Holi झारखंडमधील गिरडीहमध्ये शुक्रवारी १४ मार्च रोजी म्हणजेच धुलीवंदना दिवशी कट्टरपंथींनी होळी उत्सवादरम्यान दगडफेक केली. यामुळे घटनास्थळी सध्या तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये दोन-तीन दुचाकी पेटवण्यात आल्या आणि काही कारचाही यामध्ये समावेश आहे. संबंधित घटनेची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ही घटना घोडबंद येथे घडली असून एका कट्टरपंथी जमावाने मिरवणुकीवर हल्ला केला. त्यामुळे वादंग निर्माण झाला.
Read More
(Priyanka Chaturvedi on SpiceJet Holi Celebration) देशभरात १४ मार्चला धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान १३ मार्चला राजधानी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांनादेखील होळीचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सकडून प्रवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सगळ्यावरुन स्पाइस जेटवर निशाणा साधत टीका केली आहे.
Asiduddin Owaisi जिल्ह्यात होळीनिमित्त गुरूवारी १३ मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही हिंदू लोक हे मशिदीच्या गेटजवळ लाकडी ओंडका घेऊन जाताना दिसत होते. याबाबत मोहम्मद जुबैर असदुद्दीन ओवैसी आणि काही इस्लामिक कट्टरवादी संघटनांनी दावा केला की, हिदूंनी मशिदीवर हल्ला केला. हे सर्व होळी सणाच्या दिवशीच घडले.
आज होळीचा सण! त्यामुळे आता रंग, पिचकारी अशा विविध साधनांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, दिवसेंदिवस हा सण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करूनच साजरा केला जात आहे. त्यामध्ये होळीसाठीची सामग्री असो किंवा रंगपंचमीचे रंग असो. हे सारे काही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात कोणतीही कमतरता न ठेवता कसे साजरे करायचे याचा घेतलेला आढावा...
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही.
चतुरंग प्रतिष्ठान प्रस्तुत होलिकोत्सव ' रंग आमुचा वेगळा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर परिसरातील सुयोग मंगल कार्यालय, येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 'दोस्त म्हणतो' या सदराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विजय बेंद्रे, मेघांत, रोहन कोळी, इंद्रजित उगले, आकाश सावंत, हे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना
Holi Festival म्हटली की धुळवड आलीच.मात्र, रासायनिक रंगांचा बेरंग टाळुन नैसर्गिक रंगानी होळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक रंगांची कार्यशाळा आयोजित करून निसर्गातील रंगांचा प्रचार व प्रसार करून जनजागृती सुरू केली आहे.
Holi Festival जनचेतना जागृती पर्व,म्हणजे होळी.संपूर्ण भारतभर पौराणिक काळापासून हा उत्सव मोठया उत्साहाने साजरा होतो.या लेखात प्रभू रामचंद्राची अयोध्येतील होळी,भगवान श्रीकृष्णाची वृंदावनातील होळी तसेच भगवान शंकर व पार्वतीची होळी या संबंधी उपलब्ध काव्य संकलन केले आहे.
कोणत्याही देशासाठी त्या देशातील नागरिकांची राष्ट्रनिष्ठा हा फार मौल्यवान घटक असतो. मात्र, गेल्या ७५ वर्षांच्या काळात देखील, भारतातील अनेक नागरिकांच्या मनात देशाविषयी प्रेम नाही. याचे प्रत्यंतर अनेक घटनांमधून दिसून येत असते. त्याला निमित्त कधी क्रिकेटचा सामना असतो, कधी सण, तर कधी प्रांतीय, भाषिक अस्मिता...
( holi in thane ) होळीनंतर धुळवडी दिवशी पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात केला जातो. उच्चभ्रू सोसायटीमध्ये तसेच काही राजकीय वरदहस्त लाभलेल्या वस्त्यांमध्ये रंगपंचमीसाठी पाण्याच्या टँकरची मागणी जोरात असते. पाण्याची धुळवड रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. यादिवशी टँकरद्वारे होणार्या पाणीपुरवठ्यावर बंदी घातली असून रंगपंचमीसाठी कुणीही टँकरवाल्याला बोलावू नये, असा फतवाच प्रशासनाने काढला आहे.
( holi ) होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा मुंबई पालिकेने दिला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विशेषतः कोकणातील गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि यात ट्रेनचे तिकीट न मिळणे, रेल्वेला प्रचंड गर्दी यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात. याच पार्श्वभूमीवर कोकणात गावी येण्यासाठी मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई येथील चाकरमान्यांना सोप व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या
Holi Festival उत्तर प्रदेशात संभलमध्ये असणाऱ्या स्थानिक मुस्लिमांना एक दिवस म्हणजेच हिंदूंच्या होळी सणादिवशी बाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यावरून आता सपा नेत्याने उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेत आल्यानंतर सीओ चौधरीला तुरूंगात टाकणार असल्याचा दावा गुरूवारी ६ मार्च २०२५ रोजी केला आहे. १४ मार्च रोजी जुम्मा अदा करू नये असे आवाहन करण्यात आले आणि होळीदिवशी बाहेर न पडण्याचे पोलीस प्रशासनाने सांगितल्याने सपा नेते राम गोपाल यादव यांना मिरची लागल्याचे दिसून आले आहे.
Aligarh Muslim University च्या प्रशासनाने होळी खेळण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत दाद मागणार आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हिंदूंविरोधात भेदभावाचे धोरण स्वीकारत आहेत. हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना आक्षेप नाही, तर विद्यापीठाच्या आवारात मुस्लिम सण साजरे केले जात आहेत. मग हिंदू धर्मांना विरोध का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाणे जिल्ह्यात साजरा होणाऱ्या होळी आणि धुलीवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे तसेच जाळण्यास मनाई करण्यात आली आहे.
Holi Festival उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात हिंदूंचा होळी (Holi Festival) सण सुरू होण्याआधीच कट्टरपंथींयांनी राडा केला. बरदानी ठाणे क्षेत्रातील हजियापुर वस्तीत काही कट्टरपंथींनी हिंदूंवर हल्ला केला. होळी हा सण जवळ आल्याने सणाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. मात्र, कट्टरपंथींनी जर होळी साजरी केली तर मुडदे पाडू अशी धमकीच दिली आहे. यामुळे आता परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी पोलिसांनी वादंग निर्माण करणाऱ्या कट्टरपंथींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Holi पाकिस्तानातील कराचीतील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने कॅम्पसमध्ये हिंदूंचा होळी सण साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापक वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या आवारामध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती. अनेक हिंदू विद्यार्थ्यांविरुद्ध एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईस्थित चाकरमानी होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत असतात. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
बॉलिवूड दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक फराह खान यांनी हिंदू सण होळीबद्दल कथितरीत्या अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी त्यांच्या वकिलामार्फत मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत फराह खानने होळी साजरी करणाऱ्यांना ‘छपरी’ संबोधून हा सण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘छपरी’ हा शब्द सामान्यतः संस्कारहीन किंवा असभ्य व्यक्तींना उद्देशून वापरला जातो, त्यामुळे हा शब्दप्रयोग हिंदू समाजाच्या भावना दुखावणा
(Republic Day) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी २६ जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. तसेच याबाबत सरकारने परिपत्रकही प्रसिद्ध के
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ही सुटी लागू राहणार आहे. बुधवारी या सुटीचे परिपत्रक काढण्यात आले.
पर्यटन आणि प्रवास हा सगळ्यांनाच हवाहवासा असतो. पण, बरेचदा दीर्घकाळ आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना पर्यटनाचा आस्वाद लुटता येत नाही. तेव्हा, विशेषत्वाने ‘हॉलिडे डायलिसिस’शिवाय रुग्णांनी सुरक्षित व आरामदायी प्रवासाचे नियोजन कसे करावे, याविषयी वैद्यकीय मार्गदर्शन करणारा हा लेख...
मुंबई : दि. २० नोव्हेंबर रोजी होणार्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क ( Voting ) बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणार्या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.
( Mumbai )महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाला असून येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २० नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)कडून बँकांच्या सुट्टीसंदर्भात यादी जाहीर करण्यात येते. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात जवळपास १५ दिवस सुट्ट्या बँक कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश असून ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती , नवरात्री , दसरा आणि दिवाळी या दिवशी बँका बंद असती
बुधवारी अर्थात १७ जुलैला देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तर शेअर बाजारालाही सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेशी संबधित कोणतीही कामे असतील तर नागरिकांनी ती आजच करुन घ्यावीत कारण उद्या देशभरातील बहुतेक बँकांना सुट्टी असणार आहे. तर बुधवारी शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. मार्केटमध्ये उद्या कोणतेही व्यव्हार होणार नाहीत. सुट्यांच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार देशातील सर्वच भागांमध्ये उद्या बँका बंद असणार आहेत.
आज बकरी ईद निमित्त डेट व इक्विटी शेअर बाजार बंद राहणार आहे. आज डेरीएटिव्ह व फॉरेक्स बाजार देखील बंद राहणार आहे. उद्या मंगळवारी शेअर बाजार नियमित सुरु होणार आहे. शुक्रवारी अखेरच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली होती. सेन्सेक्स ०.२४ टक्क्यांनी वाढत ७६९९२.२८ ला बंद झाला होता तर निफ्टी ०.२९ टक्क्यांनी वाढत २३४६५.६० पातळीवर बंद झाला होता.
काल शेअर बाजारात मोठ्या दिमाखात निर्देशांकात वाढ झाली होती.आज मात्र ईद - उल - फितर निमित्त आज शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी ब्लू चीप कंपन्यांच्या समभागात ०.४९ टक्क्यांनी वाढ झाली होती.
बिहारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शिक्षकांना यावेळी ईदची सुटी मिळणार नाही. बिहारच्या शिक्षकांना होळीलाही सुट्टी देण्यात आली नव्हती. शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.के.पाठक यांनी जारी केलेल्या आदेशात दि. ८ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान निवासी प्रशिक्षण होणार आहे, तर ईद ११ एप्रिल रोजी येत आहे. त्यांचा सण पाहता निवासी प्रशिक्षणाची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम धर्मीय शिक्षक करत होते.
‘समतोल फाऊंडेशन’ गेली अनेक वर्षे समाजाच्या विविध प्रश्नांसाठी काम करते. त्यातही घरून पलायन करून रेल्वे स्टेशनवर राहणार्या मुलांचे पुनर्वसन हे मुख्य काम. ‘समतोल’ या मुलांना आधार देते, संस्कार देते आणि जीवनात यशस्वी होण्याची दिशाही देते. होळी उत्सवाच्या निमित्ताने ‘समतोल फाऊंडेशन’चे हे विचारकार्य मांडणारा हा लेख...
तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चेंगीचेर्ला भागात होळीचा सण साजरा करत असताना कट्टरपंथी जमावाने जमावाने हल्ला केला. होलिका दहनानंतर मशिदीलगतच्या परिसरात कट्टरपंथी लोकांनी होळी साजरा करणाऱ्या जमावावर हल्ला केला, ज्यात महिलांसह अनेक लोक जखमी झाले. ही घटना रविवारी, दि. २४ मार्च २०२४ संध्याकाळी घडली, त्यानंतर संपूर्ण परिसरात तणाव पसरला.
राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. पाण्याचे तसेच रंगाचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे.
होळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी वायकॉम गॅजेट्सने आपले नवीनतम साऊंडबार्स 'बेसिकबार' सादर केले आहेत. हे साऊंडबार्स तुमचा ऑडिओ अनुभव सर्वोत्तम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. ब्रँड वायकॉम गॅजेट्सचे नवीनतम उत्पादन तुमच्या सणासुदीच्या आणि दैनंदिन मनोरंजनादरम्यान संगीताचा आनंद घेण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.
मध्य रेल्वेने यापूर्वी ११२ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त १२ होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट)-गोरखपूर-छशिमट विशेष या गाडीक्रमांकात बदल झाला असून ती आता 01103/01104 या क्रमांकाऐवजी 01083/01084 या क्रमांकाने धावणार आहे.
होळी सणानिमित्ताने कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज झाली आहे. तसेच, मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन्स चालविण्यात येणार आहे. दरम्यान, आता पश्चिम रेल्वेही होळीनिमित्ताने आपल्या प्रवाशांकरिता सज्ज झाली आहे. पश्चिम रेल्वेकडून होळी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.
आगामी होळी सणाकरिता मध्य रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. दरवर्षी शिमग्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते यामुळे रेल्वे प्रशासनाला प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता तयारी करण्यात येते. यानुसार, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) , नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आज महाशिवरात्रीला बंद राहणार आहे. आज कुठल्याही प्रकारचे ' ट्रेडिंग ' आज होणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आज विश्रांती घ्यावी लागेल.
होळी सणासाठी कोकणात जाणार्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी खालील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), पनवेल तसेच पुण्याहून या विशेष गाड्या कोकण रेल्वेमार्गावर धावणार आहेत. याशिवाय रोहा ते चिपळूण स्थानकादरम्यान विशेष मेमु सुविधा कोकण रेल्वेतर्फे सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन कोकन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यंदा २३ मार्चपासून शिमग्याला सुरुवात होत आहे. ज्या चाकरमान्याना रेल्वेची तिकिटे मिळाली नाहीत, त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जानेवारी २०२४ रोजी केली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे २२ जानेवारी रोजी सा
बिहारच्या शिक्षण विभागाने २०२४ साठीचे शालेय सुट्यांचे कॅलेंडर जारी केले असून यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश हिंदू सणांच्या सुट्या रद्द केल्या आहेत, तर ईद आणि मोहरमच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय सरकारी शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारच्या साप्ताहिक सुटीचा आदेश जारी केला. केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी या आदेशाचा निषेध केला आहे.
बिहारमधील नितीश कुमार सरकारने छठ सणाच्या सुट्या रद्द केल्या आहेत. बिहारमध्ये नवनियुक्त शिक्षकांना रुजू करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात छठ या सणाला सर्व शाळा सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे.
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे आज गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
प्राध्यापक धनंजयसिंह गुलाबसिंह वर्मा (राजपूत) उपाख्य प.पू.महंत कुलभूषण वैद्यराजबाबा यक्षदेव महानुभाव यांचे गुरुवार, दि. २० जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या रूपाने एक ज्येष्ठ चित्रकार, अनुभवी कलाशिक्षक, प्रगल्भ व्याख्याता आणि महानुभाव अनुयायी इहलोकीची यात्रा संपून गेला. त्यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
राज्यात मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणवू लागला आहे. एप्रिलमध्येच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. याच पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता दि.२१ एप्रिलपासूनच दिली जाणार आहे.
शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागणाऱ्यांना संबंधित उमेदवारांना जातीचे दाखले आवश्यक असतात. हे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम, डॉ. किरण लहामटे, अशोक पवार, नाना पटोले, सुनील भुसारा, डॉ. देवराव होळी यांनी आदिम जनजाती समाज शासनाच्या सेवांपासून वंचित राहण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक यांचं आज निधन झालं. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सतिश कौशिक यांचं अचानक निधन झाल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. आपल्या विविधांगी भूमिकांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आणि चेहऱ्यावर कायम हास्य असलेले अभिनेते राहिले नाहीत या वृत्तावर बॉलिवूड अभिनेत्यांचा विश्वासच बसत नाहीये. अनेकांनी तर ट्विट करून हा आपल्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे.
सण कोणताही असो. त्यातुन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याचे भान प्रत्येकाने राखणे गरजेचे आहे. सततच्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक सण-उत्सवांची चर्चा होऊ लागली आहे. त्यातुनच बहुतांश ठिकाणी पर्यावरणपूरक होळी तसेच नैसर्गिक रंग वापरुन धुलीवंदन साजरे करण्यात येते, हे प्रमाण वाढविणे काळाची गरज आहे. पाहुया होलिकोत्सवाचे निसर्गरंग...