भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत सकारात्मक वाढ दिसून आली. सेन्सेक्स २३०.०२ अंकांच्या वाढीसह ८०,२३४.०८ च्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी ८०.४० अंकांनी वधारत २४,२७४.९० वर बंद झाला. जागतिक बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराने पुन्हा वेग पकडल्याचे पाहायला मिळाले.
Read More
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने देशातल्या दोन आघाडीच्या खाजगी बँकांवर दंड आकारला आहे. विविध नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयकडून बँकांना दंड आकरण्यात आला आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांक सेन्सेक्सने ८० हजारांचा टप्पा जवळपास ओलांडला आहे. या उच्चांकी पातळीसह बँकिंग क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रात खाजगी बँकांच्या समभाग प्रचंड वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे बँकेतील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे शेअरहोल्डिं जून तिमाहीत ५५ टक्क्यांनी खाली घसरले आहे.
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळख असणाऱ्या एचडीएफसी बँकेने आपला चौथा तिमाही निकाल जाहीर केला. बँकेला आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील जानेवारी ते मार्च तिमाहीत १६५११ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तज्ञांच्या मते हा नफा १६५७६ कोटींवर अपेक्षित होता. त्यानुसार जवळपास भाकीत खरे ठरले असून कंपनीला १६३७३ कोटींचा नफा झाला आहे.
एस अँड पी ग्लोबल या मार्केट इंटेलिजन्स कंपनीच्या सर्वेक्षणात तीन भारतीय बँकांनी पहिल्या ५० बँकेत स्थान मिळवले आहे. एशियन पॅसिफिक विभागात एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांना पहिल्या ५० मध्ये स्थान मिळाले आहे.आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देखील दोन भारतीय कंपन्यांनी पहिल्या ५० बँकांत स्थान मिळवले होते. एस अँड पी ग्लोबलमधील या नव्या अहवालामुळे भारताच्या यशात अजून एक भर पडली आहे.
सर्वांना वृद्धापकाळाचे जीवन काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सुसह्य व्हावे म्हणून ‘नॅशनल पेन्शन योजना’ केंद्र सरकारनेकार्यान्वित केली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने हा एक चांगला दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. ही सरकार चालवत असलेली अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे, हा एक ‘स्मार्ट’ आर्थिक निर्णय आहे, जो तुम्हाला वयाच्या साठीनंतर फायदेशीर ठरू शकतो. ६० वर्षे होईपर्यंत यात गुंतवणूक करावी लागते. त्याविषयी सविस्तर...
‘एचडीएफसी’ बँक आणि ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था या दोन संस्थांचे विलीनीकरण होत आहे. ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था येथून पुढे वायदे बाजारामध्ये कार्यान्वित असणार नाही. ही बहुचर्चित अशी एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या आठवड्यात तिची अंमलबजावणी सुरू होत आहे. त्यामुळे अर्थजगतात होणार्या घडामोडींवर टाकलेली नजर...
‘एचडीएफसी’ आणि ‘एचडीएफसी बँक’ यांच्या विलिनीकरणाची चर्चा गेली अनेक वर्षे चालू होती. ‘एचडीएफसी’चे मूल्य सुमारे ४० अब्ज डॉलर्स असून ही वित्तसंस्था ‘एचडीएफसी बँके’त विलीन झाल्यानंतर बँकेची मालमत्ता १८ लाख कोटी रुपयांवर जाईल, अशी अपेक्षा आहे. या विलिनीकरणाची घोषणा गेल्या सोमवारी करण्यात आली
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफि इंडियानं आपल्या व्याजदरांमध्ये बदल केला. यासह प्रमुख बँकांपैकी एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक आदींनीही व्याजदरात बदल केले.
मार्क झुकरबर्ग यांनी केली घोषणा व्हॉट्सएपतर्फे ६ नोव्हेंबर २०२० पासून देशभरात पेमेंट सेवा सुरू केली आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे गुरुवारी सायंकाळी व्हॉट्सएपला युपीआय बेस्ड् पेमेंट सेवा देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. व्हॉट्सएप ही फेसबूकची सब्सिडियरी कंपनी आहे.
कोरोना काळात डिजिटल व्यवहरांना प्रोत्साहन मिळावे, अशी मागणी वेळोवेळी होत असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत ऑनलाईन दरोडेखोरांनी खातेधारकांचे लाखो रुपये वळते केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.
भारतातील अग्रणी मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेली रिडलर कंपनीने "नवी कार्ड" - रुपे राष्ट्रीय कॉमन मॉबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे 'एनएमएमटी'च्या दररोज निर्माण होणाऱ्या सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढाव्याला आठवडा शिल्लक असताना भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) मुदत ठेवींच्या व्याजदरात बुधवारपासून बदल केले. बुधवारपासून विविध मुदत ठेवींवर ०.५ ते ०.१० टक्क्यांनी वाढ केली.