महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अंतर्गत राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा यंदाचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.
Read More
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) यांच्यामार्फत राज्यातील विविध रिक्त पदे भरली जातात. राज्य शासनाच्या वतीने विविध रिक्त पदे भरण्यासाठी बंपर भरती केली जाईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी संधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. तसेच, एमपीएससीतर्फे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत यंदा वाढ करण्यात आली आहे
राज्य सरकारकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. 'क' गटाच्या विविध संवर्गातील १९,६४० रिक्त जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत आलेल्या अर्जांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत १४५ कोटींची भर पडली आहे. या भरतीसाठी खुला वर्गासाठी परीक्षा शुल्क १००० रुपये तर राखीव वर्गासाठी ९०० रुपये आकारण्यात आले.