उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये ख्रिश्चन धर्मांतराच्या आरोपाखाली पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. सलमान आणि त्रिभुवन राम अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून बायबल आणि लाऊडस्पीकर जप्त करण्यात आला आहे. याच गावातील एका तक्रारदाराने या सर्वांवर हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. ही घटना दि. २४ सप्टेंबर रोजी घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Read More