अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील पुन्हा उफाळून आलेल्या वादावर आता खुद्द खैरेंनी पडदा टाकला आहे. आधीच्या दिवशी अंबादास दानवेंवर प्रचंड आगपाखड करणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर युटर्न घेतला.
Read More
उबाठा गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीतील लोक आजही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही, असा घणाघात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी औरंगजेबाची कबर हटवणे हा इतिहास संपवण्याचा प्रकार आहे, असे वक्तव्य केले होते. यावर भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले.
‘नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला की, तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. उद्धव ठाकरे ते कधी करणार आहेत, देव जाणो! भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याचे गाजर काय दाखवले, ते इतके हवेत गेले की, विचारायची सोय नाही. विधिमंडळाचे कामकाज आपल्याइतके कोणालाच समजत नाही, याच अविर्भावात ते वावरताना दिसतात. कालचीच गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी गोवंडी ‘आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात केलेल्या भाषणाची चर्चा विधानसभेत झाली. त्यांच्या भाषणाविषय
राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिसा कापल्या जाणार नाही. त्यांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. काही प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते. त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा
(Maharashtra Budget Session 2025) राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून विरोध सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. दरम्यान, कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत राज्यपाल निर्णय घेतील, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, ३ मार्च रोजी विरोधकांना दिले.
मुंबई : विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) जोरदार चिमटे काढले. अंबादास दानवे यांच्याकडे पाहून बोलताना शिंदे म्हणाले, "अंबादास, ‘पूर्वी तुम लढों मै कपडे सांभालता हूँ’ अशी स्थिती होती. आता ‘तुम लढो में बुके देकर घर जाता हूँ…’ अशी स्थिती आहे".
(MVA) महाविकास आघाडीत विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये उबाठाचे सर्वाधिक आमदार असल्याने विरोधी पक्षनेता हे पद ठाकरेंना मिळणार अशी चिन्हं आहेत. परंतु विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव सेनेने दावा केला तर काँग्रेस विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित तोंडी प्रस्ताव काँग्रेसकडून उबाठाला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर असणाऱ्या अंबादास दानवेंचा पत्
विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर उबाठा गटाच्या पराभूत आणि विजयी उमेदवारांची मंगळवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याची आग्रही मागणी केली आहे. अंबादास दानवेंनीदेखील या मागणीला दुजोरा दिला आहे.
आम्हाला राजकारण करायचं नाही, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. उरणमध्ये एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली.
सभागृहात अर्थसंकल्पावर भाषण केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेरोशायरीत सरकारवर टीका केली. दरम्यान, त्यांच्या या शेरोशायरीला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. तीन दिवसांच्या निलंबनानंतर अंबादास दानवे यांनी आज सभागृहात उपस्थिती लावली होती.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करण्यात आली आहे. विधानपरिषद सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांकरिता निलंबन करण्याचा निर्णय दि. २ जुलै रोजी घेण्यात आला होता. मात्र, त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता या कालावधीत कपात करत तो तीन दिवसांचा करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवार, दि. ४ जुलैपासून ते विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील.
आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देणे, हे रस्त्यावरच्या टपोरी, गटारछाप, नशेडी, असंस्कृत व्यक्तीलाच शोभते. पण, हेच काम अंबादास दानवे या राज्याच्या विधान परिषदेतील ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्याने केले.
विधीमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला असता दानवे चांगलेच संतापले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला.
विधानपरिषद सभागृहात शिवीगाळ केल्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून ५ दिवसांसाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्हे यांनी हा ठराव वाचून दाखवला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्यानंतर आता उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नेत्यांचे कान टोचले आहेत. महिलांना असुक्षित वाटेल असं वातावरण तयार करु नये, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच दानवेंनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याने सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून ५ दिवसांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंच्या कृत्याचं समर्थन केलेलं आहे.
लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात उबाठा गटाला अपेक्षेपेक्षा जास्त जागाही मिळाल्यात. पण या निकालात मात्र, उबाठा गटाला आपला बालेकिल्ला असलेल्या एका जागेवर जोरदार फटका बसला. ती जागा होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी दारूण पराभव केलाय. परंतू, चंद्रकांत खैरेंनी मात्र आपल्या पराभवाचं खापर त्यांच्याच पक्षातील नेते अंबादास दानवे यांच्यावर फोडलंय. एवढंच नाही तर त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही म्ह
विरोधी पक्षनेते इथे यायचे दहा मिनिटं बसायचे आणि निघून जायचे. मग मी एकटा पडलो, असे म्हणत उबाठा गटाच्या चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंचं नाव न घेता त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेत शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी तब्बल १ लाख ८० हजार मतांधिक्याने चंद्रकांत खैरेंचा पराभव केलाय. यावर आता खैरेंनी प्रतिक्रिया दिली.
पुणे अपघातप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे. आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्राद्वारे केली आहे.
एकही जागा न लढवणाऱ्या पक्षाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मिळते. मात्र ४८ जागा लढवणाऱ्या पक्षाला परवानगी नाकारण्यात येते, असे उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. मनसेला १७ तारखेला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर दानवेंनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
नाराज असलं म्हणून काय झालं? मी ३० वर्षे जूना शिवसेनेचा शिवसैनिक असून मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या माझी मानहानी करणाऱ्या आहेत, असे स्पष्टीकरण उबाठा गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरण्याआधीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील उबाठा गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी समाज माध्यमावर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दानवेंना लोकसभा निवडणूक लढवण्याची ईच्छा असून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
येत्या सोमवारी राजकीय भूकंप होणार, असं वक्तव्यं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषेद केलं होतं. त्यानंतर शनिवारी उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे नाराज असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. यावर आता शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी अंबादास दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते, अशी प्रतिक्रिया उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप अंबादास दानवेंनी केला होता. यावर आता खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत, त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी केले.महाराष्ट्र विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी दृकश्राव्यव्दारे (ऑनलाईन) पंतप्रधान मोदी यांनी या परिषेदेला संबोधित करून शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य
एकही बेकायदेशीर काम केलं असेल तर मी कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देतो, असे म्हणत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर मंत्री लोढांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून, यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधान परिषदेत दिली
माजी मंत्री नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित झाले होते. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसल्याने विधानपरिदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला.
त्रुटी काढून आम्ही मराठा आरक्षण देऊ. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. आणि त्याची तारीख लवकरच मिळणार आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी अनेक नेते 'सह्याद्री'वर दाखल झाले आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असून असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. वडेट्टीवार यांनी माध्यमांना माहिती दिली असेल तर त्याचे पुरावे सर्वांसमोर सादर करावे, असे आवाहन दानवे यांनी केले आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल केला होता. आता भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करु नये, असे ते म्हणाले आहेत. नांदेड येथे बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
शिवसेना पक्षात झालेल्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक बंडानंतर पक्ष आणि संघटना कुणाची हा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पक्षांतराची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उबाठा गटाकडून करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निर्वाळाही निवडणूक आयोगाने दिला होता. यावरच आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार असून अपात्रतेच्या संदर्भात गुरुवार दि. १४ सप्टेंबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार असून दोन्ही गटाचे आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
माजी खासदार किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
अजितदादा आमचे नेते आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाकडुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचं नेतृत्व टिकवण्यासाठी शरद पवारांनी असं वक्तव्य केलं असावं, असं दानवे म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदपीन भुमरे यांच्यात खडाजंगी झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. भूमरेंसह अब्दुल सत्तार ही यात होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते आपसात भिडले. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा, तसेच कमी निधी दिला जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हीडिओ मराठी वृत्तवाहिनीने प्रकाशित केला होता. किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. आता या व्हीडिओवर किरीट सोमय्या यांनी आपली बाजू मांडली आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या एका कथित व्हिडीओवरून विरोधी पक्षातर्फे धुमाकूळ घातला जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले असून विरोधकांनी या प्रकरणी आरोपांची राळ उठवली आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून 'त्या' कथित व्हिडीओ प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
'अंबादास दानवे यांनाच विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याचा अधिकार नाही. नीलम गोऱ्हे यांना नैतिकता शिकवण्या आधी त्यांनी राजीनामा द्यावा'. अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरून विरोधी पक्षांनी सभात्याग केला आहे. त्याला उत्तर देतांना प्रवीण दरेकर यांनी अंबादास दानवे यांनीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. रमेश देवकीनंदन धानुका यांनी दि. २८ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी सोशल मिडीया साईटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, अंबादास दानवे यांच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. सर्व नाना पटोले यांची फिरकी घेताना दिसत आहे. यावरून नितेश राणेंनी, उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
सुषमा अंधारेंनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा, तिथं शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा, भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्यांच्यापुढं जाऊन रडा. अशी टीका सुषमा अंधारेंवर केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांची तक्रार केली. “माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होऊनही विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला नाही.” अशी तक्रार सुषमा अंध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार, खासदार सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाची विशेष पूजा श्रीरामाच्या मंदिरात केली जाणार आहे. यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. तर, दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य सामंत यांनी केल आहे.
‘दि मॅजेस्टिक’या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. राजे
राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटनेचे देशातील सर्वात मोठे पर्यटन विषयक अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे २९ सप्टेंबरपासून तीन दिवसांसाठी होत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचे पर्यटन संचालनालय, भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना (IATO) यांच्या संयुक्त विद्यमाने एक कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
पोलिसांची परवानगी नसतानाही रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरणाच्या समर्थनार्थ हजारो हिंदू बांधव एकवटले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवे वादळ संचारले होते.केंद्र सरकारने नामांतराबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध करणार्यांविरोधात या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ’औरंगाबाद’चे ’छत्रपती संभाजीनगर’ आणि ’उस्मानाबाद’चे ’धाराशिव’ नामांतर करण्यास परवानगी दिली.
राज्यातील 1 हजार 89 पोलीस ठाण्यांपैकी 1 हजार 82 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमितपणे कॅमेरे सुरु असणे आणि रेकॉर्डिंग जतन केले जाणे याबाबींचे ऑडिट केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भात सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.