मी दि. १ मेपासून ११ मेपर्यंत अरुणाचल प्रदेशचा आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भारत-चीन सीमेचा दौरा केला. याच सीमेवर मी १९८५-१९८८ आणि १९९२-१९९५ मध्ये तैनात होतो. त्यानंतर अनेक वेळा मी या भागात सैनिकी दौरे केले होते. मात्र, २०१६ नंतरचा हा पहिला दौरा होता. त्यामुळे जमिनीवरती परिस्थिती नेमकी काय आहे, हे मला स्वतःच्या डोळ्याने अनुभवता आले. माझ्या लेखाच्या पुढच्या दोन भागांमध्ये मी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेली प्रगती आणि यामुळे भारत-चीन सीमा सुरक्षित करण्यामध्ये आपल्याला कसे यश मिळत आहे, याचे विश्लेषण करीन.
Read More
आता अमरुल्लाह सालेह कोणती भूमिका घेणार? ते तालिबानसमोर पुन्हा आव्हान उभे करू शकतील का? असे प्रश्न उभे राहत आहेत. लष्करी नेता अहमद मसूद आणि राजकीय नेता अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. त्यांच्यामध्ये हा लढा पुढे चालवण्याची क्षमता आहे. परंतु, त्याकरिता त्यांना सेंट्रल रिपब्लिकच्या देशांचा पाठिंबा आणि मदत मिळणे गरजेचे आहे. याशिवाय एक महाशक्ती म्हणजे अमेरिका किंवा रशिया यांच्याकडून मदत अपेक्षित आहे. मात्र, ही मदत सध्या मिळताना दिसत नाही. त्यामुळे सध्या चाललेला धडा किती दिवस चालेल, यावर प्रश्नच
काश्मिरातील दहशतवादाचे कंबरडे मोडले, - ब्रिगेडियर हेमंत महाजन
‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने ‘ड्रोन’च्या साहाय्याने ‘एके - ४७’ रायफल्स, स्फोटके, अमली पदार्थ आणि बनावट नोटाही भारतात पाठविल्या आहेत. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद्यांना ‘ड्रोन्स’द्वारे शस्त्रपुरवठाही केला जात आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या विकास कामांमधील वाढ, राजकीय चर्चा, पर्यटनामधील सकारात्मकता यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातूनच नाराज झालेल्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हिंसाचारालाही प्रोत्साहन दिले आहे, असे सांगत ड्रोन हल्ल्यांबाबत व ‘ड्रोन’च्या पाकिस्तानकडून व
युद्धकाळात 'सिलिगुडी कॉरिडोर' बंद पडला तर आपल्याला बांगलादेशमधून येणाऱ्या नद्यांचा आणि रस्त्यांचा वापर करता येईल. ईशान्य भारतात प्रवेश करण्यासाठी भारताकरिता अनेक मार्ग खुले होत आहेत. बांगलादेशातील नद्यांचा वापर करून आपण ईशान्य भारतात एक आर्थिक क्रांतीच करत आहोत.
प्रत्येक भारतीय नागरिकाने नागरिकाने अंतर्गत आव्हाने सक्षमपणे हाताळायला हवेत असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले त्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्यूकेशन सोसायटीतर्फे आयोजित धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमाले प्रसंगी पूर्वांचल राज्ये सुरक्षा सद्यस्थिती, आव्हाने आणि मार्ग या विषयावर बोलत होते. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक धर्मवीर डॉक्टर बा. शि. मुंजे यांच्या १४७व्या जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमाला नाशिक येथील गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित