मुंबई : जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत महामहिम राज्यपाल रमेश बैस जी यांच्यासह सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. तसेच सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली.
Read More