मुंबई : बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा जवळ आला आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदानप्रक्रिया ( Voting ) पार पडणार असून, २८८ मतदारसंघातील ४ हजार, १३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तुष्टीकरणाचे राजकारण करून महाराष्ट्राची घडी विस्कटण्याचा प्रयत्न करणार्यांना धडा शिकवण्याची संधी.
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध स्तरातील समस्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. अनेक पथदर्शक प्रकल्प त्यांच्या अथक, अविरत परिश्रमातून उभे राहिले आहेत. अशांपैकी काही स्वयंसेवकांच्या कार्याची दखल शासकीय पातळीवर देखील घेण्यात आली व त्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील अशा पद्म पुरस्कार प्राप्त पाच ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांचा गौरव सोहळा डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
मुंबईतील डी.एच.गोखले आणि शामला गोखले न्यासाच्या निधीतून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठित असा ‘अंत्योदय पुरस्कार’ यंदा ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून एका प्रकट समारंभात हा पुरस्कार सदाशिव चव्हाण यांना प्रदान करण्यात येईल.
“भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी चिंचवड येथे उभारलेल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले
‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’ या विषयावर १९ वे समरसता साहित्य संमेलन दि. २ आणि ३ जुलै रोजी नागपूर येथे संपन्न झाले. त्यानिमित्ताने या संमेलनाची अनुभूती शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांनी जी जी माणसे पाहिली, अनुभवली त्या माणसांच्या अंतरंगाचा पट ‘परिसांचा संग’ या पुस्तकात अतिशय आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने रंगवला आहे. ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांच्या साहित्याचा, समाजजीवनाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांचे सर्वाथाने असणारे माणसांवरील प्रेम. लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न मानता त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली, जोडत आहेत. एकूणच त्यांचा पिंडच ‘माणुसकी’ने भरलेला आहे.
‘विवेक प्रकाशन’तर्फे ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांचं ‘परिसांचा संग’ हे पुस्तक मार्च महिन्यात प्रकाशित होत आहे. ‘नागपूर तरुण भारत’मधून प्रभुणेंचं ‘ऊन-सावली’ नावाचं सदर प्रकाशित होतं. त्यातील निवडक व्यक्तिचित्रणांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.पुस्तकाचं आयुष्य हे अमर्याद असतं. या पुस्तकातून रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, त्यांनी उभं केलंलं कार्य पुढील पिढीलाही कळावं यासाठी हा सर्व प्रपंच.
नगर शहराजवळ सूर्यनगर येथे राहणार्या महिलांना मंदिरात केल्या जाणार्या आरतीसंबंधी वादातून नोव्हेंबर २०२० मध्ये निर्घृण मारहाण झाली होती. गुरुवार, दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित गिरीश प्रभुणेंनी त्या सर्व पीडितांची नगर येथे जाऊन भेट घेतली. यावेळी ‘विवेक विचार मंचा’चे चंद्रकांत जाधव देखील उपस्थित होते. दि. ६ नोव्हेंबर, २०२० रोजी नगर शहरातील सूर्यनगर भागात राहणार्या महिलांना भीषण मारहाण झाली होती.
पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्कारप्राप्त व्यक्ती मोठी होते असे नाही, अशा व्यक्ती आपल्या कामामुळेच मोठ्या असतात. त्यांचे मोठेपण लोकशाही शासन व्यवस्थेने मान्य केले, असा याचा अर्थ झाला. गिरीश प्रभुणे यांच्या कामाचे मोठेपण समजून घेणे फार आवश्यक आहे. आपला समाज अतिप्राचीन आहे. वेगवेगळ्या सामाजिक व्यवस्थांत तो जगत असतो. भटके आणि विमुक्त हा समूह अतिशय वेगळा गट आहे. त्याचे वेगळेपण त्याच्या जगण्यात आहे, तसेच मुख्य समाजापासून त्याच्या तुटलेपणात आहे. हे असे का झाले, याची सामाजिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत. गिरीश प्रभुणे यांन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मार्सेलिसच्या समुद्रात उडी मारली त्या दिवसाचे स्मरण म्हणून पुणे नगर हिंदूसभेतर्फे हिंदुहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर साहस पुरस्कार दिला जातो. त्यांच्या नावाचा साहस पुरस्कार आपल्याला मिळत असला तरीही त्यांच्या तोडीचे साहस आपण केलेले नाही, पण या पुरस्कारामुळे यापुढे असे साहस करण्याची प्रेरणा निश्चितच मिळाली आहे.
समरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १८व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. प्रभुणे बोलत होते. ‘भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि समरसता’ ही या संमेलनाची संकल्पना आहे.