जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी दिले आहेत.
Read More
खुन्यालाही खून करताना पूर्ण खात्री आहे की कोण अडवणार? राज्यकर्ते औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करू शकणार नाही. पण, येथील नागरिकांना आपण औरंगजेबाच्या राज्यात राहतो, असे तरी किमान वाटता कामा नये
पाकिस्तानची सोशल मीडिया मॉडेल कंदिल बलोचची हत्या दि. १४ जुलै, २०१६ साली तिच्याच भावाने वसीम अजीमने केली होती. तिच्यामुळे घराण्याची इज्जत गेली, लोकं नावं ठेवतात, म्हणून तिचा गळा दाबून तिला ठार मारले, असे वसीमने पोलिसांना गुन्हा कबुल करताना सांगितले.
पोकळ जातभिमानाची सामाजिक विकृती औरंगाबादमधील वैजापूरमध्ये दि. ५ डिसेंबर रोजी एका युवतीची तिच्या भावाने आणि आईनेच अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या केली. या खुनाला, गुन्ह्याला नेहमीप्रमाणे ‘ऑनर किलिंग’चे नावही दिले गेले. पण, शेवटी खून म्हणजे खूनच! एखाद्याचा जीव घेऊन इज्जत कशी वाढू शकते? पोटच्या मुलीबाळीची हत्या करून समाजात सन्मान कसा मिळू शकतो? खोट्या प्रतिष्ठेपायी एखाद्याचा जीव घेणे ही भयंकर विकृती आहे. या विकृत मानसिकतेवर भाष्य करणारा हा लेख...
संयुक्त अरब अमिराती किंवा अरब देशांकडे उत्पन्नासाठी पाणी नाही की धान्य नाही. ब्राझीलची साखर वा इस्रायलचे जल व्यवस्थापन तंत्रज्ञान यांसारखे अरब देशांकडे काही नाही. असे असताना उर्वरित जगाचा आपल्याशी संबंध कोणत्या कारणाने होऊ शकतो, हा मोठा प्रश्न या देशांपुढे आहे. त्याचे उत्तर शोधण्याची धडपड हे देश करत असून युएईतील वैयक्तिक स्वातंत्र्य देणारे कायदे त्याचाच दाखला.
विराज जगताप या मुलाचा पिंपरीच्या पिंपळे सौदागर येथे खून झाला. जातीयवादाच्या विषवल्लीने निर्दोष विराजचा हकनाक बळी घेतला. ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली चालणारे हे क्रौर्य कधी थांबणार? या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच! या असल्या घटनांचे राजकारण केले जाते. पण, त्याचा समाजावर काय परिणाम होतो, प्रत्यक्ष गुन्हेगार आणि बळी यांच्या घरातल्या आई-बहिणी, लेकी-सुनांचे काय होते? हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?
इराणच्या तलेश शहरातील १४वर्षांची रोमानिया तिच्या ३५वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर त्या दोघांनाही शोधण्यात आले. रोमानियाला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले खरे, पण त्याच रात्री रोमानियाच्या पित्याने तिचा खून केला. यावर इराणमध्ये वादळ उठले.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला आता सरकारकडून मिळणार अडीच लाखांपर्यंतची मदत.
जागतिक आर्थिक मंचाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल जेंडर गॅप’ अहवालामुळे पाकिस्तानमधील महिलांविषयक काही विस्मयजनक आकडेवारी समोर आली आहे. त्या आधारे पाकिस्तानमधील महिलांच्या दुर्दशेवर भाष्य करणारा हा लेख...
समाजात लग्नाच्या आड इज्जत, प्रतिष्ठा वगैरे जपण्यासाठी काय काय केले जाते, याचा वेध घेतला की मन सुन्न होते.
प्रेम करणे हा गुन्हा आहे का? हा फार आदिम काळापासून विचारला गेलेला प्रश्न. जातपात, धर्म, वंश, वर्ण आणि वर्ग या सर्वच स्तराच्या पातळीवर हा प्रश्न आजही समाजात भस्मासूर बनून राहिला आहे. आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, यामध्ये वंशशुद्धीपेक्षा लोक काय म्हणतील ही भावना प्रबळ झाली आहे.