( CBI raids Congress leader Bhupesh Baghel for Mahadev Satta App case ) ‘महादेव सट्टा अॅप’ प्रकरणात ‘सीबीआय’च्या पथकाने छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह दिल्ली, भोपाळ आणि कोलकाता यांसह चार राज्यांमध्ये 60 ठिकाणी छापे टाकले आहेत.
Read More
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे छापा टाकला. सीबीआयने संदेशखळी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सीबीआय जानेवारी २०२४ मध्ये संदेशखळी येथे ईडी टीमवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहे.
कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नाशिक, भाईंदर असे ४४ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने मोठी कारवाई केली आहे. सर्वात अधिक छापेमारी ठिकाणे ठाणे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. ही छापेमारी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी दहा राज्यांमध्ये मानव तस्करीविरोधात छापेमारी केली. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये एका रोहिंग्यास ताब्यात घेतले आहे. एनआयएने त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, पुदुच्चेरी, राजस्थान आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये छापेमारी केली.
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील आठ ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्बो कोविड केंद्राच्या खिचडी पुरवठादारांशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखा, ईडीच्या तपासानंतर आता आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. कोविड काळातील बीएमसीकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या संपूर्ण प्रकारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
देशातील राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या बोगस देणग्यांच्या संदर्भात आयकर विभागाने बुधवारी गुजरात मध्ये छापेमारी सुरु केली आहे
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दि. २ ऑगस्ट रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे वृत्तपत्र नॅशनल हेराल्डच्या हेराल्ड हाउस-सह इतर संबंधित ११ ठिकाणी छापे टाकले.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी ‘सीबीआय’ने छापेमारी केली. २००४ ते २००८ या काळात राजद नेते लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरती घोटाळ्याच्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. दिल्ली, पाटणा आणि गोपालगंजमधील यादव यांच्या एकूण १७ मालमत्त्वांवर ‘सीबीआय’ने छापेमारी केली आहे.
रस्तेघोटाळाप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून पालिकेतील कंत्राटदारांवर धाडी टाकल्या जात आहेत