आता जिलेबी-फाफड्याच्या टपर्याही रस्तोरस्ती लागण्याची शक्यता आहे. पण मुद्दा हा आहे की, जिलेबी आणि फाफडा वगैरेंची नावं घेऊन खरेच गुजराती बांधव कुणाचे पाईक होणार आइेत का? असे काहीबाही बोलून लोकांना भुलवायचे दिवस गेले.
Read More
शिवसेनेची गुजराती मतदारांना हाक
गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ शिवसेनेकडून अशा टॅगलाईनचा वापर करण्यात आला आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार निशाणा लगावला आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद... शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदारानं मनात ठाम ठरवलं आहे "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला आपटा," असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.