मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांना मागील काही दिवसांपासून वेग मिळाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून चारकोप येथील 'राकेश' गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकास सोहळा शनिवार, दि. २७ मे रोजी पार पडला. या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ''चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब म्हणून पुढे येत असून आपल्याला स्वयंपुनर्विकासाचा नवा आदर्श घालून द्यायचा आहे,'' असे दरेकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्ह
Read More
बोरिवलीतील गोराई गावात मागील चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच होत नसल्याचे येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले. तसेच, वारंवार यासंबंधी तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसल्याचेही येथील स्थनिकांनी स्पष्ट केले आहे.
बोरिवलीच्या गोराईमधील मुलांसाठी खेळायला मुंबई महापालिकेचे एकमेव मैदान प्रभाग क्र. 9 येथे उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी राजे उर्फ ‘पेप्सी ग्राऊंड’ म्हणून ओळखल्या जाणार्या या मैदानाची पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्यामुळे आम्हाला येथे खेळायला मिळत नाही, अशी तक्रार येथील तरुणांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली. मागील 25 वर्षांपासून आमच्या गोराईत हे मैदान आहे. केवळ एकदा किंवा दोनदा पाऊस पडला, की, हे मैदान पाण्याने भरून जाते. मैदानात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काहीतरी उपाययोजन
मुंबईच्या उत्तरेकडील गोराई किनाऱ्यावर दि. १९ जुलै रोजी 'मेलन हेडेड व्हेल' हा दुर्मिळ समुद्री प्राणी वाहून आला. सोमवारी दि. १८ रोजी गोराई येथील किनाऱ्यावर हा प्राणी जिवंत अवस्थेत वाहून आला होता, तेव्हा त्याला पाण्यात सोडण्यात आले होते. परंतु मंगळवारी दि. १९ जुलै रोजी 'मेलन हेडेड व्हेल' या डॉल्फिन सदृश दिसणाऱ्या दुर्मिळ समुद्री सस्तन प्राण्याचा मृतदेह वाहून आला.
बोरिवलीच्या गोराईमधील मुलांसाठी खेळायला मुंबई महापालिकेचे एकमेव मैदान प्रभाग क्र. ९ येथे उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी राजे उर्फ ‘पेप्सी ग्राऊंड’ म्हणून ओळखल्या जाणार्या या मैदानाची पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्यामुळे आम्हाला येथे खेळायला मिळत नाही, अशी तक्रार येथील तरुणांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना केली.
मागील तीन ते चार वर्षांपासून गोराईमधील प्रभाग क्र. ९ येथील मलनिस्सारण (गटार/सांडपाणी)वाहिनी साफ करण्यात आली नसून, ही वाहिनी मागील २६ वर्षांपासून दुरूस्तदेखील करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले.
गोराई आणि मनोरी खाडीपरिसरातील 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'च्या (एमटीडीसी) मालकीची जवळपास ४६६.७२ एकर कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे (मॅंग्रोव्ह सेल) हस्तांतरित करण्यात आली आहे. यामुळे गोराई आणि मनोरी भागातील कांदळवनांना ‘वन कायद्या’अंतर्गत संरक्षण मिळाले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा आदेश
लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मित्रमैत्रिणींना हटके चॅलेंज देऊन मित्रमैत्रिणींशी स्पर्धा सुरू केली. 'नथीचा नखरा', 'झुकी नजर', 'साडी चॅलेंज', विविध स्वादीष्ट खाद्यपदार्थ बनवण्याची स्पर्धा असो वा आणखी काही या सगळ्या परीक्षा तर आपण पास झालो पण ज्यासाठी आपण घरी थांबलो तिच गोष्ट दुर्लक्ष करून कोरोनासारखा आजार आपण आपल्या वाड्या, वस्त्या, गावपाड्यावर घेऊन आलो. अनेक जण आपल्या गावी गेले, परराज्यांतील मजूरही निघून गेले. मात्र, या मुंबईत जिथे कोरोनाचा विळखा सुटेनासा झाला त्याच मुंबईतील काही गाव आणि वस्त्यांनी