अमेरिकन वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'चे पत्रकार जमाल खगोशी यांच्या हत्येप्रकरणी आठ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यापैकी पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तीन अन्य जणांनाही एकूण २४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौदी सरकारच्या पक्षातर्फे सांगण्यात आले की, पत्रकार खगोशी यांची हत्या काही जणांनी केली होती. या प्रकरणी ११ जणांवर खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ही नावे गुप्त ठेवण्यात आली होती.
Read More
अकेवळ राजकीय वा आर्थिक सत्ता हाती आली म्हणून एखादा पक्ष दीर्घकाळ राज्य करू शकत नाही. त्यासाठी त्याला ‘सिव्हिल सोसायटी’चे आत्मबळ लागते. केवळ प्रतिक्रियेच्या विरोधातून नव्हे, तर न्याय भावनेतूनच असे आत्मबळ येऊ शकते. असे सामूहिक आत्मबळच स्थायी परिवर्तनाचा आधार बनू शकते. त्यासाठी हिंदुत्ववादी चळवळीने ‘सिव्हिल सोसायटी’च्या मूल्यपद्धतीचा अभ्यास केला पाहिजे, तिचे स्वरूप व कार्यपद्धती समजावून घेतली पाहिजे.