सुपरस्टार रजनीकांत यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नसलेली एकही व्यक्ती चित्रपटसृष्टीत मिळणार नाही. मग आपली मराठी चित्रपटसृष्टी मागे कशी पडेल. नुकताच ‘डंका हरीनामाचा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केले होते. पण तुम्हाला माहित आहे का डंका चित्रपटात रजनीकांत यांनी काम करावं अशी इच्छा दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केली होती. डंका हरीनामाचा या चित्रपटाच्या संपुर्ण टीमच्या ‘दै. मुंबई तरुण भारत’सोबत गप्पा रंगल्या होत्या.
Read More
कलियुग आणि विज्ञानयुग हातात हात घालून वावरत आहे. ‘भौतिकाचे शोध’ आणि ‘दूर जाणाराबोध’ यांची सांगड घालण अवघड! कलि बुद्धीमध्ये शिरलेला असल्यावर सत्याचा बोध कसा होणार? शोधामधून शाश्वत सुखाची प्राप्ती करणे म्हणजे मृगजळामागे धावणं! देहालायंत्रामुळे आराम मिळाला तरी, मनाचा आराम हरवला आहे. मनाला विश्रांती मिळाली की, ते ताजेतवाने, टवटवीत होते. मनाची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी काय करावे, हे फार कमी लोकांना ज्ञात असते.