विलेपार्ले पूर्वेकडील पालिकेच्या राखीव भूखंडावर असलेल्या बाबासाहेब गावडे रुग्णालयाच्या नूतनीकरण प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. लिजवर चालवण्यास दिलेल्या रुग्णालयाबाबत गेल्या १२ वर्षात अनेक तक्रारी पालिकेत दाखल आहेत. दरम्यान आता कोणतीही पुरेशी माहिती नसताना नकाशे, रेखाचित्रे तयार करून नूतनीकरण प्रस्ताव सादर करणाऱ्या कंपनी आणि खासगी स्ट्रक्चरल अभियंत्याविरोधात कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते सदानंद साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
Read More