जंगलाशी जवळचं नातं जोपासलेल्या... चित्रकलेबरोबरच कलेच्या विविध प्रकारांमध्ये हातखंडा असलेला कलेचा उपासक, रत्नागिरी सुपुत्र स्वस्तिक गावडे यांचा हा कला जगतातील प्रवास...
Read More
ठाणे जिल्ह्यामधून मध्य रेल्वेचे लोहमार्ग जात असून त्यांचा काही भाग हा ठाणे व कल्याण तालुक्यातून खाडी क्षेत्रातून जातो. या मार्गालगत होत असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाबाबत पोलीस प्रशासनाने संबंधीत क्षेत्रामध्ये १९ नोव्हें पर्यत मनाई आदेश जारी केले आहेत.अवैध रेती उत्खनन व लोहमार्गास होत असलेल्या संभाव्य धोका लक्षात घेता अभियांत्रिक स्वरुपाच्या उपाययोजनेंतर्गत रेल्वे मार्गालगत गॅबियन बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
‘कांदळवन प्रतिष्ठान’मार्फत रत्नागिरीतील सोनगाव येथे ‘कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली आणि समितीमार्फत या गावातील लोकांना एकत्रित करून येथे ‘कांदळवन निसर्ग पर्यटन, सोनगाव‘ असे गट स्थापन करण्यात आले. त्यामुळे कांदळवनांच्या जैवविविधतेबरोबर येथे ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रमदेखील आहे. त्यानिमित्ताने सोनगावच्या जैवविविधतेचा परिचय करुन देणारा हा लेख...
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यांतील रस्त्यांची जबाबदारी नव्या महामंडळावर देण्यात येणार आहे. परिणामी खड्डेमुक्त रस्त्यांचं मिशन पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
मासे, कासवे आणि विविध प्रकारच्या जलचरांची सागरी जैवविविधतेतील भुमिका, त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख, आजच्या तिसर्या जागतिक जलचर दिनाच्या निमित्ताने...
'जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट'च्या (जेएनपीटी) अधिपत्याखालील सर्व कांदळवन जमीन वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता तथा हस्तांतरण करार मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर, २०१८ रोजी कांदळवन आच्छादित सर्व सरकारी जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र तब्बल चार वर्षानंतर मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी हे हस्तांतरण पार
कुर्ल्यातील परीघखाडी जवळील नंदादीप गार्डन शेजारी राखीव कांदळवन वृक्षांवर, तसेच मिठी नदी लागत अनधिकृत भराव टाकत असलेल्या टोळीला रंगे हाथ पकडण्यात आले आहे. या मध्ये तीन डंपर आणि एक जेसीबी-सह चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पाहणी दरम्यान कांदळवन क्षेत्रावर भराव टाकल्यामुळे कांदळवन क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील कांदळवन असलेल्या आणि कांदळवन नसलेल्या क्षेत्रावर निसर्ग वादळाचा झालेला परिणामांचा अभ्यास नुकताच प्रकाशित करण्यात आला. मंगळवारी आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते प्रकाशित करण्यात आला.
मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातील मोक्याच्या जागेवरील कांदळवन आच्छादित जमीन वन कायद्याअंतर्गत अधिसूचित करण्यात आली आहे. याअंतर्गत जवळपास १४६३.२६४६ हेक्टर कांदळवन क्षेत्र हे राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी उभारण्यात येणारा ‘कोस्टल रोड’ रखडण्याची चिन्हे आहेत.
कांदळवने हा मुंबईचा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, दररोज मुंबईतील लाखो नागरिक हे, या वनस्पती चिखलाने माखलेल्या आहेत, किनार्यावर निरर्थकपणे वाढणार्या आहेत अशी कल्पना करून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, हे कांदळवनाचे जंगल मुंबईचे रक्षण करते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कांदळवनातून अनेक रोजगार सुद्धा निर्माण झाले आहेत. परंतु, आज काही प्रमाणात कांदळवनांचा र्हास होत आहे. याच कांदळवन क्षेत्रांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई महानगरक्षेत्रात र्हास पावणार्या पाणथळ जागांचा आणि कांदळवनांचा आवाज असलेल्या नंदकुमार पवार यांच्याविषयी...
किनारपट्टीवर नैसर्गिक भिंतींप्रमाणे काम करतात ती म्हणजे कांदळवने. वरकरणी हे कांदळवनांचे जंगल निर्जीव, निष्क्रिय किंवा पडीक वाटत असले, तरी पर्यावरणीय परिसंस्थेचे चक्र सुरळीत ठेवण्यासाठी कांदळवनांच्या जंगलाचा मोठा वाटा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात कांदळवनांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच राज्याच्या कांदळवन क्षेत्रात वाढदेखील झाली आहे. त्यानिमित्त राज्यातील कांदळवनांविषयीचा घेतलेला हा आढावा...
राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच सन २०१८ मध्ये झालेल्या तेरा कोटी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
प्रदूषणाची समस्या गंभीर असून जल आणि वायु प्रदूषणाची समस्या आमच्या सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्याच्या कांदळवन संरक्षण विभागाकडून (मँग्रोव्ह सेल) बोरिवलीच्या गोराई खाडीत उभारण्यात येणार्या कांदळवन उद्यानाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी त्यांनी देशातील प्रदूषणाच्या समस्येबाबत भाष्य करत मुंबई प्रदूषणमुक्त करण्याची गरज व्यक्त केली. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन मुंबई महानगरपालिकेच्
कांदळवन स्वच्छतेची लिम्का बुकमध्ये नोंद