(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
Read More
'ईडी’तर्फे ’पीएमएलए’ कायद्यांतर्गत नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या यांसारख्या कर्जबुडव्यांची १८,१७०.०२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही संपत्ती बँकांच्या झालेल्या एकूण नुकसानीच्या ८०.४५ टक्क्यांच्या बरोबर आहे. त्यातील एक हिस्सा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. हस्तांतरित केलेल्या संपत्तीची किंमत ९,३७१.१७ कोटी रुपये आहे.
विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवर कारवाई करण्याआधी सर्वप्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे गरजेचे होते. ते करूनच ‘ईडी’ने तिन्ही कर्जबुडव्या, परागंदा उद्योगपतींच्या मालमत्तेचा ताबा घेतला व त्यातून पैसे परत केले. मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधातील शून्य सहिष्णुतेचा हा आणखी एक दाखला.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मेहुल चोक्सीने २०१७ मध्ये अँडिग्वा-बारबुडा देशाचे नागरित्व घेतले होते
पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून फरार झालेला आरोपी मेहूल चोक्सी पुढील काही दिवसांमध्ये भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला
पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीला दणका देण्यात भारत सरकारला यश मिळाले आहे.
देशातील कोट्यवधींचा गैरव्यवहार करून एंटीगुआ येथे राहत असलेला हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणात भारताला मोठे यश मिळाले आहे. एंटीगुआ येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहीतीनुसार, तेथील पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी चोक्सीचे नागरीकत्व रद्द करण्याला संमती दर्शवली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘पीएचडी अंडर गव्हर्नमेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी’ हा विषय मेहुल चोकसीने पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवडला होता.
मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले असल्याचे वृत आहे.
फरार उद्योगपती मेहुल चोकसीने मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीत ४१ तासांचा प्रवास करून भारतात येऊ शकत नाही असा, असा कांगावा केला आहे
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची हाँगकाँगमधील २५५ कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.