शहरी वायू प्रदूषणाला तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, क्रेडाई-एमसीएचआयने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या सहकार्याने बांधकाम स्थळांवरील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्षमता-निर्मिती कार्यशाळा आयोजित केली. मुंबईतील क्रेडाई-एमसीएचआय कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील साइट अभियंते, सुरक्षा अधिकारी, पर्यावरण व्यावसायिक आणि प्रकल्प व्यवस्थापकांना बांधकाम क्रियाकलापांची संबंधित प्रदूषण नियंत्रण उपायांवर व्यावहारिक प्रशिक्षण
Read More
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
तुम्हारे सियासत के कारनामे कहाँ नहीं थे? गंदे पानी में, शराब की बोतलो में, दिल्ली दंगल रोहिंग्या के आगमन में और दुषित हवाओ में। काय म्हणता, माझ्या कारकिर्दीमध्ये हे सगळे घडले? असू दे बदनाम हुआ तो क्या हुआ? नाम तो हुआ!! आता काय दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता माझ्या या कारनाम्यांचा समाचार घेणार का? कधी कधी वाटतं, ‘हवा भी शामिल हैं उनके साजिश में।’ हो, त्याशिवाय का माझी दिल्लीतली सत्ता गेल्या गेल्या दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सुधारली. मी असेपर्यंत तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण होते. मी गे
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर वाहननिर्मिती, संलग्न उद्योग-व्यवसायांना ऊर्जा मिळून, रोजगाराच्या लाखो संधींमुळे विकासाचा ‘महा’मार्ग प्रशस्त होईल.
दादर येथील शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेला दिले.
मुंबई : धार्मिक स्थळांवर भोंगे लावणे, हा कोणत्याही धर्माचा अनिवार्य भाग नाही. ध्वनी प्रदुषणामुळे आरोग्याला धोका होतो. त्यामुळे लाऊडस्पिकरला परवानगी नाकारल्याने मूलभूत अधिकारांवर गदा येते, असा दावा कोणीच करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने ( High Court ) गुरुवार, दि. २३ जानेवारी रोजी दिला. त्यामुळे मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जागतिक व्यासपीठांवर पर्यावरण रक्षणासाठी विविध करारांवर स्वाक्षर्या करून जबाबदारीचे प्रदर्शन करणार्या अमेरिकेने, स्वतःच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणावर फारसे लक्ष दिलेले नाही. कारण, जागतिक पातळीवर इतर देशांना पर्यावरण रक्षणाचा उपदेश करणारी ही महासत्ता स्वतः पर्यावरण रक्षणामध्ये सातत्याने अपयशी ठरली आहे.
जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणा-या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित सुरू होत असून एमएमआरडीएच्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर असून, त्यांनी या संदर्भातील नोंदी ठेवून प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Thane polluted मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरातील हवा मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. १७ डिसेंबर रोजीच्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात सरासरी १२० हवा गुणवत्ता निर्देशांक नोंद झाला आहे. असे असले तरी हवेतील प्रदुषण रोखण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिकेसमोर आहे. दरम्यान, मुंबई - ठाण्यापेक्षा पुणे, चिंचवड, नाशिक, नांदेड, कोल्हापुर, अहमदनगर आदी शहरातील हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये असल्याने श्वास घेण्यासही त्रासदायक असल्याचे अहवालात नमुद आहे.
आजच्या वेगवान जगात ‘भावनिक थकवा’ या संकल्पनेकडे त्यामुळे लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः लोक दैनंदिन जीवन, काम आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या तणावांवर समायोजन करतात. ‘भावनिक थकवा’ म्हणजे केवळ थकवा येण्याची क्षणिक भावना नाही, ही भावनात्मक थकव्याची स्थिती आहे, जी एखाद्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोलवर नकारात्मक परिणाम करू शकते.
प्रदूषण हे पर्यावरणाच्या सर्व घटकांवर विपरीएत परिणाम करणारे असतेच. आजावर प्रदूषणाचे विविध प्रकार थांबवण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु असल्याचे ऐकले आहे. मात्र, आता जलवाहतुकीदरम्यान होणार्या पाण्यातील ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांची माहिती देणारा हा लेख...
मागील काही दिवसांत मुंबईमधील ( Mumbai ) वायुप्रदूषणातही वाढ नोंदवण्यात आली असून, काही भागांतील हवा ही ‘अत्यंत वाईट’ या श्रेणीत नोंदविली गेली. परिणामी, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील वायुप्रदूषणाची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा माहितीपूर्ण लेख...
नवी दिल्ली : दिल्ली- एनसीआरमध्य़े ( Delhi Pollution ) जीआरएपी-४ निर्बंध ५ डिसेंबरपर्यंत लागू राहतील, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. बांधकाम बंद असल्यामुळे बाधित झालेल्या कामगारांना भरपाई देण्याबाबत राज्यांच्या हलगर्जीपणाबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीला सध्या प्रदूषणाने ( Delhi Pollution ) वेढले आहे. राजधानीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत दिल्ली सरकारच्या उत्तरांवर समाधानी नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
राजकीय धुळवड गेले काही दिवस बघायला मिळाली. यात विचारांचे प्रदूषण अधिक आणि विकासाचे, प्रगतीचे वातावरण निर्माण करणारे मात्र कमी. त्यामुळे कोणाला धडा मिळाला, हे आज आलेल्या निकालानंतर स्पष्ट होईलच. असे असले तरी आणखी एका प्रदूषणाची चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. देशातील प्रत्येक महानगर हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे आपण दरवर्षी बघतो. राजधानी दिल्लीत तर भयंकर परिस्थिती.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’प्रमाणे दिल्लीत ‘नेमेचि ओढवते हे प्रदूषण’ अशी बिकट अवस्था. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच देशाची राजधानी धूर, धुरके आणि धुक्याच्या गर्तेत हरवून जाते. सालाबादप्रमाणे यंदाही दिल्लीतील वायूप्रदूषणाने नवीन उच्चांक गाठला आहे. त्यानिमित्ताने दिल्लीतील वायूप्रदूषणावर उपाययोजनांचा आढावा घेणारा हा लेख...
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सांगितले की, “दिल्लीतील ( Delhi ) हवेच्या गुणवत्तेच्या खालावलेल्या पातळीचा सामना करण्यासाठी, हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) ३००च्या खाली असला तरीदेखील ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन-४’ (ग्रॅप-४) लागू करण्याचा आदेश पारित करण्याचा विचार करत आहे.
(Delhi Air Quality Index ) दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हवेच्या गुणवत्तेचा सरासरी निर्देशांक (एक्यूआय) ४३० इतका नोंदवला गेला. ही पातळी आरोग्यासाठी हानिकारक आहे. दिल्लीतील अनेक भागात एक्यूआय ४०० च्या पुढे आहे. फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा आणि नोएडा येथेही वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत राहिले.
(Delhi - NCR Air Pollution) दिल्ली - राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) पसरलेल्या प्रदूषणाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा सरकारला फटकारले.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये वायुप्रदुषणाची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार मंगळवारी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३१८ अर्थात अतिखराब श्रेणीत पोहोचला होता. त्याचवेळी सत्ताधारी आप मात्र प्रदुषणाविषयी अन्य राज्यांना जबाबदार धरण्यात धन्यता मानत आहे.
( Shehzad Poonawalla ) देशाच्या राजधानीत दिल्लीच्या विविध भागांमध्ये धुरके पसरण्यास प्रारंभ झाला असून हवेची गुणवत्ता वेगाने खालावण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे यमुना नदीतही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) विषारी कारभारामुळे दिल्लीकरांना वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे.
मान्सून परतीला लागल्यानंतर हवाप्रदूषण समस्या डोके वर काढतेच. आणि हवा प्रदूषण नवी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवण्यास मिळतो. हे कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढूनदेखील फार काही फरक पडलेला नाही. याची असंख्य कारणे आहेत. या हवा प्रदुषणाच्या कारणांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाला रोखण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकल प्लास्टिक वापराच्या पिशव्या, बाटल्या यावर बंदी घालण्यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.प्लास्टिकच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असते. त्यामुळे सरकारने विशिष्ट प्लास्टिवर बंदी घातलेली आहे.
जगभरात पर्यावरणीय समस्या गंभीर रुप धारण करत असताना देशात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी हजारो बळी जात असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
सर्व प्रकारचे प्रदूषण... मग ते पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भातील असो की नद्या, वनस्पती, पशु-पक्षी आदींच्या बाबतीतले, यांचे संरक्षण कसे करावे आणि वाढत्या प्रदूषणामुळे सबंध जीवसृष्टीला कसे वाचवावे, याबाबतीत वेदांचे चिंतन हे फारच मौलिक स्वरूपाचे आहे. कालच साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेदांचे पर्यावरणपूरक व्यापक विचार मांडणारे हे चिंतन...
वाढत्या पर्यावरणीय समस्यांविषयी आपण नेहमीच ऐकत, वाचत, पाहत असतो. यामध्ये प्रचंड प्रदूषण, तापमानवाढ, अधिवासांचे नुकसान, विविध प्रजातींचे नामशेष होणे असे अनेक मुद्दे येतात. यामध्येच एक अल्पपरिचित विषय म्हणजे प्रकाश प्रदूषण! होय, प्रकाशाचेसुद्धा प्रदूषण होते. ‘लाईट पोल्यूशन’ अर्थात प्रकाश प्रदूषणाची अनेक कारणे आहेत. प्रकाश प्रदूषण म्हणजे कोणताही अयोग्य, फार गरज नसलेल्या ठिकाणी अति प्रमाणात किंवा जास्त कृत्रिम प्रकाशाची उपस्थिती असणे.
नुकतेच मुंबई शहराला सलग तिसर्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने मुंबई शहरातील वृक्षगणना, वृक्षांचे प्रकार आणि एकूणच या महानगराला लाभलेल्या या हरित कवचाच्या संरक्षण आणि संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
'सिंगल यूज प्लास्टिक' (एकल वापर) बाळगणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष पथके तयार करून शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, भाजी आणि फूल मंडई यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धाडी टाकून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मंगळवार, दि. १२ मार्च रोजी दिले आहेत.
डोंबिवली निवासी विभागात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रदूषण होत असल्याची ओरड स्थानिक रहिवाश्यांकडून केली जात असताना कामा असोसिएशनने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदुषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने एण्ड्रॉईडवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष ऍप्लिकेशन विकसित केले आहे. मुंबईतील नागरिकांना या ऍप्लिकेशनचा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील ऍपमध्ये दिली आहे. प्रारंभी एण्ड्रॉईड प्लॅटफॉर्
प्रदूषणमुक्तीसाठी अगदी सामान्यांतला सामान्य माणूसही कसा खारीचा वाटा उचलू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ठाण्यातील रिक्षाचालक संजय वरणकर. अशा या समाजहितैषी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र नियंत्रण मंडळाद्वारे या भरतीसंदर्भात एकूण ६१ रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नियंत्रण मंडळांतर्गत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीकरिता अर्ज करू शकतात. या भरतीकरिता शैक्षणिक पात्रता, पद, वयोमर्यादा, अंतिम मुदत याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा गंभीर झाली असून, दिल्ली तसेच पंजाब येथील आम आदमी पक्ष प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याची बाब समोर आली. पंजाबमधील शेतकर्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून शेतात पराली जाळणे सुरूच ठेवल्याचे आकडेवारी सांगते. हरियाणा तसेच पंजाब सरकार एकमेकांकडे बोट दाखवत असताना, राजधानीतील ढासळलेला हवेचा स्तर मात्र खरे कोणाला मानावे, असाच प्रश्न उपस्थित करणारा आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कामं सुरू आहेत. गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठी दुबई येथील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे पहाटेच वर्षा या निवासस्थानाहून निघाले. त्यांनी स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनाची स्वतः पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सण-उत्सवात प्रदूषणात वाढ होणे, आता नवीन राहिलेले नाही. न्यायालयाने तंबी दिली. शासनाकडून जनजागृती करण्यात येतच असते. तसेच स्वयंसेवी संस्थादेखील प्रदूषण नियंत्रणाबाबत सक्रिय असतात, तरीही जनमानसातील उदासीन असलेला फार मोठा वर्ग या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून वातावरणात प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असतो.
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू करण्यात आली आहे.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये परालीद्वारे होणाऱ्या वायु प्रदूषणाच्या तुलनेत फटक्यांनी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण नगण्य असल्याचे वायु गुणवत्ता निर्देशांकात (एक्युआय) स्पष्ट झाले आहे.
मुंबईत दीपावलीचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून मुंबईच्या हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा २८८ पर्यंत जाऊन पोहचला. जो खराब म्हणून गणला जातो.
राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली असताना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक ‘मान’ तयार करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. आता त्यांचे लक्ष राजस्थानवर असून, तिकडे ‘दुसरा मान’ तयार करण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात एक महत्त्वपुर्ण निर्णय दिला आहे. फटाके फोडण्यासाठी दिलेली तीन तासांची मर्यादा आता केवळ दोन तास करण्यात आली आहे. प्रदुषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. तसेच यावेळी “दिल्लीवासी बनू नका, मुंबईकरच रहा" असा सल्लाही न्यायलयाने दिला आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण पाहता सर्वच सण उत्सव पर्यावरणस्नेही साजरे व्हावे यासाठी सर्व पर्यावरण प्रेमी आवाहन करत असताना याच पार्श्भूमीवर प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा हा संदेश देण्यासाठी आम्ही cycle प्रेमी फाउंडेशनच्यावतीने 'चला पर्यावरण स्नेही दिवाळी साजरी करूया' या सायकल राईडचे आयोजन केले होते.
दिल्ली सरकारने वायु प्रदूषणाविरोधात सहा वर्षांत काय केले, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला शुक्रवारी केला आहे.देशाची राजधानी दिल्लीमधील वायु प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयात दिल्ली सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावेळी दिल्लीमध्ये गुरुवारी मध्यरात्री व शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वायु प्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून लागू होणारी सम – विषम वाहनव्यवस्था तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती दिल्ली सरकारतर्फे न्यायालयास
मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सर्व रस्ते धुतले जाणार आहेत. यासाठी मनपाला सूचना देण्यात आल्या आहेत. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. दिल्लीपाठोपाठ मुंबई प्रदूषित शहर बनते आहे. वाढते प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. या बैठकीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी आणि धूलिकण कमी करण्यासाठी पाण्याचा मारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या साठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष पथक देखील तयार करण्याच्या सूचना शिंदे
मुंबई महापालिका परिसरासह उपनगरीय भागातील हवेचा एक्युआय समाधानकारक असून आता हवेचा दर्जा हळूहळू सुधारत असल्याचे चित्र आहे. बुधवारपासून मुंबईतील हवा चांगल्या दर्जाची असल्याची नोंद करण्यात आली आहे, याला मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दुजोरा दिला असून, मुंबईतील एक्यूआय आता आधीपेक्षा कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक्युआय चांगल्या दर्जावर यावा, यासाठी आणखी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, मुंबईतील नागरिकांना मास्क लावण्याची अद्याप गरज नसल्याचे चहल यांनी सांगितले.
दिल्लीतील वायु प्रदूषणाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारची सम-विषम वाहन योजना ही अशास्त्रीय असून तो केवळ दिखावा आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या वायु प्रदूषणाचे राज्य असून राज्य सरकार त्यावर उपाय करण्यात अपयशी ठरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात वायू प्रदूषण जोरावर असून सातत्याने हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. याची गंभीर नोंद मुंबई उच्च न्यायलयाने घेतली असून शहरातील सर्व बांधकामे दिवाळीपर्यंत थांबविण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच हवेची गुणवत्ता राखण्यासाठी दिवाळीत फटाके फोडण्यावरही वेळमर्यादा घालून द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये हिवाळाच्या प्रारंभीच वायु प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसराचा (एनसीआर) हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) हा पाचशेपार गेला आहे. दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांच्या शेतात पिकांचे अवशेष (पराल) जाळून निघणारा धूर थेट राजधानी दिल्लीत पोहोचतो. दिल्लीतील दाट लोकसंख्येमुळे प्रदूषण अनेक पटींनी वाढते.
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) प्रदूषणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी राज्यांनी काय पावले उचलली यासाठी पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानला एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी, लाखो हातांना रोजगार देऊन जगवणारी मुंबई श्वासकोंडीत गुदमरते आहे. वायू प्रदूषण, बांधकाम प्रकल्पांतील धूळ आणि वातावरणातील धुरक्यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला आहे. यासंबंधी मुंबई महानगरपालिकेने काही उपाययोजना केल्या असल्या तरी, या समस्येकडे अधिक खोलवर आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून बघणे हेच क्रमप्राप्त ठरावे.