उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
Read More
कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंवर हक्कभंग! कारवाईंबद्दल काय म्हणाले आमदार प्रसाद लाड
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले गाणे आणि उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी युट्यूबच्या माध्यमातून हेच गाणे पुन्हा टीकात्मक आविर्भावात गाऊन दाखवल्यामुळे त्या दोघांवरही बुधवार, २६ मार्च रोजी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.
उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे माझ्या पक्षप्रवेशासाठी निरोप पाठवला होता, असा गौप्यस्फोट आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. शुक्रवार, २१ मार्च रोजी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात, असा पलटवार आमदार चित्रा वाघ यांनी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे. शुक्रवार, २१ मार्च रोजी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला आहे.
(Beed Case Update) बीडच्या संतोष देशमुख ह्त्याप्रकरणात (Santosh Deshmukh Case) दि. २७ फेब्रुवारी रोजी सीआयडीकडून १८०० पानांचे दोषारोप पत्र बीड सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात १८४ साक्षीदारांचे जबाब आणि ६६ सबळ पुरावे देण्यात आले आहेत. यापैकीच मोकारपंती या व्हॅाट्सअॅप ग्रुपच्या चार सदस्यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत दिलेल्या जबाबातील माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस? असा सवाल करत बीडमधील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(Krishna Andhale) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याचदरम्यान संतोष देशमुखांच्या भावाकडून लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षविरोधी भूमिका घेणार्या, तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग करणार्या आठ पदाधिकार्यांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगन रेड्डींवर तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ केल्याचा आरोप केला होता.
(Sushma andhare) शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘बिग बॉस’मधील एका व्हायरल विधानाचा वापर करत हे खड्डेमय रस्ते महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला. मात्र, सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नसून भारतातीलही नाही, तर थेट चार वर्षांपूर्वीचा चीनमधील आहे. भाजप महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पोस्ट केलेल्या या व्हिडिओमार्फत सुषमा अंधारे यांनी पसरविल्या ‘फेक नॅरेटिव्ह’ची पोलखोल केली आहे. विशेष म्हणजे नेटकर्यांनीही याबाबत माहिती देऊनही सुषमा अंधार
सुषमा अंधारेंना शिवसेना किती माहिती आहे? कोण आहेत या बाई? असा सवाल शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला आहे. यामिनी जाधव यांनी त्यांच्या भायखळा मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यावरून उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे चमकू नेते आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी केली आहे. पुणे अपघात प्रकरणात अंधारे आणि धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर आता सुरज चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
ज्या बाईने बाळासाहेबांचा म्हातारा म्हटलं तिलाच प्रक्षाचा प्रवक्ता बनवलं, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. रविवारी शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भरसभेत सुषमा अंधारेंचा जूना व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
तुम्हाला सर्वात पहिली माझ्या नावाची सुपारी मिळणं हा माझा विजय आहे, असे प्रत्युत्तर उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिले आहे. राज ठाकरेंनी आपल्या सभेत सुषमा अंधारेंचा जूना व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आता सुषमा अंधारेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी पुढे आली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून सुषमा अंधारे सुखरुप आहेत. महाडमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, हेलिकॉप्टमधील पायलटवर उपचार सुरु आहेत.
राजकीय फायद्यासाठी किंवा निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्थ आहे. मात्र, उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना अंधारे यांनी तडस यांचा १७ महिन्यांच्या नातवाला मंचावर उपस्थित केले होते. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे म
उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी मौलवी आणि मौलानाविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. अमेठीतील एका मशिदीचा मौलाना मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवून तरुणीसोबत अश्लील कृत्य करताना पकडला गेला. दुसऱ्या घटनेत छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका दर्ग्याच्या मौलवीविरुद्ध अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिथे क्रॉस असलेल्या मुलींची छायाचित्रेही जप्त करण्यात आली आहेत.
ती बघू शकत नाही, तरी प्रभू श्रीरामांप्रति असलेल्या श्रद्धेमुळे तिने रामाचे सुश्राव्य गीत गायिले आहे. अशा जन्मतः अंध असलेल्या श्रेया शिंपी या हरहुन्नरी विद्यार्थिनीबद्दल...
उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पक्षाला राम राम ठोकल्याने उद्धव ठाकरेंना चांगलाच दणका बसला आहे. काही नालायक लोकांमुळे पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय पक्षात अंधार सेनेचं वर्चस्व निर्माण करण्याची सुरुवात झाली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती दिली.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात गुरुवार, दि. ४ जानेवारीला गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांच्यावर भादवि कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
विधानपरिषदेच्या प्रभारी सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर चुकीचे आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांना उपसभाती सभागृहात बोलू देत नाही, अशा आशयाचा ‘व्हिडिओ’ उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. धंगेकर हे विधान परिषदेचे सदस्य नसल्याने त्यांना बोलू न देण्याचा काही प्रश्नच नाही.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. निनावी पत्राच्या आधारे त्यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेतल्याबद्दल त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या भोवतीच महाराष्ट्राचे राजकारण केंद्रित राहणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले. म्हणजे मी आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहोत, म्हणजे मी राष्ट्रीय नेता नाही? माझ्या भोवती केवळ महाराष्ट्राचे राजकारण फिरणार, भारताचे राजकारण नाही? काही लोक म्हणतात, निवडणुकीत आम्ही दोघे हरणार आहोत. तेव्हा महाराष्ट्राने नाकारलेले नेते म्हणून राजकारण आमच्या भोवती केंद्रित राहील असं संजयला सांगायचे आहे. असो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी (२४ ऑक्टो.) आझाद मैदानात पार पडला. या मेळाव्याची सुरुवात ज्योती वाघमारे यांच्या भाषणाने झाली. ज्योती वाघमारेंनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धवजी तुमचं आडनाव ठाकरे नव्हे वाकरे ठेवा. संजय राऊत यांना शॉक ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. ते भाकरी मातोश्रीची खातात, पण चाकरी राष्ट्रवादीची करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. असा इशारा दिला.
अंबादास दानवे यांच्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषण केले. मी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडत आहे. हा महाराष्ट्र ड्रग्जमुक्त, नशामुक्त झाला पाहिजे. आज सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय. मला नाही अब्रू मी कशाला घाबरु अशी अनेकांची अवस्था आहे. असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय? असा सवाल अंधारेंनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांच्या नातवावर बोललात तर तुमच्या कानाजवळ येऊन डीजे वाजवू, इतका वाजवू की अंधारे यांना खरंच अंधार दिसेल, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली होती. या टीकेवर सुषमा अंधारे यांनी शालिनी ठाकरे यांना ट्विट करत प्रत्त्युत्तर दिलं आहे.
इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी चालत पोहोचले होते. संपूर्ण घटनेचा आढावा त्यांनी घेतला. मृतांच्या कुटुंबाना मदत जाहीर केली. यावरुन सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला ज्योती वाघमारे यांनी प्रत्त्युत्तर केले आहे. भर पावसात राज्याचे मुख्यमंत्री २ तास चालत घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा सुषमा अंधारे तुमच्या डोळ्यावर तेव्हा अंधारी आली होती का? असा संतप्त सवाल वाघमारेंनी केला आहे.
आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. १८ जून रोजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर १९ मे रोजी कायंदेंनी पत्रकार परिषद घेत, ठाकरे गट सोडण्याची कारणे सांगितली. अधिकृत शिवसेना ही शिंदेंचीच आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. असं मनीषा कायंदे यांनी यावेळी सांगितलं.
आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला. ज्यांनी आपल्या देवीदेवतांना शिव्या दिल्या त्यांना उबाठा गटात चेहरा म्हणून वापरलं जातंयं, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. शरद पवारांसमोर अश्रु ढाळुन सहानुभुती मिळवणाऱ्या अंधारेंनी "पवार ढोंगी पुरोगामी!" असं वक्तव्य केलं होत. मात्र, आता ठाकरे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांना याच वक्तव्यांचा विसर पडला आहे.
आधी वारकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटल्या आहेत. आषाढी वारी २०२३ साठी वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखींचे आज १२ जून रोजी पुणे शहरात आगमन झाले. यादरम्यान पालखी सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दिंडीत पंगत सेवा दिली.
सुषमा अंधारे यांच्यावर संजय शिरसाट यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत. त्यामुळे अंधारे यांनी गौतमीला सपोर्ट केला. इमानदारीने पोटासाठी कला सादर करते म्हणून ती वाईट आहे, असे मी म्हणणार नाही. ती तिच्या पोटासाठी खूप महत्त्वांच काम करत आहे. कुणाचा तळतळाट घेऊन वाभाडे काढून नाव ठेवून सुषमा अंधारे यांनी तिची लोकप्रियता जपली आहे, असे शिरसाट म्हणाले.
कर्नाटकात भाजपचा पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मविआमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंसह उद्धव ठाकरेंना इशारा दिलेला आहे. मिटकरी म्हणाले की, उद्धवजी मी तुमचा आदर करतो.पंरतू आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. अन्यथा गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील, असा इश
इतक्या मोठ्या अॅक्टरला मारहाण झाली, ऐकून वाईट वाटलं. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे मारहाण प्रकरणावर दिली आहे. संजय शिरसाट यांनी खोचक शब्दांत अंधारेंवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विकायला काढल्याने आपण त्यांना दोन चापट मारल्या असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला.
जसा पक्षप्रमुख तसे नेते, सुषमा अंधारेंची यात काही चूक नाही. असं म्हणत आ. नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दादागिरी करतात म्हणून त्यांना दोन कानशिलात लगावल्याचा दावा केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. यावर नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"जिकडं राशन तिकडं भाषण! सुषमाताई हे खरं आहे का?" असं म्हणत शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे, बीड जिल्ह्यात झालेला सुषमा अंधारे यांच्याबरोबरचा प्रकार धक्कादायक आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे खरे आहेत का? सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का? महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला अवकाळी पाऊस पडला तरी सुषमा अंधारे म्हणतील ही शिंदे गटाची स्क्रिप्ट आहे. असं म्हणत ज्योती वाघमारेंनी अंधारेंवर निशाणा साधला
सुषमा अंधारेंनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा, तिथं शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा, भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्यांच्यापुढं जाऊन रडा. अशी टीका सुषमा अंधारेंवर केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांची तक्रार केली. “माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होऊनही विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला नाही.” अशी तक्रार सुषमा अंध
साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ही उपस्थित होते.त्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांची तक्रार केली. महिलांविरोधात अश्लिल भाषेत टिका केली जात असतांनाही विरोधी पक्षातील नेत्यांनी विधीमंडळात हा विषय काढला नाही. असं म्हणत सुषमा अंधारे भावुक झाल्या. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी टिकास्त्र सोडलं आहे. मिटकरी म्हणाले की, दादा विरूद्ध रडलो तरी मीडियात प्रसिद्
साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी आपल्याला आलेले अनुभव सांगताना सुषमा अंधारे यांना अश्रू आवरत नव्हते. या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. आणि त्यांना अश्रु अनावर झाले.
पालकमंत्री बालक मंत्र्यांसारखे वागत असतील तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे हिंदुत्वाच्या नावाने बेगडी प्रेम दाखवलं जात आहे. नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणता येत नाही. असं ही त्या म्हणाल्या.
उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली दहा कामं दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा. असे म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. याच टीकेचा समाचार गजानन काळे यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेले आहेत. तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आजही भरला जाऊ शकतो. त्यामुळे याचं राजकारण करू नये. आयोजकांनी सकाळची वेळ घ्यायची नव्हती. हा एक अपघात आहे. या अपघाताचं काय राजकारण करायचं? असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या विधानावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्राद्वारे पलटवार केला आहे.
मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. ते ट्विट मध्ये म्हणाले, "सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी आहेत." तसंच दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्यानंतर शिवसेनेचे ‘धनुष्य’ पेलू न शकणार्या उद्धव ठाकरे यांनी मूळ शिवसेनेच्या विचारांनाच मुठमाती दिली. निमित्त होते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचे! उद्धव यांनी खुर्चीच्या मोहात शिवसेनेचे सत्व सोडले. त्यामुळे सत्तेत असूनही मूळ शिवसैनिकांत असंतोष खदखदत होता. त्यातूनच एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत संपूर्ण शिवसेनाच ताब्यात घेतली. आजघडीला उद्धव यांच्याकडे पक्षही नाही, चिन्हही नाही, आमदार-खासदार आपल्या कार्यकर्त्यांसह
अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याबद्दल महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.महानुभाव पंथाचे महंत व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महानुभाव पंथाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या सभेत बच्चू कडू यांच्यावर टीका केली हेाती. त्याला कडू यांनी प्रत्युत्तर दिले. "अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमी आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेने मला मदत केली. माझ्या विरोधात शिवसेनेकडून अनंत गुडे उभे होते, त्यांना १९ हजार मते मिळाली आणि डिपॉझिट जप्त झाले, हे सुषमाताईंना माहिती नाही." असे कडू म्हणाले.
जे उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या हातचे शिवबंधन टिकवू शकले नाहीत, ते आता मोदीविरोधकांच्या महागठबंधनाची गाठ घट्ट करण्याची भाषा करू लागले. याकुब मेमनचे समर्थन ते आता खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालणार्या केजरीवालांच्या ‘मातोश्री’वारीने, ठाकरेंची चुकलेली राजकीय दिशा आणि दशाच पुनश्र्च अधोरेखित होते.