भारताच्या ईशान्य भागाचा विकास हा भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा महत्त्वाचा घटक आणि या प्रक्रियेत जपानने सातत्यपूर्ण व सकारात्मक सहभाग नोंदवला आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे जपानने ईशान्य भारतात आपली उपस्थिती ठळकपणे अधोरेखित केली आहे. त्याचे आकलन...
Read More
भारत जागतिक मुत्सद्देगिरीच्या यादीत ११व्या स्थानी पोहोचल्याची माहिती नुकतीच समोर आली. लोकसंख्येच्या तुलनेत कमी राजनैतिक अधिकारी असतानाही भारताने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण हे भल्याभल्यांना अचंबित करणारे ठरले. म्हणूनच भारताची मुत्सद्देगिरीच्या क्रमवारीत सुधारणा झाली. नवनवीन देशांशी संबंध प्रस्थापित करत ‘ग्लोबल साऊथ’चा निर्विवाद नेता ही भारताची नवी ओळख यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
ईशान्येतील राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना गेल्या नऊ वर्षांपासून राबवत आहे. त्याचा दृश्य परिणाम तेथे आता दिसून येत आहे. काँग्रेसने विकासापासून या भागाला हेतूतः दूर ठेवले. तथापि, केंद्र सरकारने या भागासाठी विशेष धोरण आखत येथील सर्वच सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न केले. परवाच्या संसदेतील चर्चेतूनही ईशान्येसाठीची मोदी सरकारची हीच ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ अधोरेखित झाली.
बांगलादेशच्या निर्मितीत भारताची महत्त्वाची भूमिका होती. एवढेच नाही, तर बांगलादेशला मान्यता देणारा पहिला देशही भारतच होता. डिसेंबर १९७१ साली स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेशने भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणताही देश असो तो भावनेपेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देत असतो. बांगलादेश आपल्या फायद्यासाठी भारतासोबत चीनसोबतही जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडले, अशा बातम्या पेरूनही त्याचा काहीही परिणाम होत नाही. दरम्यान
मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात ईशान्य भारतातील विकासकार्यात अभूतपूर्व वाढ झाली आहे. त्यामुळे आता ही राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत मागे आहे, असा दावा कोणीही करू शकत नाही. तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने ईशान्य भारतातील विकासचक्राचा घेतलेला हा आढावा...
आज डॉ. मुखर्जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याची वेळ आली असून त्यांची जीवनमूल्ये, आदर्श आणि दूरदर्शी विचार अंगीकारण्याची गरज आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांमध्ये राजकीय सहिष्णुता होती आणि राष्ट्रवादाचीही खोल भावना होती.
‘आसियान’शी जोडले गेल्यामुळे पूर्वांचलातील जमीन आणि लोकांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेचा आपल्याला कार्यक्षमतेने वापर करता येणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रकल्प पूर्वांचलासाठी महत्त्वाचे आहेत. नॉर्थ ईस्टकडे लक्ष दिल्याने ‘अॅक्ट ईस्ट’ दृष्टिपथात आले आहे.
आपण सर्व विकसनशील आणि कृषीप्रधान देश आहोत. आपल्याला एकमेकांसोबतच पुढे जायचे आहे.