तात्याराव सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ माई यांचे माहेर त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या जव्हारचे. त्यांचे वडील रामचंद्र उर्फ भाऊराव चिपळूणकर हे जव्हार संस्थानचे दिवाण होते. ते अतिशय श्रीमंत होते. तात्यारावांचे आजोळ कोठूरचे. त्यांच्या मामांचे नाव गोविंद मनोहर. तात्यांचे आई-वडील खूप लवकर मृत्यू पावले असल्याने हे मामाच सावरकर कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होती. त्यांनी एके दिवशी अचानकपणे जाहीर केले की, “मी तात्याचे लग्न यमुना चिपळूणकरशी नक्की केले आहे.” थोड्या चर्चेनंतरतात्यांनीही या विवाहाला संमती दिली आणि मा
Read More