अजामेळाच्या या कथेतील तात्पर्यार्थ शोधताना भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा, आदर व भक्तिभाव मनात ठेवला पाहिजे, तरच या कथा भागवतकारांनी का अंगीकारल्या, याचा उलगडा होईल. या कथेचा वरवर अर्थ पाहणार्याला असे वाटेल की, आयुष्यभर वाटेल ते पापाचरण करूनसुद्धा मरतेसमयी काही मिषाने भगवंताचे नाम मुखी आले, तर त्याची सारी पापे धुतली जातात व जीवाचा उद्धार होतो. परंतु, या कथेचा अर्थ असा घेणे बरोबर नाही.
Read More