(Lalbaugcha Raja Visarjan 2024) गणेशोत्सवात मुंबईतील आकर्षणाचे प्रमुख केंद्रबिंदू असणारा लालबागचा राजा अखेर दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परतीच्या प्रवासाला निघाला होता. दहा दिवसांसाठी आलेल्या ह्या लाडक्या पाहुण्याला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर उसळला होता. राजाच्या या भव्य विसर्जन सोहळ्यामध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी देखील सहभागी झाले होते. तब्बल २० तास चाललेल्या भव्य मिरवणुकीची सांगता गिरगाव चौपाटीवर झाली.
Read More
(Devendra Fadnavis) श्रीगणेश विघ्नहर्ता आहेत. त्यांनी सर्वांना सुख-समाधान द्यावे, अशी प्रार्थना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिलेल्या भेटीवेळी केली.
(Piyush Goyal) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवार, दि. १८ सप्टेंबर रोजी उत्तर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांचा उत्साह वाढवला.
गणेशोत्सवात भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja) ची ख्याती सर्वत्र आहे. त्याच्या दर्शनासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून सर्वसामान्यांपासून ते अनेक मोठमोठे सिनेकलाकार, राजकीय प्रमुख नेते मंडळींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी येत असतात.
भारतात कुठे आहे सोंड नसलेल्या बाप्पाचं म्हणजेच आदिविनायकाचं मंदिर? (Nar Mukhi Ganesha)
लालबागमधील रंगारी बदक चाळीत अवतरलं 'अक्कलकोट गाव'
दरवर्षी जास्तीत जास्त लोकांनी गणपतीच्या दर्शनासाठी येऊन मंडळाला भेट द्यावी म्हणून प्रत्येक गणेशोत्सव मंडळ काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. जबलपूरमधील अशाच एका गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेशोत्सव मंडपाबाहेर चक्क हत्ती आणून उभा केला आहे. या गजराजाच्या दर्शनामुळे येणाऱ्या भाविकांनाही आनंद झाल्याचे पहायला मिळते. (Gajraj in Jabalpur ganpati pandal)
पश्चिम बेंगळुरूमधून एक रंजक बातमी समोर आली आहे. एका शिक्षक कुटुंबाने तब्बल ४ लाख रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन घरात स्थापना केलेल्या गणेश मूर्तीला घातली होती, मात्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी ते ती चैन काढून घेण्यास विसरले आणि त्यांनी तसेच मूर्तीचे विसर्जन केले. जेव्हा विसर्जनानंतर सोन्याची चैन काढण्याचा आपल्याला विसर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी लगेच चैनीचा शोध सुरू केला. १० तासांच्या शोधकार्यानंतर अखेर ती सोन्याची चैन सापडली. या कालावधीत सुमारे १० हजार लिटर पाणी पंपच्या साह
समुद्रमंथन या पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून हलाहल विषानंतर श्रीलक्ष्मी आणि तिची ज्येष्ठ बहीण श्रीअलक्ष्मीचा (ज्येष्ठा देवी) जन्म झाला. श्रीलक्ष्मी आणि श्रीअलक्ष्मी या दोन बहिणी म्हणजे जणू नाण्याच्या दोन विरूद्ध बाजूच. परंतु लक्ष्मी सोबतच तिची ही थोरली बहिण 'अलक्ष्मी' देखील पूजनीय आहे. लिंगमहापुराणानुसार आणि पद्मपुराणात समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले.
श्रीगणेशचतुर्थी नंतर वेध लागतात ते गौरी आवाहनाचे. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन तर मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करण्याची परंपरा आहे. तीन दिवस चालणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून समस्त स्त्रीवर्ग आपले सौभाग्य अक्षय रहावे म्हणून श्रीगौरीमातेला शरण गेला. मनोभावे तिची प्रार्थना केली तेव्हा श्रीगौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील सर्व जीवांचे रक्षण केले. म्हणून अखंड
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने यंदा गणेशोत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपात लोकप्रिय केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी ९ सप्टेंबर रोजी सपत्निक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार रावसाहेब दानवे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सव कसा साजरा करतात?
Ganeshotsav 2024 दगडूशेठ गणपती मंडळात (Dagadu Sheth Halwai Ganpati) पुणे येथे रविवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जवळपास ३५,००० महिलांनी भगवान गणेश कोषक संस्कृत पठण केले आणि जप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला पहाटेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा ठिकाणी जमल्या आणि त्यांनी अथर्वर्शीर्षचे पठण करून ग्रंथांचा जप करून दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन झाल्या आहेत.
शनिवार, ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी सध्या सगळीकडेच गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु आहे. यावर्षी काय विशेष करायचं? मुर्ती कशी असेल? कोणता मुहुर्त चांगला असेल? हे जाणून घेण्यासाठी भक्तांची धडपड सुरु आहे. पुण्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातील मानाचे ५ गणपती कोणते आणि त्यांचं इतिहास आणि महत्व याबद्दल जाणून घेऊया.
भाद्रपद हा महिना मुख्यतः गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. या महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजनाची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला श्रीगणेशाचे पूजन केले जाते आणि त्यानंतर येणारी भाद्रपद शुक्ल पंचमी ही ऋषिपंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवामुळे हिंदू जनतेत ऐक्याची भावना निर्माण झाली आणि भारतीय जनता निर्भयतेने ब्रिटिशांच्या विरोधात संघटित होऊ लागली. लोकमान्य टिळकांनी ज्याची मेढ रोवली, तो हा सार्वजनिक गणेशोत्सव आजही सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जागरणासाठी आणि राजकीय प्रबोधनासाठी एक व्यासपीठ म्हणून विकसित झाला आहे. आज श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाच्या अशा या अध्यात्मापासून ते राष्ट्रवादाच्या पैलूचे केलेले हे चिंतन...
दुर्जनांचे मर्दन आणि सज्जनांच्या रक्षणासाठी भगवान नारायणांनी दहा अवतार घेतले. त्यांपैकी तिसरा अवतार म्हणजे वराह होय. भगवंताच्या याच अवताराची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला साजरी केली जाते. वराह अवताराची कथा, वराह अवताराची देशातील मंदिरे, मूर्तींची वैशिष्ट्ये, वराह पुराण अशा विविध माध्यमांतून वराह अवताराचे समग्र दर्शन घडविणारा हा लेख...
Ganeshotsav 2024 भाजपा चारकोप विधानसभा व आमदार योगेश सागर यांच्या वतीने गौरी गणपती साठी कोकणात दिनांक ४ व ५ सप्टेंबर रोजी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, आज प्रथम बस गणपती बाप्पा मोरया या गजरात रवाना झाली. ५ सप्टेंबर रोजी ३ विशेष एसी बस व एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.