अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान उद्या, दि. ५ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, प्रत्येक उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यावेळी प्रत्येक मतदाराचे मत दोघांसाठीही आवश्यक ठरणार आहे. अमेरिकेत भारतीय मतदारही बहुसंख्य आहेत. अमेरिकेतील भारतीय मतदारांच्या सामर्थ्याचा घेतलेला हा आढावा...
Read More
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निष्कासन कार्यवाही जोमाने सुरू केली आहे. महानगरपालिकेने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत म्हणजेच दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर याकालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मिळून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे हटविले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे दोघंही एकमेकांचं अधूनमधून गुणगान गातात. तसंच प्रसंगानुरुप परस्परांवर तीव्र शब्दांत टीकादेखील करत असतात. आपण पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो, असं सांगायलादेखील मोदी विसरत नाहीत. परंतु, या खेपेला मात्र मोदींनी पवारांच्या संधीसाधू राजकारणाचा ४५ वर्षांचा हिशेबच थोडक्यात मांडला.
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारताने कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याचे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले. हा अहवाल कॅनडाच्याच उच्च अधिकार्यांच्या समितीने जाहीर केला, हे विशेष. त्यामुळे २०२१ साली कॅनडाने भारतावर केलेले आरोप हे सर्वस्वी बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
हाऊडी मोदी ते मोदी की गारंटी' हा प्रवास जितका मोठा तितकाच भारतीय निवडणूक व भारतीय आर्थिक सांस्कृतिक स्थित्यंतरे जाणवणारा काळ ठरला आहे. २०१४ पासू़न काही जणांसाठी खर स्वातंत्र्य काही जण मोदींना शिव्या शाप. हा खोलवर विरोध किंवा खोलवर पाठिंबा हे येणारा भारतीय कमृतकाल कसा असेल याची प्रचिती देऊन जातो. हे युग बदलांचे वारे वाहतोय पण आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचा व भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल यासंबंधी हा लेख बहुआयामी आढावा घेणार आहे.
चंद्रपुर लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज भरताच सुधीर मुनगंटीवार हे उमेदवारी अर्ज भरणारे विदर्भातील पहीले उमेदवार ठरले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकी देशाची दिशा आणि स्थिती ठरवणार असल्याने या निवडणुकीत विश्व हिंदू परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे समोर येत आहे. "भविष्यातील जो भारत आपण बघू पाहतोय, त्यात आपला देश स्वाभिमानी होवो, संस्कारांमध्ये दृढ होवो, देशातील समाज शोषण मुक्त आणि समतायुक्त होवो, संपूर्ण जगात ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्या मदतीसाठी नेहमी सिद्ध राहता येईल, यासाठी विहिंप प्रयत्न करणार आहे.
आज देशातील १७ व्या लोकसभेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार भाषणाने झाली. या भाषणात सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा मोदींंनी आपल्या भाषणात मांडला. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढत अमृतकाळात उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने केलेल्या बदलांचा वेध संसदेत घेतला गेला. संरक्षण, विकास, समर्पण या त्रिसूत्रीवर आधारीत मोदी सरकारने कामाची पोचपावती देण्यासाठी १७ व्या लोकसभेतील घेतलेले निर्णय व केलेले कायदे पंतप्रधानांनी नमूद केले.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी झालेल्या सोडतीत प्रस्थापितांचे गड शाबुत राहिले आहेत. कोपरी, वागळे प्रभागात ५० टक्के महिलाना संधी असली तरी उर्वरित ठाण्यात मात्र महिलाराज साठी मैदान मोकळे झाले आहे.
प्रभाग सीमांकनाच्या आडून राजकारण करण्याचा शिवसेनेचा डाव ; प्रतिक कर्पे यांचा आरोप
नगरसेवक संख्येत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय ; ठाकरे सरकारवर भाजपाची कडाडून टीका
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसनच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने बहुमताचा आकडा गाठला
मुंबईतील सहा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे आव्हान असणार आहे.
आयपीएलचे शेवटचे दोन स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. लोकसभा निवडणूकीच्याही दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. याचा संदर्भ देत भाजपने विरोधकांवर एका व्हिडिओद्वारे निशाणा साधला आहे. भाजपच्या ट्विटरवर ट्विट करण्यात आलेल्या एका २५ सेकंदाच्या व्हिडिओतून मोदींनी विरोधकांना मैदानात उतरण्यापूर्वीच हरवले आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.
अनेकानेक दिग्गजांना आश्चर्याचा धक्का देत, माजी क्रिकेटपटू इम्रान खान सत्तास्थपनेच्या दिशेने मार्गक्रमण करताहेत. हा, पाकिस्तानी जनतेच्या अनाकलनीय राजकीय आकलनाचा आणि त्यानुरूप केलेल्या प्रगल्भ वर्तणुकीचा परिणाम म्हणायचा, की, एकूणच अस्थिर राजकारणाचा कित्ता गिरवीत राहण्याची पाकिस्तानी जनतेने अनुसरलेली ती परिपाठी म्हणायची, हा प्रश्न शिल्लक राहतो तो राहतोच!
पाकिस्तानातील निवडणुकीला बॉम्बस्फोटांच्या दहशतीचे गालबोट लागले. तरीही मतदान पार पडले असून पाकिस्तानी जनतेने दिलेला कौलही निकालाच्या स्वरुपात लवकरच जाहीर होईल. तेव्हा, पाकिस्तानातील प्रांतवार राजकीय समीकरणं, शरीफांची अटक, जातीपाती-समुहांची भूमिका, लष्करी दबाव पाहता पाकच्या सरजमींवर कुणाचा चाँद चमकणार, ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
पाकिस्तानमध्ये यावेळची सार्वत्रिक निवडणूक ही मागच्या कित्येक निवडणुकांच्या तुलनेत कितीतरी दृष्टीने वेगळी आहे.