महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ताफ्यात लवकरच लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या बस आगामी काळात नाशिक किंवा मुंबई मार्गावर धावण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ५ डिझेल बसेसचे एलएनजी बसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळेच नाशिक आणि मुंबईतील पुरवठादारांकडून कोटेशन मागवण्यात आले आहे.
Read More
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, डिसेंबर,२०२३ अखेरीस राज्यात ३ लाख ९४ हजार ३३७ बॅटरी इलेक्ट्रोनिक वाहनांची नोंदणी झाली आहे.
काँग्रेसशासित कर्नाटकात राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी कर लावला आहे. यासोबतच पेट्रोलचा दरही १०२.८५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. वृत्तानुसार, कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर अनुक्रमे ३ रुपये आणि ३.२० रुपयांनी वाढवला आहे. या आदेशानुसार पेट्रोलवरील विक्रीकर २५.९२% वरून २९.८४% आणि डिझेलवर १४.३४% वरून १८.४४% करण्यात आला आहे.
एंड्रोट आणि कल्पेनी या बेटांसाठी पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किमतीत प्रति लिटर १५.३ रुपये आणि लक्षद्वीप बेटांमधील कावारत्ती आणि मिनिकॉयसाठी ५.२ रुपयांनी प्रतिलीटर कपात करण्यात आली आहे. ही कपात दि. १६ मार्चपासून लागू होणार आहे. लक्षद्वीपच्या सर्व बेटांवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता पेट्रोलसाठी १००.७५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलसाठी ९५.७१ रुपये प्रति लिटर असेल.
"काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी १.४१ लाख कोटी रुपयांचे तेल रोखे जारी करण्यात आले होते, ज्यासाठी मोदी सरकारने ३.५ लाख कोटी रुपये दिले आहेत." अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना दिली.
देशात इंधनाचे दर सतत खाली वर होत असतात. त्यात देशातील विविध शहरांत त्याची किंमतसुध्दा निरनिराळी असते. त्यामुळे प्रत्येक शहरातील इंधनदरात तफावत आढळून येते. दरम्यान, मुंबई शहरातील पेट्रोलच्या किंमत ही दिल्लीच्या पेट्रोल किंमतीपेक्षा १० रुपयांनी अधिक आहे. म्हणजेच. मुंबईपेक्षा दिल्लीत पेट्रोल जवळपास १० रुपयांनी स्वस्त आहे. तसेच, ऑगस्टच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल कंपन्यांनी दर जाहीर केले आहेत.
पंजाबमध्ये पेट्रोल ९२ पैशांनी तर डिझेल ८८ पैशांनी महागले आहे. कर आकारणी विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे पंजाब सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे.राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे एक रुपयाची वाढ केली आहे. वाढलेले दर मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होतील.
देशात २०१७ पर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालून देशाने इलेक्ट्रिक आणि गॅसवर चालणारी वाहने वापरण्यास सुरुवात करावी, अशी शिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने स्थापन केलेल्या माजी तेल सचिव तरुण कपूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे.
ठाणे मनपा परिवहन (टीएमटी) उपक्रमाचा 2023-24या आर्थिक वर्षाचा 487.68 कोटींचा मूळ अर्थसंकल्प परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी परिवहनला समिती सभापती विलास जोशी यांना सादर केला. यात ठाणेकरांच्या सेवेत टप्प्याटप्प्याने नवीन इलेक्ट्रिक बस प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार, या बसचे तिकीटदेखील कल्याण, नवी मुंबईच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर कमी होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास स्वस्त स्वस्त..कुल कुल होणार आहे. याशिवाय, प्रवासी संख्या वाढविण्यासाठी, दिवा-वा
कंगाल झालेल्या पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला असून इंधनाच्या किमतींचा भडका उडाल्याने देशभरात असंतोष वाढत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधनाचे दर तब्बल १२ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल २२.२० रुपयांनी वाढून २७२ रुपये प्रतिलीटर इतके महाग झाले आहे.‘हायस्पीड डिझेल’च्या किमतीत १७.२० रुपयांनी वाढ केल्याने त्याची किंमत २८० रुपये प्रतिलीटर झाली आहे.
राज्यात नव्याने आलेल्या फडणवीस-शिंदे सरकारने अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात मोठा निर्णय घेतलाच. गुरुवारी (दि. १४ जुलै) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याबाबत जाहीर केले. विशेष म्हणजे फडणवीस-शिंदे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करत खा. संजय राऊत यांनी त्याचे स्वागत केले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नागपूर दौऱ्यावर असताना ते यासंदर्भात पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावर आल्यानंतर राज्यात कोणते नवे बदल पाहायला मिळणार याकडे सर्व जनतेचे लक्ष्य होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला
नाशिकचे उपक्रमशील असलेले सुरेश कपाडिया जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पवन ऊर्जा प्रक्लपाच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करणार आहेत.
सध्या भारतात पावसाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्याचवेळी जागतिक स्तरावर वाढलेल्या महागाईने होरपळलेल्या सामान्य लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनालाही अखेर जाग आली असून रविवार दि. २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रतिलीटर कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
आपण धूर्त राजकारणी आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. आताच्या कर कपातीचे गाजर दाखवून जनतेला राज्य सरकारकडून प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळणार नाही याची काळजी घेत ठाकरे यांनी पुन्हा तेच दाखवून दिले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुळात ठाकरे सरकारने कर कपातीचा केवळ कागदावरच गाजावाजा केला असून ही कर कपात प्रत्यक्षात आणून जनतेला दिलासा देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी करण्यातही ठाकरे सरकार टाळाटाळ करीत आहे, असेही ते म्हणाले.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कपात करण्याची घोषणा केली आहे.
पेट्रोल-डिझेलवरील करकपातीबाबत चर्चासुद्धा नाही!
केंद्राकडे बोट दाखवताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावरून प्रत्युत्तर दिले.
"महाराष्ट्र सरकारने कुठलाही कर वाढवला नसून, उलट गॅस वरील कर साडेतेरा टक्क्यांवरूनतीन टक्क्यांवर आणला आहे, त्यामुळे राज्य सरकारने कर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत हे वक्तव्य निराधार आहे" असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे
विरोधकांना सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्याची इच्छा नसून त्यांना केवळ टिका करायची असल्याचे पुरी यांनी म्हटले आहे.
ट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांवरून शेवटी पंतप्रधान मोदींनी राज्यांना विनंती केली. राज्यांनी करांचे दर कमी करावेत म्हणजे नागरिकांना भुर्दंड कमी पडेल असे पंतप्रधान म्हणाले
"गेल्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा भारत सरकारने इंधनाच्या किमतींवरील उत्पादन शुल्क कमी केले, तेव्हा राज्यांना कर कमी करण्याची विनंती केली होती, परंतु महाराष्ट्रासह बिगर-भाजप शासित राज्ये ही केवळ नागरिकांच्या त्रासाच्या किंमतीवर नफा मिळविण्यात व्यस्त आहेत.", असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी (दि. २७ एप्रिल) त्यांनी केलेल्या ट्विट्सवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट' कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.", अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी (दि.२९ मार्च) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्था आता पुनरुज्जीवनासाठी सज्ज आहे. मात्र, कच्च्या तेलाची चढती किंमत ही नक्कीच चिंतेची बाब आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महागाईचा मुख्य चालक इंधनाची किंमत आहे. कारण, यामुळे वाहतूक-मालवाहतूक खर्च वाढतो. परिणामी, अनेक वस्तू महाग होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीवरून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याविषयी सविस्तर...
पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्यातल्या अनेक मंत्र्यांना आता २५ लाखांपर्यंतची ई-व्हेईकल घेता येणार आहे. त्याचप्रमाणे दौऱ्यावर येणारे मंत्री व राज्य अतिथींनासुध्दा याचा लाभ घेता याणार आहे.
“पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंतर्गत आल्यास त्यांच्या दरांमध्ये घट होईल. केंद्र सरकारचा तसा प्रस्ताव असून सर्व राज्यांनी त्याची संमती दिल्यास केंद्र सरकार तसा निर्णय घेईल,” असे प्रतिपादन रस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले.
नुकतीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. केंद्र सरकारने पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात ५ रुपयांनी तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात १० रुपयांनी कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल ह्या अत्यावश्यक इंधनांच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ देशातील अकरा राज्यांनी मूल्यवर्धित करकपात करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.
उत्पादन शुल्क कपातीने जनतेची चेष्टा केल्याचे संजय राऊत म्हणाले. ते खरे असेल तर प्रत्येक बाबतीत केंद्रावर कडी करण्याची हौस असलेल्या ‘बेस्ट सीएम’ उद्धव ठाकरेंनी मोठे मन दाखवत पेट्रोल-डिझेलचे दर २० ते ३० रुपयांनी घटवावे. म्हणजे, त्यातून त्यांची सर्वसामान्य जनतेबद्दलची कळकळही दिसेल आणि भाजपसह केंद्र सरकारवर मात केल्याचे मानसिक समाधानही लाभेल.
शहर पोलिसांनी प्रस्तावित केलेल्या ’नो हेल्मेट, नो पेट्रोल’ योजनेत हेल्मेटशिवाय इंधन देऊ नये, असे म्हटले होते. पोलिसांच्या या निर्णयावर पेट्रोलपंप संघटनेच्यावतीने आक्षेप घेण्यात आल्यावर आता दि. १५ ऑगस्टपासून प्रत्येक पेट्रोलपंपावर पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पेट्रोल डिझेल च्या दरवाढीवरून केंद्र व राज्य सरकार यांच्यात घमासान सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि विरोधी पक्षही त्यावरून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाने इंधनावरील अबकारी कर कमी करण्यासाठी योजना आखली आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ झालेली नाही.
चार राज्यांनी पेट्रोल डीझेलवरून वॅट कमी करण्याचा निर्णय घेतला मात्र, महाराष्ट्र सरकार हे कधी करणार? असा प्रश्न विचारला जात आहे
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी सायकल चालवून निषेध केला. सोबतच पत्रकारांचा फौजफाटा घेऊन ते मुलाखत देण्यासाठी निघाले होते. मात्र, यात वाड्रांची मुलाखत घेत असताना इंडिया टुडे पत्रकार मौसुमी सिंग यांना थेट टीव्हीवर गोंधळाचा सामना करावा लागला. वाड्रा सायकलवर आहेत, म्हटल्यावर आपणही सायकल चालवूनच मुलाखत घ्यावी, असा अट्टाहास त्यांनी धरला होता. मौसुमी सिंग यांनी सायकल चालवण्याचा प्रयत्न केला मात्र, असे काहीतरी घडले की लोकांनी त्यांची थट्टा करायला सुरु
रामजन्मभूमीची जागा देशातल्या कोट्यवधी रामभक्तांनी स्वतःच्या हिंमतीवर मिळवली आणि राम मंदिरदेखील रामभक्तांच्याच सहकार्याने साकार होत आहे. त्या रामजन्मभूमीचा, राम मंदिराचा आणि निधी संकलनाचा उल्लेख करण्याचीही सोनियाम्मा आणि पवार काकांच्या पायाशी लोळण घेतलेल्या लाचारसेनेची पात्रता नाही, हे शिवसेनेने व त्यांच्या बोरुबहाद्दरांनी लक्षात ठेवावे.
पेट्रोल-डिझेलचे दर थांबण्याचे नाव घेत नाहीत. आज सतत १२ व्या दिवसात इंधनदरवाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल ९०.५९ रुपये, मुंबईत ९७ रुपये प्रतिलीटरवर पोहोचले आहे. दिल्लीत शनिवारी ३९ पैसे आणि डिझेल ३७ पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचे दर ९६.३२ रुपये तर डिझेल ८७.३२ रुपयांवर पोहोचले. राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर १०१.२२ आणि मध्यप्रदेशच्या अनूपनगरात १०१ रुपयांवर पेट्रोल पोहोचले आहेत. फेब्रुवारीत पेट्रोलने पहिल्यांदा ४ फेब्रुवारी रोजी उच्चांक गाठला होता. १७ दिवसांत पेट्रोलचे दर १४ वेळा वधारले आहेत.
गेल्या वर्षात २० फेब्रुवारी २०२० रोजी कच्च्या तेलाचे दर हे ५९ डॉलर प्रतिबॅरल होती. ती थेट वर्षभरानंतर ६४ डॉलरवर पोहोचली आहे. वर्षात हा दर ८.४७ टक्क्यांनी वाढली आहे. जर पेट्रोलचा विचार केला तर ते २५ टक्क्यांनी महागले आहे. फेब्रुवारी २०२० रोजी ७२ रुपये प्रतिलीटर होते आता हे दर शंभरी गाठत आहेत. मे २०२० मध्ये सरकारतर्फे पेट्रोलवर १० तर डिझेलवर १३ रुपये एक्साईज ड्युटी वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असून जनसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. दरवाढ याच गतीने होत राहिल्यास पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरीही पार करतील आणि महागाईचा भडका उडेल. या दरवाढीवरुन राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे सामान्यांनाही या दरवाढीमागे नेमके जबाबदार कोण, हे समजण्याचा मार्ग नाही. तेव्हा, इंधन दरवाढ नेमकी का होते? त्यामागे कोणती ठोस कारणे आहेत? इंधनावर कर कसा आकारला जातो? यांसारख्या अगदी जनसामान्यांना भेडसावणार्या प्रश्नांची या लेख
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने गुरुवारी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. यावेळी पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात आंदोलना पटोले यांनी म्हटले की, "मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवरुन नेहमी टिवटिव करणारे आता पेट्रोल दरवाढीनंतर कुठे गेले आहेत? इंधन दरवाढीनंतरही चित्रपट सृष्टीतील अभिनेते शांत कसे? असा सवाल त्यांनी केला."
सध्याचे इमरान खान सरकार उलथून टाकण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी मौलान फजलुर रहमान उर्फ ‘मौलाना डिझेल’ याची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता या डिझेलच्या भडक्यात अगोदरच कमकुवत झालेले इमरान खान होरपळणार का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
काँग्रेसतर्फे इंधनदरवाढ विरोधात देशभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन केले जात आहे. पेट्रोल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार, असो अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारनेच पेट्रोलच्या किमतीवर एप्रिल महिन्यात अधिभाराची रक्कम वाढवली होती याचा काँग्रेस नेत्यांना विसर पडला कि काय, अशी सध्याची अवस्था आहे.
स्थानिक वेब पोर्टलने केला खुलासा
महसूलवाढीसाठी राज्य सरकारचा निर्णय; प्रत्येकी २ रुपयांनी वाढणार दर!
गुहावटी : कोरोनाशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे, इतर देशांमध्येही असलेल्या लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलांच्या किमतीत घट झाली आहे. दरम्यान, कोरोना महामारीशी (Coronavirus Pandemic) लढण्यासाठी नागालँड सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोविड-19 सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल ६ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ५ रुपये प्रतिलिटरने वाढले आहे.
तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. सध्या चालू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे उत्पादन आणि निर्यात थंडावली आहे. गेल्या वर्षी भारताने ११२ अब्ज डॉलर किंमतीच्या कच्च्या तेलाची आयात केली होती. यावर्षी हा आकडा अर्ध्याहून कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी सामान्य माणसासाठी पेट्रोल स्वस्त होईल, ही भ्रामक कल्पना आहे.
कोरोना’ विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरेबियामधील सुरू असलेले कच्च्या तेलासंदर्भातील ‘प्राईस वॉर’ याचा भारताला काही प्रमाणात फायदा होणार असल्याचे संकेत आहेत. कारण, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात झाल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. देशातील तेल आयात खर्च २०२०-२१ मध्ये घटून ६४ अब्ज डॉलरवर येण्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. ही तुलना २०१८-१९ मध्ये ११२ अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर कमी होण्याचा अंदाज मांडला आहे.
पेट्रोल डिझेलचे दर घसरले मात्र महाराष्ट्रामध्ये व्हॅट वाढवण्यात आला
जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे काल दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किमतीत अनुक्रमे १२ आणि ११ पैशांनी, तर डिझेलच्या किमतीतही कपात करण्यात येणार आहे.
भारतापुरते बोलायचे तर देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा सुमारे ७ टक्के असून औद्योगिक क्षेत्रातील वाटा सुमारे ४९ टक्के आहे.
वाहन उत्पादन क्षेत्रात देशातील सर्वात मोठी कंपनी मारूति सुझूकीने मंगळवारी नव्या एर्टीगाचे अनावरण केले. कंपनीने या कारला दीड लीटर इंजिनला पर्याय म्हणून बाजारात आणले आहे. पूर्वीपेक्षा अद्यावत वैशिष्ट्यांसह ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. दिल्लीत या कारची किंमत ९.८६ लाखांपासून ११.२० लाख इतकी आहे.