दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला सामंजस्य करार करण्यात आला आहे. कल्याणी समुहाकडून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
Read More
राज्य सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवर केलेली पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
लोकशाहीत सत्तेवर कोणाला बसवायचे, याचा निर्णय जनतेच्या हाती असतो. पण, सत्ता हाती आल्यावर या नेत्यांकडून जनहिताची कामे करवून घेणे हे जनतेच्या हाती नसते. लोककल्याणाची तीव्र इच्छाशक्ती आणि देशाबद्दल असीम प्रेम असलेला नेताच जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा जाणकार आणि धडाडीचा नेता सत्तेवर आल्यापासून राज्यात विकासकामांचे दृष्य परिणाम दिसून येऊ लागले आहेत. या विकासातही गडचिरोलीसारख्या अतिशय मागास भागाला त्यांनी दिलेले प्राधान्य त्यांच्या दूरदृष्टीचे आणि जनहिताशी असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेचे
राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात नवीन वर्ष साजरे करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.
गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवा सुरु करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बसला हिरवा झेंडा दाखवत स्वत: बसमधून प्रवास केला.
(CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील विकासप्रकल्पांची पाहणी आणि लोकार्पण केले. "मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे.येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार", असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा शुभारंभ त्यांनी केला. याव
गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवण्याची माझी ईच्छा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद फडणवीसांकडेच राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बुधवार, २५ डिसेंबर रोजी नागपूर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मीट द प्रेसमध्ये ते बोलत होते.
Naxalites महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी नक्षलवाद्यांविरोधात कारवाईची मोठी मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले आहेत. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील असून सोमवारी पोलिसांच्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार मारले गेले आहेत. याबाबत एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. याप्रकरणात अधिकाऱ्याने सांगितले की, छत्तीसगड येथील नारायणपूर येथील सीमेला लागून असलेल्या भागात ही चकमक झाल्याची माहिती आहे.
यापुढे गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा असेल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेला ४२ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री हे बुधवारी गडचिरोली दौऱ्यावर होते. दरम्यान, यावेळी नागपूरहून गडचिरोलीला जाताना अजित पवारांनी हेलिकॉप्टमधील एक गमतीशीर किस्सा सांगितला. हेलिकॉप्टर ढगात गेल्यावर पोटात गोळा आल्याचे त्यांनी म्हटले. 'सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड' या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.
गडचिरोली पोलिसांनी माओवादाचं कंबरडं मोडलं असून माओवाद आता संपण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्हक्या समजल्या जाणार्या गिरधरने शनिवार, २२ जून रोजी पत्नीसह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. दरम्यान, गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात आयोजित 'माओवादी आत्मसमर्पण आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपात दोन पिल्लांची भर पडली आहे (gadchiroli elephant). बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी या कळपातील माद्यांनी दोन पिल्लांना जन्म दिला आहे (gadchiroli elephant). त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तींची संख्या २६ झाली आहे. (gadchiroli elephant)
इंडी आघाडीच्या गाडीमध्ये सगळे इंजिन आहेत. एकही बोगी नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. शनिवारी गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
गडचिरोलीचा कायापालट करणं हे एकमेव ध्येय असून वेळ आल्यास नागपूरचं पालकमंत्रीपद सोडेन पण गडचिरोलीचं सोडणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. बुधवारी गडचिरोली येथे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
गडचिरोलीला आता कुणीही थांबवू शकत नाही. गडचिरोली बदल रहा है, बदलाव दिख रहा है, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गडचिरोली पोलिस विभागाच्या वतीने तिथे महामॅरैथॉन आयोजित करण्यात आली असून उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गडचिरोली दौऱ्यावर असून त्यांनी येथील अतिदुर्गम असलेल्या वांगेतुरी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यात लवकरच पब्लिक सिक्युरिटी अॅक्ट तयार करणार असल्याचे म्हटले आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरु झालेल्या ' विकसित भारत संकल्प यात्रे'ला देशभरातील आदिवासीबहुल भागात प्रतिसाद मिळत आहे. हे संकल्प रथ ठिकठिकाणी जाऊन विविध शासकीय योजनांबद्दल व्यापक जनजागृती करत आहेत. महाराष्ट्रात नंदुरबार पालघर, नाशिक,गडचिरोली आणि नांदेड या आदिवासीबहुल जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा प्रामुख्याने आयोजित करण्यात आली असून हे प्रचार रथ वेगवेगळ्या गावांमध्येपोचत असून गावकर्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी रानम्हशींची ( wild buffalo ) संख्या शिल्लक आहे. राज्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. ( wild buffalo )
महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीशभाऊ आणि शुभदाताई हे दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावलेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ने आयोजिलेल्या आंदोलनात त्या युवापिढीसोबत सहभागी झाल्या. मात्र, आंदोलन विघटित होत गेल्यानंतर शुभदाताईंनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केली. डॉ. सतीश गोगुलवारांसोबत त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. याच काळात उभयतांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शुभदाताईंनी लग्नानंतरही आपल्या नावात बदल
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांसाठी ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वसमान्यांना दिलासा मिळत असून राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं ते म्हणाले. शिवाय, महाराष्ट्रातील लोकांचं नक्षलवाद्यांना समर्थन मिळत नाही, असंही ते म्हणालेत.
मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे मुंबईसह पाच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच याकाळात मच्छिमारांनी
जातीय व धार्मिक तणाव वाढविण्यासोबतच विकास प्रकल्पांना विरोध आणि समाजात गोंधळ निर्माण करण्याचे काम शहरी नक्षलवादी नियोजनबद्ध पध्दतीने करीत आहेत. तीच त्यांची कार्यपद्धती आहे. शहरी नक्षलवादाची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परदेशामधून तसेच शहरी भागामधून मिळणारी आर्थिक रसद, पाठिंबा याकरिता शहरी नक्षलवादाची धोरणात्मक रचना करण्यात आलेली आहे. याद्वारे जंगलामधील घातक आणि आक्रमक विचारधारा शहरात रुजविण्याचे काम नियोजनबद्ध पध्दतीने सुरु असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे सच
पुण्यातील आदर्श तरुण मंडळाने गरजूंना मदत करण्यापासून ते गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात वीज पोहोचविण्यापर्यंत मजल मारली. या मंडळाची संकल्पना मांडत, त्याची धुरा वाहणार्या उदय जगताप यांच्याविषयी...
गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे जिवाची काहिली होत असतानाच आता राज्यावर अवकाळीचे संकट भेडसावू लागले आहे. राज्यातील काही भागांत गारपिटीसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे. मराठवाड्यात गेल्या चोवीस अनेक ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली. असून, राज्यात विविध भागात १८ मार्चपर्यंत अवकाळी संकट असणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात वीजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असून सदर विद्यापीठाच्या गडचिरोली केंद्राच्या स्वतः च्या इमारतींचे बांधकाम वेगाने होणे आवश्यक आहे. त्याकरता बांधकाम निधीचे अंदाजपत्रक त्वरित मंजुर व्हावे याकरता चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुलपती व राज्यपाल रमेश बैंस यांच्याकडे निधी वाढवून देण्यासाठी विनंती केली आहे.
गडचिरोलीत नरभक्षक वाघाने दोन दिवसात दोन नागरिकांचा बळी घेतला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचे थैमान पुन्हा एकदा सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात झाली आहे
गडचिरोली येथील पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तात्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके त्याठिकाणी पाठवावी तसेच प्रसंगी बाजूच्या राज्यातूनही एनडीआरएफ पथक मागवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे रवाना झाले.
खारकाडी... गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामधील एक दुर्गम गाव. याच गावातील एक 40 वर्षीय कृतिशील शेतकरी सदुराम मडवी. सदुरामने चक्क ‘गुगल लेन्स’चा वापर करत, ‘जीओडोरम लॅक्सिफ्लोरम’ नावाच्या वनऔषधीची महाराष्ट्रातील पहिली नोंद नुकतीच केली आहे. उ‘ेखनीय बाब म्हणजे, गोंड समाजातील सदुरामचे कुठलेही औपचारिक शिक्षण पूर्ण झालेले नाही. पण, तरीही केवळ तंत्रज्ञान आत्मसात करून त्याने ही मजल मारली आहे. तेव्हा, अशा या ‘स्मार्ट’ शेतकरी ठरलेल्या सदुरामच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
धानाला बोनस, कृषीपंपाला २४ तास वीज, वीजतोडणी बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, ओबीसी आरक्षण तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध १६ मागण्यांसाठी भाजपतर्फे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली.
सत्तेत बारामतीकरच आहेत, वांद्य्राचे साहेब आता कुठे ‘अॅक्शन मोड’मध्ये येणार आहेत म्हणे. बाकी नाना पटोलेंचे ‘काँग्रेस उरलो केवळ हरण्यापुरता...’ तर अशा महाराष्ट्राच्या सत्ताधीशांकडून साहित्य आणि कलाकृतींच्या उत्थानाबाबत आशा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच. त्यामुळे शेवटी एक प्रश्न आहे, अमोल कोल्हे भाजपशी किंवा रा. स्व. संघाशी संबंधित असते आणि त्यांनी जर नथुराम गोडसेंची भूमिका साकारली असती, तर समस्त पुरोगामी निधर्मी आणि तथाकथित गांधीवाद्यांनी कोणती भूमिका घेतली असती? याचे जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राच्या
राजेशाही बंगाल वाघाची प्रजाती ही भारतीय उपखंडातील जंगलाचे खर्या अर्थाने वैभव. मात्र, २०२१ साली देशात झालेल्या वाघांच्या मृत्यूची संख्या पाहिली, तर या वैभवाला ग्रहण लागल्याचे दिसते. सरत्या वर्षाला निरोप देताना विदर्भात हाड आणि पंजे गायब असलेल्या वाघिणीचा मृतदेह सापडला होता.
‘सी-६०’ मध्ये स्थानिक वनवासी तरुण आहेत. त्याग आणि धैर्य, शौर्य याचं उदाहरण म्हणजे ‘सी-६०’ पथक म्हणता येईल. तेव्हा, माओवाद्यांची गडचिरोलीत नांगी ठेचणार्याया विशेष पथकाविषयी...
मिलिंद तेलतुंबडेचा ‘जनयोद्धा’ असा उल्लेख करत नक्षलवाद्यांनी त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकी दिली आहे. गेल्या आठवड्यात गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर नक्षलवाद्यांनी मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख ’जनयोद्धा’ असे करत त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे पत्रक जारी केले आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून सहा राज्यात ‘बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.
मिलिंद तेलतुंबडे हा शेकडो वनवासींच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेला कुख्यात माओवादी होता. त्यामुळे ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमावर्ती भागातील माओवादी संघटनेच्या प्रभुत्वाला एक मोठा धक्का आहे. मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा झाल्याने माओवादी संघटनेवर काय परिणाम होतील, हे समजून घ्यायचे असेल, तर त्याची माओवादी संघटनेत काय भूमिका राहिलेली आहे, हे समजून घ्यावे लागेल.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह २६ नक्षलवाद्यांची झालेली हत्या आणि त्या चकमकीच्या आधी एक दिवस प्रशांत बोस उर्फ किशनदा आणि त्याची पत्नी शीला मरांडी या दोघांना झालेली अटक हा नक्षलवादी चळवळीस जबर धक्का मानला जात आहे. देशामध्ये फुटीरतेची बीजे पेरणारी नक्षलवादी चळवळ मुळापासून उखडली जायला हवी.
गडचिरोलीतील अभियानादरम्यान झाली चकमक
जांबिया-गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षलवादी हल्ला
पोर्ली वनपरिक्षेत्रातील घटना
शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली
पोलिस चकमकीमध्ये नक्षली नेता ठार झाल्याच्या निषेधार्थ नाक्षावाद्यांकडून आज बंदची घोषणा
‘भारताचे संविधान इथे चालणार नाही. इथे आमचे सरकार’ असा लाल रंगाचा ग्रामपंचायतीच्या बाहेर लागलेला बोर्ड एकवेळ काढताही येतो. मात्र, लोकांच्या मनात हिंसेच्या आधारावर बसवलेली राजकीय पकड कशी ढिली करायची, हाच तलासरीतला खरा प्रश्न आहे.
मासो ढेबला पुंगाटी आणि ऋषी लालु मेश्राम अशी दोघा नागरिकांची नावे असून हे दोघेही मौजा पुरसलगोंदी येथील रहिवासी
आगामी नक्षल सप्ताहाच्या पृष्ठभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानास मिळालेले हे सर्वांत मोठे यश मानले जात आहे.
२०१४च्या तुलनेत यंदा राज्यात वाघांची संख्या ६४ टक्क्यांनी वाढली. २०१४ साली राज्यात १९० वाघांचे अस्तित्व होते, आता ही संख्या ३१२ झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये १२२ नव्या वाघांची भर पडली. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य शासन तथा वनविभागाने व्याघ्र संवर्धनासाठी बरेच उपक्रम राबविले.
गडचिरोली येथील ग्यारापत्ती गावात दोघा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात नक्षलविरोधी पथकाच्या जवानांना रविवारी यश आले.
गडचिरोलीमधील गोकुळ उर्फ संजू सन्नू मडावी, रतन उर्फ मुन्ना, शैला उर्फ राजे मंगळू हेडो, जरिना उर्फ शांती दानू होयामी, मीना धूर्वा, भिकारी कुंजामीसरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो या सहा नक्षल्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. सर्वांना पकडण्यासाठी सरकारने लाखोंची बक्षिसे लावली होती.