पुणे : गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे ( Asha Kale ) यांना जाहीर झाला आहे. सोबतच गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांना, तर ‘चैत्रबन पुरस्कार’ प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक, गीतकार क्षितीज पटवर्धन, ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर
Read More
गदिमा प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषद घेत केली घोषणा
मराठी साहित्यात आणि मराठी जनतेच्या मनात अलौकिक ठसा उमटविणारे, ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाणारे ‘गदिमा’ यांचे गेली अनेक दशकं रखडलेलं स्मारक आता पुणे येथे महात्मा सोसायटी, कोथरूडला साकार होतंय. स्मारकाच्या या जागेचा भूमिपूजन सोहळा नुकताच २२ मार्चला संपन्न झाला. हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या, गदिमांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. याविषयी जाणून होतेच, पण नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याशी बोलून स्मारकाविषयी आणखी जाणून घेतले.
अण्णा आणि यशवंतराव यांच्यातील अतूट स्नेहबंध उभयतांची कर्तृत्वाची क्षेत्रे भिन्न असूनही कायम होते.