ७४३९ प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधली जात आहेत. मात्र या प्रकल्पग्रस्तांसाठींच्या घरांच्या बांधणीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच किरीट सोमय्यांच्या नेतृत्त्वात भाजपचे कार्यकर्ते, नागरिक त्याबाबत जनजागृती मोहीम सुरू करीत आहेत.त्यांची माहिती सोमय्यांनी समाजमाध्यमांवर दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तर्फे नमो रमो नवरात्र उत्सव आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रासरंग नवरात्र उत्सवात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी हजेरी लावत गरब्याच्या तालावर फेर धरला. डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात नमो रमो नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील आठ ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्बो कोविड केंद्राच्या खिचडी पुरवठादारांशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखा, ईडीच्या तपासानंतर आता आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. कोविड काळातील बीएमसीकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या संपूर्ण प्रकारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, पाटकर यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. वरळी आणि दहिसर कोविड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसंदर्भात पाटकर यांनी जयस्वाल यांची भेट घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोेपपत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याचे बार, बिस्किटे आणि नाणी वाटण्यात आली, असा दावा ईडीनं केला आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्
कोविड काळात गरजूंना वाटलेल्या खिचडीत घोटाळा झाल्याचे पुरावे भाजपा नेते किरीट सोमय्यांनी सादर केले. 4 कोटी खिचडी पाकीट साठी ₹132 कोटींचे पेमेंट मुंबई महापालिकेने 50 कॉन्ट्रॅक्टरना केले, 4 कोटी खिचडी पॅकेट आले मात्र त्याचे कोणतेही पुरावे, कागद पत्र चलन, खिचडीच्या नोंदी नव्हत्या. मग पैसे दिले कसे, असा सवाल उपस्थित करून यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेन भादवि कलम 406, 409, 420 आणि 120 ब तसेच 34 प्रमाणे हा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला आहे.
स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून ८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’ कंपनीचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घोटाळ्यावरून सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या मित्र-परिवाराची ही कंपनी असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्षादेश आल्यास आपण तुरुंगवारीही करायला तयार आहोत, तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षनेतृत्वही इच्छुक आहे, अशी पुडी राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत सोडली. मात्र, ज्या मतादार ईशान्य मुंबईतील मतदार संघावर संजय राऊत दावा करत आहेत तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि भाजपची बूथरचना यांचा विचार करता हा किल्ला अभ्येद्य आहे. 5,14,599 इतक्या मतांसह विजय मिळवला. संजय दिना पाटलांना २
मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा आवाज उठवला असून यासंदर्भात ते म्हणाले, पालिकेतील खिचडी घोटाळा हा जवळपास १६० कोटी रुपयांचा असल्याचे सोमय्या म्हणाले, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा खा. संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोविड काळातील खिचडी घोटाळा संजय राऊत यांनी यांसदर्भातली कंत्राटे मिळवून आपल्या मित्रपरिवाराचा फायदा करून दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
कोवि़ड काळात झालेले घोटाळा आता उघड होत आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोविड काळातील उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केलेल्या खिचडी घोटाळ्याची तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी ही तक्रार पोलिस, ईडी, आयकर, बीएमसीकडे केल्याची माहिती आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगार आणि गरीब लोकांना खिचडीचे वाटप केले जात होते. त्यात ही घोटाळा झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या नंतर खिचडी घोटाळ्यात कोणावर गुन्हा दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या एका कथित व्हिडीओवरून विरोधी पक्षातर्फे धुमाकूळ घातला जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले असून विरोधकांनी या प्रकरणी आरोपांची राळ उठवली आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून 'त्या' कथित व्हिडीओ प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुंबई महापालिकेत ४ हजार ९०० कोटींचा कोविड घोटाळा झाल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. मी आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये ₹4,900 कोटींच्या BMC COVID फसवणुकीचे अतिरिक्त स्टेटमेंट/FIR दाखल केले. अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई लोकलमध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला जवळपास १७ वर्षे उलटून गेली असली तरी अद्याप अतिरेक्यांविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरुच आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहिम रेल्वे स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट दिली. त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली, स्मरणांजली अर्पण केली. तसेच, याप्रसंगी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींचे परिवार, सदस्य किरीट सोमय्यांसोबत उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कामाचं स्पेशल ऑडिट व्हावे,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भाजप नरिमन पॉइंट मुंबई कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. व ते बोलत होते.
उध्दव ठाकरे परिवार कॉर्लई १९ बंगलो घोटाळा प्रकरणी २०१२ ते २०१७ च्या फाईल गायब असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. अलिबाग रायगड जिल्हा परिषदेने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंबंधी FIR दाखल होणार असल्याचे ही सोमय्यांनी म्हटले आहे. यासंबंधी किरीट सोमय्यांनी ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.
मुंबई : ठाकरे आणि पाटणकर कुटुंबीयांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले असून ठाकरे आणि पाटणकर हे दोघे बिझनेस पार्टनर आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, बिझनेस पार्टनरशिप फर्म्स, रिलेशनशिप आणि मनी लॉंड्रिंगसाठी लेयर उभी करण्यात ठाकरे आणि पाटणकर कुटुंबीयांचा सहभाग असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईतील ५०० कोटींचा कथित फाईव्ह स्टार हॉटेल घोटाळा प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, यात मुंबई पालिकेचे अधिकारीही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी ब्रेकींग अपडेट; किरीट सोमय्यांनी केली अनिल परबांची पोलखोल!
१३ वर्षाच्या भांडुपच्या हिंदू मुलीचे अपहरण करणाऱ्या सैफ सलमानी परिवार वर कडक कारवाई होणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडुपच्या पीडित परिवाराला दिले. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पिडीतेच्या कुटुंबियांसह ३० मे रोजी मंत्रालयात भेट झाली.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या भूसंपादनासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. दहिसरचा १ हजार ७२२ कोटींचा भूसंपादन घोटाळाच्या विरोधात किरीट सोमय्यांनी एसीबी कार्यालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत विकासक अल्पेश अजमेरावर आरोप करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, विकासक अल्पेश अजमेरा यांनी 2 कोटीत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन घेतली, असा गंभीर आरोप भाजप किरीट सोमय्यांनी केला आहे.
मुंबई : "अनिल परबांनी १०० कोटी सोडा १००० कोटींचा दावा केला तरी कारवाई होणारच", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात अनिल परबांना जामीन देण्यात आला होता तर त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक करण्यात आली असून ते अद्यापही जेलमध्ये आहेत. किरीट सोमय्यांनी म्हटले की, साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई थांबविण्याकरिताच अनिल परबांनी कोर्टात याचिका दाखल केली. ईडी, आयकर विभागाने त्यांच्या म
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर १९ बंगल्याचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याचं चौकशीमध्ये अनेक जण आरोपी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी देखील केलेला आहे, त्याच संदर्भात काल रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावाच्या माजी सरपंच प्रसाद मिसाळ यांना ताब्यात घेतले आहे.