सध्या लग्नसराईचा मौसम सुरु झालेला दिसतो. अनेक कुटुंबे त्यांच्या आयुष्यभराची स्वकष्टाची कमाई या लग्नसोहळ्यासाठी खर्ची घालतात. पण, दुर्दैवाने कोणत्याही कारणास्तव या लग्नसोहळ्यावर विघ्नाचे सावट आले तर, यासाठी केलेला संपूर्ण खर्च मातीमोलही ठरु शकतो. म्हणूनच आता विवाहविम्याची संकल्पना हळूहळू प्रचलित होताना दिसते. त्यानिमित्ताने नेमकी ही संकल्पना आणि या प्रकारच्या विमा पॉलिसीतील तरतुदी यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
आयटी क्षेत्रातील अग्रणी कंपनी इन्फोसिस सरकारी विमा कंपनीकरिता नव्या पिढीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करणार आहे.
विमा संरक्षण म्हणजे आपले आणि आपल्या कुटुंबाचे सुरक्षाकवच. यामध्ये आयुर्विमा हा अतिशय लोकप्रिय. तेव्हा, आयुर्विम्याचे नेमके स्वरुप, त्याचे विविध प्रकार आणि आयुर्विमा योजनांचे लाभ यांविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख....
प्रवास विमा तुमच्या प्रवासादरम्यान विविध जोखीमांपासून संरक्षण देतो आणि तुमचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी फायदेशीर ठरतो. प्रवासादरम्यान सामानाची चोरी, वैद्यकीय आणीबाणी, प्रवासादरम्यान अपघात, पासपोर्ट हरवणे, उड्डाण विलंब किंवा उड्डाण रद्द होणे इत्यादी सर्व प्रकारच्या परिस्थितीत या विम्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. म्हणूनच नियमित प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवास विम्याजवळ माहिती असणे आवश्यक आहे.
पालक त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे भले व्हावे म्हणून अनेकविध भूमिका निभावतात आणि असंख्य जबाबदार्या पार पाडतात. त्यांचे प्रेम आणि त्यांनी घेतलेली काळजी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, विम्याच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची व आर्थिक सुरक्षिततेची खात्री करणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
आरोग्य विमा पॉलिसी असली की आपण निर्धास्त होतो. पण, बरेचदा विमा पॉलिसी घेतल्यानंतरही ‘अॅड-ऑन्स’च्या सूचना, सल्ले कंपनीतर्फे किंवा एजंटतर्फेही दिले जातात. पण, बरेचदा पॉलिसीव्यतिरिक्त चार पैसे अधिक मोजावे लागतील म्हणून या ‘अॅड-ऑन्स’कडे दुर्लक्ष तरी केले जाते किंवा अधिकचे पैसे आकारुन विमा कंपनी ग्राहकांचा खिसा कापतेय, असा एक समज असतो. म्हणूनच आजच्या भागात जाणून घेऊया या ‘अॅड-ऑन्स’विषयी...
महिलांच्या गरोदरपणाचा खर्च समाविष्ट असणार्या कित्येक आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेतच. पण, मातेबरोबरच नवजात बालकांनाही विमा सुरक्षेचे कवच प्रदान करणार्याही काही पॉलिसी बाजारात दिसतात. परंतु, या प्रकारच्या पॉलिसीचे नेमके स्वरुप काय, त्यात कुठले आरोग्यविषयक धोके ‘कव्हर’ होतात, कुठले नाही आणि यासंबंधी अशाच काही प्रश्नांची आजच्या या लेखाच्या माध्यमातून उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुया.
‘टर्म इन्शुरन्स’ विशेषत: घरातील कर्त्या पुरुषाने उतरवावा. ही ‘इन्शुरन्स पॉलिसी’ घेण्यामागचा मुख्य उद्देश हा असतो की, जर कर्ता पुरुष मृत्यू पावला, तर त्याच्या कुटुंबाचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालायला हवेत. जर विम्याच्या दाव्यातून मिळणारी रक्कम कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागवू शकत नसेल, तर त्याचा उपयोग काय, म्हणून कमी रकमेचा विमा उतरविण्याची चूक करू नका. घरच्या कर्त्या पुरुषाने दुर्दैवाने तो जीवंत राहू शकला नाही, तर त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील सर्व गरजांचा विचार करून ‘टर्म इन्शुरन्स पॉलिसी’ उतरवायला हवी.
दि. १ एप्रिलपासून ‘आरोग्य संजीवनी’ या नावाची स्टॅण्डर्ड आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणण्यात आली आहे. ही पॉलिसी जितक्या रकमेची उतरवलेली असेल, तितक्या रकमेपर्यंत आयुष उपचार पद्धतीचा दावा संमत करणार्या काही पॉलिसी होत्या. पण, दावा संमत करण्यावर बर्याच मर्यादा होत्या. याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख...
वाचा सविस्तर! नेमकी काय आहे प्रक्रीया
कोरोनाच्या वाढत्या समस्येचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याचीही चिन्हे आहेत.
जीवन विमाजानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत जीवन विमा पॉलिसी विक्रीत फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, याचे कारण भारतीय नागरिक आयकरात सवलत मिळण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत विमा पॉलिसी विकत घेतात.