भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पुढील दशकात भारत जगाच्या एकूण विकासात २० टक्के योगदान देईल, असे जी-२० शेरपा अमिताभ कांत यांनी AIMA परिषदेत बोलताना सांगितले.
Read More
संसदेचे अल्पकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशन पासून सुरु झाले. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली.नव्या संसद भवनात प्रथमच आपले विचार मांडण्याचा आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या प्रारंभिक दिवसांत नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. नवे संसद भवन ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ या भावनेच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेले असून ही इमारत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे मूर्तीम
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी एक नवी माहिती पुढे आली आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यानुसार १३ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता एक दिवस आधी म्हणजेच १२ ऑक्टोबरला होणार आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा भारतीय एजन्सींवर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो एका नव्या अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. ९-१० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान ट्रूडो ड्रग्सच्या प्रभावाखाली असल्याचा दावा एका माजी भारतीय राजनयिकाने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारत मंडपम येथे जी-२० शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या तळागाळातील कर्मचारी वर्गाच्या चमूशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. जी-२० च्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पंतप्रधानांनी या प्रसंगी बोलताना अधोरेखित केले. पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय व्यवस्थापन चमूला दिले.
भारताच्या अध्यक्षतेखाली ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-२० परिषद पार पडली. या परिषदेमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये विविध मुद्दयांवर चर्चा झाली. दोन दिवसांची ही परिषद यशस्वीरित्या पार पडली.
भारताने यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी दिली आहे. जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना आमंत्रित केले होते.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी२० शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'दूरदर्शी' नेतृत्वाची प्रशंसा केली. ओम बिर्ला म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या 'दूरदृष्टी आणि मार्गदर्शनामुळे' जी२० नेत्यांनी जारी केलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यात संवेदनशील मुद्द्यांवर एकमत झाले.
राजधानी दिल्ली येथे नुकतीच जी-20 परिषद पार पडली. त्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोघांमध्ये अनेक मुद्दांवर चर्चा झाली.
गेल्या दोन दिवसांपासून भारतात अडकून पडलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो अखेर त्यांच्या मायदेशी रवाना झाले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दिल्ली येथे आयोजित जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी जस्टीन ट्रुडो भारतात आले होते.
दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेचा रविवारी समारोप झाला. या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात आले होते. त्यामुळेच भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेकडे जगाच्या नजरा खिळल्या होत्या. जगभरातील माध्यमांनी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या जी-२० च्या बातम्यांकडे विशेष लक्ष दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जी-२० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले. भारतातून व्हिएतनामला रवाना होण्यापूर्वी त्यांनी या जी-२० शिखर परिषदेचे भरभरून कौतुक केले. अनेक प्रश्न सोडवण्यात यंदाची परिषद यशस्वी झाल्याचे बिडेन म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० नेत्यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जी-२० नेत्यांसह केंद्रीय मंत्री आणि अनेक मुख्यमंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो समोर आले आहेत. पण एका फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वास्तविक, या फोटोमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन एकत्र दिसत आहेत.
दिल्ली येथे ९ व १० सप्टेंबर रोजी जी-20 परिषद संपन्न झाली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक सुवर्ण दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जग' जिंकले असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत जी-20 परिषदेचे कौतूक केले आहे.
दिल्लीतील जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या आहेत. अशातच रविवारी (१० सप्टेंबर) पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील भारत-कॅनडा संबंधांवर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात जी-२० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन करुन दाखवल्यामुळे संपूर्ण देशाला यावेळी त्यांचा अभिमान वाटत आहे. देशभरातून सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच आता शाहरुख खाननेही एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी शिखर परिषदेच्या यशाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
अमेरिका, सौदी अरेबिया आणि इतर देश जी-20 शिखर परिषदेत भारत आणि युरोपसह अरब देशांना जोडण्यासाठी एक मोठा रेल्वे प्रकल्प आणि बंदर बांधण्यासाठी करारावर स्वाक्षरी करणार आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
भारताच्या जी-२० शिखर परिषदेच्या तयारीची चर्चा जगभरात होत आहे. भारतात होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेबद्दल परदेशी मीडिया भरपूर वार्तांकन करत आहे. पण काही विदेशी प्रसारमाध्यमे भारताची बदनामी करण्यासाठी नकारात्मक बाजूने वार्तांकन करत आहेत. या नकारात्मक वार्तांकनावर रशिया संतापला आहे.
दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेचे पहिले सत्र संपले आहे. या सत्राक अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या सत्रात आफ्रिकन युनियनला नवीन सदस्य बनवण्याची घोषणाही करण्यात आली. यानंतर जी-२० ला आता जी-२१ म्हटले जाईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया साईटवर म्हटले आहे.
राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज सकाळी जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेतली. पण त्याचवेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंना मात्र मोदींनी फक्त हस्तांदोलनच केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी, भारत आणि ब्रिटनमधील व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरु असलेल्या जी-२० शिखर परिषदेतून भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. परिषदेच्या पहिल्याच दिवशी जी-२० चे संयुक्त घोषणापत्र मंजूर करण्यात आले आहे. शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात याची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी जी-२० शेर्पा, मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
"सर्व दबावांना न जुमानता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारताचे हित शीर्षस्थानी ठेवून योग्य धोरण स्वीकारले आहे," असं मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जी-२० शिखर परिषदेपासून चंद्र मोहिमेच्या यशापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आणि लष्कराचे जवान दिल्लीच्या कानाकोपऱ्यात तळ ठोकून आहेत. मध्य दिल्लीतील अनेक भागात सर्वसामान्य लोकांना जाण्यास मनाई असल्यामुळे काही भागात लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारताने आपल्या जी-20 अध्यक्षीय काळात, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या वार्षिक महत्वपूर्ण बैठकीतील फलनिष्पत्तीविषयक दस्तऐवज आणि अध्यक्षीय सारांश पूर्ण वाटाघाटी अंती स्वीकारण्यात आलेला पहिला देश म्हणून आघाडी घेतली. या सर्वसमावेशक दस्तऐवजामध्ये बहुपक्षीयता मजबूत करणे, दहशतवादाविरुद्ध लढा आणि जागतिक आरोग्याशी निगडित विविध पैलूंसह सदस्य राष्ट्रांशी निगडित इतर अनेक महत्वाच्या संकल्पना अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देणारे पत्र शेअर केले आहे. ज्यावेळी 'इंडिया की भारत' या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींना मिळावलेल्या इंडोनेशिया दौऱ्याच्या पत्रात 'द प्राइम मिनिस्टर ऑफ भारत' असे लिहिले आहे. दरम्यान काँग्रेसने गोंधळ घालत भाजपवर टोला लगावला आहे.संबित पात्रा यांनी पोस्ट केलेल्या पत्रात इंग्रजीत माहिती आहे. त्यात 'प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया' असे न लिहता. 'प्राइम मिनिस्टर ऑफ भारत' असे लिहण्य
९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचे आमंत्रण जगभरातील ४० राष्ट्रप्रमुखांना देण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दावा केला आहे की ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या जी-२० डिनरच्या निमंत्रण पत्रात राष्ट्रपतींचा उल्लेख 'इंडिया'च्या राष्ट्रपती ऐवजी 'भारता'च्या राष्ट्रपती (प्रेसिडेंट ऑफ भारत) असा केला आहे.
भारत-कॅनडा दरम्यानच्या प्रस्तावित व्यापार कराराला कॅनडाने नुकताच विराम दिला. त्याचवेळी कॅनडामध्ये खलिस्तानसाठीचे सार्वमतही रद्द करण्यात आले असून, दि. ८ सप्टेंबरला खलिस्तान्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला लॉकडाऊन करण्याची धमकी दिली आहे. याच वेळी कॅनडाचे पंतप्रधान भारत दौर्यावर येणार आहेत. एकूणच खलिस्तानी चळवळीला कॅनडात मिळणारे पाठबळ आणि त्याचा भारत-कॅनडा व्यापारी संबंधांवर होणारा परिणाम म्हणूनच दुर्लक्षित करता येणार नाही.
राजधानी दिल्लीत सध्या जी-२० परिषदेची तयारी सुरू आहे. या बैठकीला २० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. त्यातच आता काही खलिस्तानी कट्टरपंथीयांनी दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशनवर खलिस्तान समर्थकांकडून घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
मुंबई : जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत महामहिम राज्यपाल रमेश बैस जी यांच्यासह सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. तसेच सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली.
मुंबई : भारताच्या जी-२० अध्यक्षतेखालील उर्जा संक्रमण कार्य गटाची (ETWG) तिसरी बैठक १५ ते १७ मे २०२३ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जी-२० सदस्य देश, विशेष आमंत्रित देश तसेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (आयईए) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थामधील १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
दिल्ली : अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे भारत दौऱ्यावर येणार आहे. जो बायडेन यांचा हा दौरा सप्टेंबर महिन्यात असणार आहेत. भारत-अमेरिका परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण असेल. अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी म्हटल्यानुसार, भारत-अमेरिका यांचे संबंध मजबूत आहेत, त्यामुळे भारत दौऱ्याकरिता आम्ही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘वसुधैव कुटुम्बकम्’ याच वैदिक विचाराच्या आधारावर दुसरा आफ्रिका-भारत संयुक्त लष्करी सराव पुण्यात नुकताच आयोजित करण्यात आला होता. हा आफ्रिकी देशांसोबतच्या भारताच्या राजनैतिक संबंधांचा एक महत्त्वाचा आयाम आहे. यात तब्बल २४ आफ्रिकी देशांच्या सैन्याने प्रतिनिधित्व केले. त्यानिमित्ताने भारत-आफ्रिका सहकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. अदानी कंपनीच्या शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असताना, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या राजकीय हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आज समस्या सोडवण्याचे माध्यम बनत आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले होते की, एकेकाळी आपल्या बहुतेक समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून असलेला भारत आता जगाच्
Model G-20 - ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप’तर्फे शुक्रवार, दि. ३० जानेवारी आणि शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी मुंबई जवळील उत्तन कॅम्पसमध्ये ‘मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट’ (MILM) अंतर्गत भारतातील पहिल्या ‘मॉडेल जी-२०’चे आयोजन करण्यात येत आहे. मॉडेल जी-२० हे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायीकांसाठी एक व्यासपीठ आहे. ‘जागतिक भागीदारी : संधी आणि आव्हाने’ या थीम अंतर्गत कार्यक्रमाचे एकूण मुख्य ट्रॅक(G20), फायनान्स ट्रॅक(F20) आणि सिव्हिल सोसायटी ट्रॅक(C20) असे तीन ट्रॅक असतील.
‘जी २०’ चे अध्यक्षपद मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिनिधींची (शेर्पा) पहिलीच बैठक राजस्थानमधील उदयपूर येथे रविवारपासून सुरू झाली आहे. या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींसाठी ‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना राबवण्यात आली असून चार दिवस चालणार्या या बैठकीसाठी परंपरागत पद्धतीने शेर्पांचे स्वागत करण्यात आले.
‘डीपीपी’ हा तैवानमधील चीनविरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. ’डीपीपी’ची तैवानवरील सत्ता चीनला कायम आव्हान देत आली आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीतील ’डीपीपी’च्या पराभवाने बीजिंगमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था प्रक्रिया गरजेची असल्याचे परखड मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच व्यक्त केले.निर्मला सीतारामन यांनी ‘जी-२०’ सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या (एफएससीबीजी) बैठकीत आपला सहभाग नोंदवला. इटलीच्या अध्यक्षतेखाली, वॉशिंग्टन डी.सी. जागतिक नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या शाश्वत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही देशातून ‘कोविड’व
जपानमध्ये सुरू असलेल्या 'जी-२०' देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या वेळी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी जपान, अमेरिका आणि इंडिया यांचा अर्थ 'जय' असा होतो आणि हिंदी भाषेत 'जय'चा अर्थ विजय असा होतो, असे प्रतिपादन केले.
स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी ट्विट केला आहे. या फोटोला त्यांनी 'कितने अच्छे हैं मोदी' असा शीर्षक दिले आहे.
उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी केंद्र सरकारने शक्तिचंदा दास यांची नियुक्ती केली आहे. व्ययक्तिक कारणामुळे तातडीने राजीनामा दिल्यानंतर देशाचे २५ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे.
२०२२ मध्ये होणारी जी-२० देशांची तेरावी शिखर परिषद भारत होणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिना येथे केली
जी २० शिखर परिषद २०२२चे यजमानपद भारताकडे पंतप्रधानांनी ट्विटरवरून केली घोषणा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात अर्जेंटीना येथे सुरु असलेल्या जी-२० शिखर परिषदेमध्ये पहली त्रिपक्षीय बैठक पार पडली