महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहेच. परंतू, हिंदी आणि इंग्रजीसह इतर भाषादेखील शिकू शकतात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिली.
Read More
मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांचे आता १०० वर्षांहून अधिक आयुर्मान झाले आहे. त्यामुळे भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था सामावून घेणार्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करत आहे. मागील लेखात आपण मुंबईच्या दादर, भायखळा, रे रोड आणि घाटकोपर येथील रेल्वेमार्गावरून जाणार्या पूल प्रकल्पांचा आढावा घेतला. याच लेखमालिकेच्या दुसर्या भागात आज आपण ‘एल्फिन्स्टन रोड आरओबी प्रकल्पा’चा आढावा घेऊया.
महिलांना सामान न्याय देण्यासाठी मह्तवपूर्ण निर्णय
(Mumbai Bike Taxi) मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईमधील रस्त्यांवर आता बाईक टॅक्सी धावणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. या निर्णयामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रो३च्या पहिल्या टप्प्याला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद
मुंबई, दि.१९: प्रतिनिधी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेच्या विस्तारासह आगामी पाच परिवहन विभागांतर्गत ‘रोप वे’ या नवीन परिवहन सेवेचा अंतर्भाव करण्याच्यादृष्टीने राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास बुधवार, दि.१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पाने नुकताच एक माईलस्टोन गाठत महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एससीएलआर विस्तार टप्पा १मध्ये वाकोला फ्लायओव्हरवरील २१५ मीटर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) स्पॅनच्या यशस्वी लाँचिंगसह एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो वाहतूक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यूके सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या (डीएफटी) क्रॉसरेल इंटरनॅशनल (सीआय) यांच्या माध्यमातून यूके सरकारशी सामंजस्य करार केला आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ४ वडाळा - कासारवडवली या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ आणि ५ वर्षांची प्रकल्प दिरंगाई झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून अनिल गलगली यांनी ही माहिती उघड केली आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग-४ ( Mumbai Metro Route 4 ) (वडाळा - कासारवडवली) प्रकल्पामध्ये स्थापत्य कामात झालेली तब्बल १२७४.८० कोटी रुपयांची वाढ आणि ५ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा मुंबईच्या विकासासाठी मोठा धक्का आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित सुरू होत असून एमएमआरडीएच्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर असून, त्यांनी या संदर्भातील नोंदी ठेवून प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गुणवत्ता, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मेट्रो परिचालन सेवेला आयएसओ ९००१, आयएसओ १४००१ आणि आयएसओ ४५००१ मानांकने प्राप्त झाली आहेत. अशा प्रकारची तिनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.
मुंबई मेट्रो ७ आणि २ए मार्गावरील ३० मेट्रो स्थानकांवर सार्वजनिक स्वच्छता पुरवण्याकरीता मुंबई मेट्रोने ‘टॉयलेट सेवा ॲप’ यांच्या सहकार्याने स्वच्छ्ता उपक्रम राबवला आहे. या ॲपद्वारे मेट्रो स्टेशनवरील ‘टॉयलेट’ची संपूर्ण माहिती प्रवाशांना तात्काळ मिळू शकणार आहे.
भूमिगत मुंबई मेट्रो ३चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. बीकेसी ते कफ परेड असा २१.३५ कि.मी.च्या या टप्प्याची ८८.०१ टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. दरम्यान, मुंबई भूमिगत मेट्रो मार्गिकेचा आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा सुरु झाला आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा (MUTP-III)भाग असलेला बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम लक्ष्यित पूर्णत्वाच्या अगदी जवळ येऊन लक्षणीय प्रगती करत आहे. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे उभारण्यात येत आहे. पनवेल आणि कर्जतला आधुनिक दुहेरी मार्गाने जोडणारा हा मार्ग या दोन्ही भागांना कनेक्टिव्हिटी देण्यास सज्ज होता असल्याची माहिती एमएसआरव्हीसीने दिली आहे. या प्रकल्पाने भौतिक आणि आर्थिक अंमलबजावणीच्या दृष्टीने लक्षणीय प्रगती साधली आहे. ऑक्टोबर २०२४पर्यंत या प्रकल्पाची ६७ टक्के प्रगती
महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष भाजपने आपले संकल्पपत्र जाहीर केले असून महायुती सरकारच्या माध्यमातून गती देण्यात येणाऱ्या मेट्रो, रेल्वे, हवाई आणि रस्ते प्रकल्पांना गती देण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाहीतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडविणाऱ्या आणि प्रगतीपथावर असणाऱ्या अनेक प्रकल्पांना गती देणार असल्याची माहितीही दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रानाम्यामध्ये मात्र पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येते आहे. मविआच्या
महाविकास आघाडीच्या बालहट्टामुळे मेट्रोची काम बंद पाडली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन पार पडलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Narendra Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून येथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे १४,१२० कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - ३ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या विभागात १० स्थानके असून त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन - ३ हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प असून तो ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. लाईन-३ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे १२ लाख प्रवासी
(Mumbai Metro)नवरात्रोत्सवादरम्यान ‘मेट्रो-२अ’ आणि ‘मेट्रो-७’ वरील ‘मेट्रो ट्रेन’ सेवेच्या वाढीव फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सणाच्यासुदीच्या काळात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक सेवेची वेळ वाढविण्याचे महत्व लक्षात घेत ‘महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड’तर्फे (एमएमएमओसीएल) वाढीव फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्राच्या (एमएमआर) विकासासाठी भविष्यातील आव्हाने आणि विस्ताराच्या संधी ओळखत, अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठी ‘नीती आयोगा’ने सात प्रमुख घटकांच्या विकासावर भर दिला आहे. आजच्या पहिल्या भागात मुंबई महानगर क्षेत्राचा ‘जागतिक विकास केंद्र’ म्हणून विकास, परवडणार्या घरांची निर्मिती आणि जागतिक पर्यटन केंद्र म्हणून मुंबई महानगर प्रदेशासमोरील संधींचा सविस्तर आढावा घेऊया.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने सीप्झ, एम.आई.डी.सी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सी.एस.एम.टी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावली असल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईच्या शिरपेचात भूमिगत मुंबई मेट्रो ३मुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने चीन येथे झालेल्या वर्ल्ड टनेल काँग्रेस २०२४ मध्ये सहभाग घेत मुंबई मेट्रो ३चे चार केस स्टडीज सादर केले.
राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या 'कमिशनर' राहून म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस रुबल अग्रवाल यांच्याकडे आता मुंबई मेट्रोचे 'कंट्रोल' देण्यात आले आहे. 'एमएमआरडीए'तील अतिरिक्त आयुक्तपदावर बदली केली असून, त्यातर्गंत अग्रवाल यांच्याकडे महा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवली आहे.
‘एमएमआरसीएल’ची कौतुकास्पद कामगिरी ; स्थलांतर न करता मोहीम केली फत्त
आरे ते कफ परेड अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो मार्गिकेची प्रत्येक मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असून या भूमिगत अर्थात अंडरग्राउंड मेट्रोतून प्रवास करताना मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येण्याच्या मुंबईकरांच्या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात एमएमआरसीने उपाय शोधला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त, मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी समस्त मुंबईवासियांना शुभेच्छा दिल्या.
शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाच्या मोसमात मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते.
मुंबई, दि. २२ : भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील संभाव्य दरडी कोसळण्याच्या २४९ ठिकाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाआधारे २४९ पैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक घोषित केली आहेत. या ७४ ठिकाणांच्या निकटच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य धोका उद्भवल्यास काय करावे, काय करू नये; याचे प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत २५० नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यापुढेही सुर
राज्यातील २८ पालिकांच्या कचरा-भूमीचे रुपांतर लवकरच हरित क्षेत्रात होणार आहे. त्यासाठी त्या नगरपालिकांच्या हद्दीतील कचरा भूमीत बदल घडवून ती हरित क्षेत्रे बनविण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. या कृतीतून क्षेपणभूमी जवळ राहणार्या नागरिकांना या बदलातून हरित क्षेत्राचा मोठा लाभ मिळणार आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मुंबई मेट्रोकडून नेटवर्कसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रोच्या खांबावर एक सुक्ष्म दूरसंचार उपकरण बसविले जाणार आहे. त्यामार्फत प्रवाशांना सुपरफास्ट नेटवर्कचा आनंद उपभोगता येणार आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखंड नेटवर्कचा फायदा होणार आहे. मेट्रोमार्ग २ अ आणि ७ च्या १५०० खाबांवर हे दूरसंचार उपकरण बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी परवानगी सरकार मेट्रो प्राधिकरणाला देणार असल्याचे समजते आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या व
मुंबई : महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे.
मुंबई : मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) अशा २० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यानुसार त्यांचा कायापालट येणार आहे.
घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नाही, त्यामुळे ते सरकार गेले ही गणरायाची कृपाच आहे अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे
कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास बुधवारी, दि. 10 रोजी झालेल्या विस्तारित मंत्रिमंडळच्या पहिल्याच बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
आरे आंदोलनाची 'दिशा' भरकटली!
राज्य सरकारने १ एप्रिलपासून मुंबईतील सदनिकांवर १ टक्का ‘मेट्रो अधिभार ’ वसूल करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे १ टक्का वसूल करण्यासाठी मेट्रो सेवा घाईघाईने सुरु तर केली नाही ना, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे, असे आर.टी. आय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले
महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "कळसूत्री सरकारने मांडलं पंचसूत्री बजेट" अशी प्रतिक्रिया दिली आहे. "या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे
राज्य सरकारने मुंबईतील एसआरए प्रकल्पांच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभरातील एसआरए प्रकल्पांसाठी एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
“आपण पर्यावरण मंत्री आहात, तेव्हा ३९ हजार झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपण कारवाई करावी, अन्यथा महापालिकेतील सत्ताधार्यांमुळे मुंबई बुडल्याशिवाय राहणार नाही,” असे आपले लाडके बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीच म्हटलेले आहे. “कारशेडसाठी आपण मुंबईची मेट्रो थांबवली. मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी मेट्रो होणे आवश्यक आहे. बालहट्टासाठी अन् राजकीय स्वार्थासाठी आपण मेट्रोही थांबवली आहे. तरी या आपण मेट्रोचा मार्ग लवकर सुकर करावा,” अशी मागणी अमित साटम यां
मागील भागात मुंबईतील काही गृहनिर्माण प्रकल्पांचा आपण आढावा घेतला होता. आज मुंबईच्या विकासाला गतिमान करणार्या अशाच दोन प्रकल्पांची आपण सविस्तर माहिती करुन घेऊया.
मुंबई महानगरक्षेत्रात र्हास पावणार्या पाणथळ जागांचा आणि कांदळवनांचा आवाज असलेल्या नंदकुमार पवार यांच्याविषयी...
“भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती आहे व तिचे खासगीकरण कदापि होणार नाही,” असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच जाहिर केले. मात्र, प्रभावी कारभारासाठी रेल्वेनेही खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यानिमित्ताने भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
महाराष्ट्र सरकारच्या असहकार्यामुळे राज्यात रेल्वेच्या अनेक प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे. मेट्रो कारशेडसाठी प्रकल्प तयार आहे, मात्र राज्य सरकारने ईगोचा मुद्दा पुढे करून केंद्र सरकारची जमीन हडपण्यासाठी कायदा केला आहे, असा घणाघात केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत बुधवारी केला.
मुंबई मेट्रोच्या विविध मार्गांचे काम प्रगतीपथावर असून राज्याच्या अर्थसंकल्पातही त्यासंबंधी घोषणा देण्यात आल्या. त्यानिमित्ताने या मेट्रो मार्गांची माहिती एका दृष्टिक्षेपात...
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
एमएमआरडीएकडून २०३० पर्यंत प्रवास सोईच्या व हितकारक वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. (अ) सर्व बाजूस सोईस्कर असा चक्राकार रस्ता वाहतूक सिग्नलविरहित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (ब) मेट्रो प्रकल्पही सर्वकडे राबविले जात आहेत. (क) इतर महत्त्वाचे मार्ग नियोजनात आहेत.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी कांजूर कारशेडच्या विषयात न्यायालयाने पडू नये असे विधान केले. विरोधकांच्या राजकारणात कोर्टाने पडू नये, असा सल्ला राऊत यांनी न्यायालयांना दिला आहे. तसेच यंत्रणांना हाताशी धरून विकासकामांना खिळ घालण्याचे आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
कांजुरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी भाजप नेते करीत सोमैय्या यांनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही ‘मेट्रो-३’ मार्गिका सुरू होण्यापूर्वीच अनेक वादांच्या भोवर्यात अडकली आहे. या मार्गिकेच्या आरेमधील कारशेडवरुन सुरू झालेल्या वादाची मालिका सोमवारी केंद्र सरकाराने राज्य सरकारला पत्र लिहिण्यापर्यंत येऊन ठेपली. आता नेमके काय झाले? तर गेल्या महिन्यात महाविकास आघाडी सरकारने ‘मेट्रो-३’चे आरेमधील प्रस्तावित कारशेड कांजुरमार्गला हलविले.
भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले आरोप