काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री साई पल्लवी विरोधात हैद्राबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे
Read More
काश्मीरी हिंदूंवर होत असलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. मंगळवार, दि. ७ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता 'आयआयटी बी फॉर भारत'द्वारे या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत इस्लामिक जिहादींतर्फे काश्मीरी हिंदूंची भर दिवसा हत्या करण्यात आली. आयआयटी कॅम्पसमध्ये या सर्व मृतात्म्यांना सुमारे दोनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयआयटीचे आजी माजी प्राध्यापकही उपस्थित होते. काश्मिरी हिंदूंच्या हत्या प्रश्नावर त
मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात इस्लामी दहशतवाद्यांचे बळी ठरलेले काश्मिरी हिंदू राहुल भट यांच्या पार्थिवावर जम्मूमध्ये शुक्रवारी मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या गाजत असणार्या ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना आणि त्यातील दहशतवाद्यांचे क्रौर्य पुन्हा एकदा समाजात थरकाप उडवत आहे. त्यातील अनेक पात्र वास्तविक असणार्या व्यक्तींशी साध्यर्म्य साधत असल्यामुळे समाजात काश्मीरविषयी पुन्हा एकदा संवेदनशीलता वाढली आहे. चित्रपटात शारदा पंडित या हिंदू स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिला दोन तुकड्यात कापून टाकणे हे भयंकर कृत्य सुन्न करून टाकते. हे पात्र बांदीपूरच्या बारामुल्ला गिरीजा टिकू या स्त्रीवर आधारित आल्याचा दावा केला जातो आहे. या
टिपू सुलतान, अकबर, मुघल हे या कलाक्षेत्राचे प्रेरणस्रोत. यातून त्यांच्या उदारमतवादी प्रतिमा रंगविल्या गेल्या आणि निर्माणही केल्या गेल्या. गेली ५० वर्षे हे सुरूच आहे. या सगळ्याला धक्का दिला गेला तो ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने. कला, राजकारण, डाव्या विचारवंतांची काँग्रेसशी असलेली युती, हे आणि असे बरेचसे यानिमित्ताने उघड झाले आहे.
१९८२ साली आलेल्या ‘बेमिसाल’ सिनेमाने काश्मीरविषयी गैरसमज पसरविण्यात कसलीही कसर सोडली नाही. त्यात भारतातील सर्व ‘हिल स्टेशन’चा शोध इंग्रजांनी लावला आणि काश्मीरचा शोध मुघलांनी लावल्याचा जावईशोध लावण्यात आला.
इस्लामचे, कुराणचे, शरियतचे नाव घेऊन धर्मांध मुस्लिमांनी काश्मिरी हिंदूंना घरेदारे सोडून पलायनासाठी अगतिक केल्याचे, मुली-महिलांवर बलात्कार केल्याचे, विरोध करणार्यांना कापून टाकल्याचे, कीड्या-मुंगीसारखे मारुन टाकल्याचे, नरसंहार केल्याचे प्रकार घडलेच नाहीत, अशा आविर्भावात पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारजंतांची ‘द काश्मीर फाईल्स’विरोधातील मळमळ बाहेर पडत आहे.
काश्मिरी हिंदू पंडितांचा नरसंहार नाकारून भाजप आणि रा. स्व. संघाला दोष देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कॉंग्रेसवर केली टीका
“यापुढे काश्मिरी हिंदूंना त्यांच्या मायभूमीतून परागंदा व्हावे लागणार नाही,” असे आत्मविश्वासपूर्ण अभिवचन सरकार्यवाह होसबळे यांनी आपल्या भाषणातून काश्मिरी जनतेला दिले. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलत असून, तेथील हिंदू समाजाने कोणत्याही प्रकारचे भय बाळगण्याची आवश्यकता नाही, असा विश्वासच या ‘नवरोह’ महोत्सवाच्या निमित्ताने सरकार्यवाह होसबळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला, असे म्हणता येईल.
सन १९४७ साली इस्रायलने वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमचा भाग ताब्यात घेतला आणि नंतर तिथे ज्यूंच्या १४० वस्त्या स्थापन केल्या. तिथे सध्या चार लाख ज्यू राहत आहेत. तथापि, त्या वस्त्यांना पूर्वी अवैध मानले जात असे, पण नुकतेच अमेरिकेने या वस्त्या अवैध नसल्याचे म्हणत त्यांना कायदेशीर मान्यता देऊन टाकली.
ताश्कंद फाईल्सनंतर आणखी एक इन्वेस्टिगेटिव्ह चित्रपट घेऊन विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. उद्या भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि याच निमित्ताने पुढील वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट घेऊन येत असल्याचे आज अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले.
तेलासाठी अमेरिकेने कसे दहशतवादी उभे केले आणि मुसलमानांना कसे दहशतवादी बनविले गेले, यावर प्रवचन झोडणारे लोक काश्मिरी हिंदूंचे साधे स्मरणही करीत नाहीत