‘जी२०’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षास भेट देऊन परिषदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसोबत अल्पसंवाद साधला. ‘जी२०’ शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील नव्याकोऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात करण्यात आले होते. या परिषदेचे वार्तांकन करण्यासाठी देशविदेशातून सुमारे दोन ते तीन हजार पत्रकार आले होते. त्यांच्यासाठी परिषदेस्थानी भव्य अशा दोन आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षांची उभारणी करण्यात आली होती.
Read More
अमेरिका आणि ब्रिटनच्या काही आंतरराष्ट्रीय माध्यमांचे भारतातील ‘कोविड’ महामारीचे अतिरंजित चित्रण हे असत्यावरच बेतलेले होते. पण, अशा या पूर्वग्रहदूषित असत्याच्या प्रयोगांना आता सत्यास्त्राचा वापर करून खोडण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात भारताची प्रतिमा मुद्दाम मलीन करणार्या या कांगावखोर माध्यमांच्या अरेरावीला चाप बसेल.
भारतात करोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर परदेशी प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला. मात्र, केंद्र सरकारने तो अपप्रचार खोडून काढण्यासाठी विशेष व्यवस्था कार्यान्वित केली आहे.
काश्मीरातील बारमुला जिल्ह्यात सोपेर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या भागात हल्ला चढवला होता. या दरम्यान, गोळीबारात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा तीन वर्षांचा नातू आपल्या आजोबांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून पळाला नाही. धीटपणे तो तिथेच बसून राहीला, काहीकाळ त्याने आपल्या आजोबांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयश आल्यानंतर आजोबांच्या मृतदेहावर तसाच बसून राहिला. गोळीबाराच्या आवाजात न डगमगता तिथेच बसून राहिला. जवानांनी त्याची तिथून सुटका केली.
कुठल्याही ठिकाणी घडत असलेला वादंग, संकट किंवा आणखी काही गोष्टी प्रकरणे, प्रसार माध्यमे आणि पत्रकारांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण करत असतात. तिथल्या वार्तांकनासाठी त्यांचा गौरव केला जातो, त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळत असते. भारतात जम्मू काश्मीरसारखी दुसरी जागा किंवा ठिकाण असल्या वृत्तांकानांसाठी असूच शकत नाही.