Ram Navami प.बंगाल राज्यातील कोलकाता हावडा पोलिसांनी अंजनी पुत्र सेनेला राम नवमी (Ram Navami) साजरी करू दिली नाही. तर दुसरीकडे याच पोलिसांनी ईद दिवशी मिरवणुकीला परवानगी दिली होती. राम नवमी साजरी करताना त्यांना रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास विरोध केला होता. २०२२ आणि २०२३ मध्ये जातीय हिंसा झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षीही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले होते.
Read More
Howrah Rape Case आर जी कर प्रकरणामुळे देशातील वातावरण तापले आहे. अशातच आता हावडा येथील एका रूग्णालयात एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून सीटी स्कॅन विभागात नुकताच कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने हे कृत्य केले. ही घटना २८ ऑगस्ट रोजी संबंधित रूग्णालयात घडली. त्याच दिवशी हा संबंधित प्रकार उघडकीस आला होता
हावड्यावरुन मुंबईकरीता रवाना होणाऱ्या एक्सप्रेसचा भीषण आपघात झाला आहे. यात ३ जणांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाले आहेत. झारखंडच्या चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान-बदाबांबो या स्थानकादरम्यान ट्रेनचे १८ डबे रुळावरुन घसरले.
नवी दिल्ली : जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान पश्चिम बंगालमधील हावडा येथील संकरेलमध्ये रथ यात्रेस परवानगी न दिल्याबद्दल कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलिसांनी घातलेल्या अटी धार्मिक प्रथेमध्ये हस्तक्षेप केल्यासारख्या आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वे स्थानकाजवळ दि. २ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा रेल्वे अपघात झाला . या अपघातात स्टेशनजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात रेल्वेमध्ये २८८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले.
ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या अपघातात एक रेल्वे रुळावर हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. यामुळे ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. हे डबे दुसऱ्या रेल्वे रुळावर पोहोचले. याच ट्रॅकवरून यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेन येत होती. या ट्रेनची रेल्वे रुळावर पडलेल्या डब्यांना धडक बसली आणि या तीन रेल्वेच्या अपघातात जवळपास २५० प्रवाशांचा मृत्यू झाला.
रामनवमीच्या रथयात्रेवेळी महाराष्ट्र, गुजरातनंतर आता पश्चिम बंगालच्या हावडा भागात हिंसाचार झाला आहे. प्रशासानातर्फे हिंसाचार शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा पुन्हा हिंसा उफाळून आली होती. शिवपूर पोलीस ठाण्यानजीक गुरुवारी हिंसाचार उफाळून आला होता.
हावडा आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात गुरुवारी रामनवमी मिरवणुकीदरम्यान हिंसक संघर्ष झाला. हावडामधील शिबपूर आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील दालखोला येथेही हिंसाचार झाला. हावडा येथील शिबपूरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक घरांच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करताना दिसत आहेत.
त्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करून या दोन्ही रेल्वेमार्गांना आधुनिक बनविण्याचे काम हाती घेतले आहे
‘जय श्रीराम’ घोषणा दिल्याने भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव समतुल डोलाई असे असून त्याचा मृतदेह सरपोत गावानजीकच्या शेतामध्ये आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.