नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदूंवर ( Hindu ) होणार्या अत्याचार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ सिव्हिल सोसायटी ऑफ दिल्लीतर्फे मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात साध्वी ऋतंभरा यांची विशेष उपस्थित होती.
Read More
केंद्र सरकारने खलिस्तान्यांशी संबंधित १० हजार ५०० हून अधिक युआरएल ब्लॉक केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजमाध्यमे आणि इंटरनेटवर पसरवलेला खलिस्तानी प्रचार रोखण्यासाठी गेल्या ३ वर्षांत ही कारवाई केली आहे.
( PFI ) भारतातील प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्ध ईडीच्या दोन वर्षांच्या तपासात नवे खुलासे समोर आले आहेत. पीएफआयचे सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये १३ हजारांहून अधिक सक्रिय सदस्य आहेत, ज्यांच्याकडे करोडो रुपयांचा निधी उभारण्याची जबाबदारी असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
संदीप टंडन यांच्या मालकीचे क्वांट म्युच्युअल फंड (Quant Mutual Fund) विरूद्ध सेबीने कारवाई केली आहे. सेबी अँक्शन मोडवर येत क्वांट म्युच्युअल फंडाच्या कार्यालयावर छापे टाकले असून कंपनीची कसून चौकशी सुरू केली आहे. कंपनीचे मालक संदीप टंडन यांचीही चौकशी सुरु करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फ्रंट रनिंग (Front Running) मार्फत बेकायदेशीरपणे २० कोटींचा नफा कमावल्याचे आरोप टंडन यांच्यावर करण्यात आले आहेत.
राम मंदिराची गरजच काय, त्याऐवजी इस्पितळ उभारा वगैरे वक्तव्ये विरोधकांकडून अगदी सर्रासपणे केली गेली. पण, आता राम मंदिर परिसरात उभ्या राहत असलेल्या इस्पितळ सुविधेमुळे राम मंदिराच्या उभारणीस विरोध करणार्या विविध विघ्नसंतोषी नेत्यांना परस्पर उत्तर मिळाले आहे.
राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक असून त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असा टोला डाव्या आघाडीचे आमदार पी. व्ही. अन्वर यांनी लगावला आहे.
निवडणुकांचे वारे वाहू लागले की कार्यकर्त्यांना उमेदवारीचे वेध लागतात. मोठ्या पक्षांकडून प्रत्येकाला संधी मिळतेच असे नाही. अशावेळी नाराज झालेले काहीजण स्वतःचा पक्ष काढून राजकीय नशीब आजमावतात. पण, निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर पुढचे सोपस्कार पूर्ण करण्यात अनेकजण दिरंगाई करतात. अशा तब्बल २१९ राजकीय पक्षांवर गेल्या ७ वर्षांत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वार्षिक लेखा परीक्षण अहवाल, आयकर विवरण सादर करण्यात कुचराई केल्यामुळे या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती 'मुंबई तरुण भारत'च्या हाती लागली
गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरचा पाकिस्तान पुरस्कृत फुटीरवादी नेता यासिन मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. गृहमंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (यासिन मलिक) नावाची संघटना संस्थेविरुद्ध देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृतींमध्ये ती गुंतलेली असल्याने त्यांच्या विरोधात मिळालेल्या इनपुटनंतर त्यांच्यावर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय पुरात्त्व सर्वेक्षणाने (एएसआय) भोजशाळेच्या ऐतिहासिकतेचे वैज्ञानिक आणि तांत्रिक सर्वेक्षण करावे, असा आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने दि. ११ मार्च रोजी दिला आहे.मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सरस्वती मंदिर भोजशालेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका हिंदू फ्रंट फॉर जस्टिसतर्फे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती. याचिकेवर न्यायमूर्ती एस. ए. धर्माधिकारी आणि न्या. देवनारायण मिश्र यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळ
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) पदाधिकारी रुद्रेश यांच्या हत्येचा आरोपी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) दहशतवादी मोहम्मद गौज नियाझी यास दक्षिण आफ्रिकेतून अटक केली आहे.
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या पक्षकारांपैकी एक असलेले आशुतोष पांडे यांना पाकीस्तानातून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. आशुतोष पांडे यांनी असा आरोप केला आहे की, त्यांचा फेसबुक आयडी हॅक करण्यात आला आहे व त्यांना पाकीस्तानकडून धमक्याही देण्यात येत आहेत.
ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने बंदी घातलेल्या इस्लामिक संघटना PFI (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना संघटनेत वेगवेगळ्या पदांवर बसवण्यात आले. हवालाच्या माध्यमातून परदेशातून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी देशविरोधी कारवायांमध्ये वापरण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. डिसेंबर २०२० मध्ये पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करताना सापडलेल्या तपशीलांच्या आधारे त्याची चौकशी करण्यात येत होती. हे सर्व आरोपी पीएफआयच्या बँक खात्यांवर सह्या करायचे.
मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार विरोधी पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) वर प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे. झेडपीएम सध्या २९ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट फक्त ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ३ आणि काँग्रेस अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.
मागच्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिजोराम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु होती. आज शेवटच्या टप्यात तेलंगणा राज्यात ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. यानंतर लगेच सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झीट पोलची चर्चा सुरु झाली.
मणिपूर खोऱ्यामधील सर्वात जुना बंडखोर सशस्त्र गट असलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (युएनएलएफ) बुधवारी दिल्लीत शांतता करारावर स्वाक्षरी केली. या गटाने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. केंद्र सरकारने या गटाव पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर युएनएलएफने हा निर्णय घेतला आहे.
मणिपूरमधील हिंसक घटनांवरून विरोधकांच्या हल्ल्यांदरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला असला तरी, गेल्या ९ वर्षांत ईशान्य भागात शांतता आहे.
‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील धर्मांध अतिरेकी संघटनांना बळ मिळाले. काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील हिंदू आणि शीख बांधवांच्या घरावर ‘घर सोडून चालते व्हा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा धमकीवजा इशारा कट्टरतावाद्यांनी दिला. त्यामुळे सध्या इस्रायलचा कडाडून निषेध करणारे, रस्त्यावर उतरणारे राजकीय पक्ष आणि संघटना यांना ‘हमास’चा हमखास पुळका, पण काश्मिरी हिंदूंच्या वेदनांची पुसटशी जाणीवही नाही, हेच वास्तव!
कार्यशाळेच्या बहाण्याने विद्यार्थ्यांना मशिदीत नेणाऱ्या गोव्यातील एका खासगी शाळेच्या प्राचार्याला निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मशिदीत नमाज पठण करायला लावल्याचा आणि इतर इस्लामिक कृत्ये करायला लावल्याचा आरोप प्राचार्यावर आहे. मशिदीतील कार्यक्रमामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनेचा हात असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेवर राज्याच्या शिक्षण विभागानेही शाळा व्यवस्थापनाकडून उत्तर मागितले आहे.
मध्य प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नुकतेच हिज्ब-उत-तहरीर (HUT) कारवाई केली आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील १६ लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हिजबुल-उल-तहरीरमधील १६ जणांच्या अटकेबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जी माहिती समोर आली त्या माहितीच्या आधारे आरोपींची चौकशी केली जात आहे. तसेच आम्ही लव्ह जिहाद, धर्मांतर आणि त्यानंतर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याच्या विरोधात आहोत. असे ही शिवराज सिंह चौहान म्हणाले.
उच्च क्षमतेच्या खाण उपकरणांच्या आयातीवर भारताचा अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी कोळसा मंत्रालयाने कोळसा खाण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन क्षमता विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध मंत्रालयांसह खासगी उद्योगांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने १५ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. त्यातील नऊ विजयी झाले. पण, जनता दल (धर्मनिरपेक्ष) ने २२ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. पण, त्यातील एकही उमेदवार जिंकला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मुस्लीम उमेदवार देऊनही असे नेमके काय घडले, हे यानिमित्ताने समजून घ्यायला हवे.
विशेष प्रतिनिधी प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई सुरू आहे. एनआयएने सोमवारी देशभरातील पीएफआयच्या जवळपास १७ ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
नुकतेच ‘एनआयए’ने पुण्यातील कोंढवा भागातील ‘ब्लू बेल’ शाळेतील दोन मजल्यांना ‘सील’ केले. या शाळेचा गैरवापर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेने युवकांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी केल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्यावर्षी दि. २२ सप्टेंबरला ‘एनआयए’ने या मजल्यांची तपासणी केली होती. आक्षेपार्ह कागदपत्रे, भारत सरकारविरोधी कारवाया, तसेच प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून युवकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी या जागेचा वापर केला गेला. त्यानिमित्ताने...
जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी बाटा-डोरिया परिसरातील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (युएपीए) न्यायाधिकरणाने मंगळवारी कट्टरपंथी इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियास (पीएफआय) बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्याचा आणि त्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे.
केरळमध्ये ‘लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट’ (एलडीएफ) मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात सत्तेवर आहे. निधर्मीपणाचा आव आणत आणि स्वतःला गरिबांचा कैवारी मानत विजयन सत्तेवर आले खरे. पण, केरळमधील वाढती धर्मांधता, भ्रष्टाचार, ‘इसिस’मध्ये दहशतवादी कृत्ये करण्यास केरळमधून भरती होणारे मुस्लीम युवक, ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हजारो मुली, याबाबत ते चकार शब्द उच्चारत नाहीत. आपल्यानंतर आपला जावई मोहम्मद रियाजच मुख्यमंत्री व्हावा, अशी खेळी करण्यात ते सध्या मग्न आहेत. यासंदर्भात पिनराई आणि केरळचे वास्तव मांडण्याचा या लेखा
फेब्रुवारीच्या अखेरीस होणाऱ्या मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील सर्व ६० जागांवर उमेदवारांची घोषणा गुरूवारी केली आहे. दरम्यान, नागालँडमध्येही ६० पैकी २० जागांवर भाजप निवडणूक लढविणार असून उर्वरित जागा आघाडीतील भागीदार एनडीपीपीला देण्यात आल्या आहेत.
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सरकारने अखेर उच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर बंदी घातलेल्या मुस्लीम कट्टरतावादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कट्टरतावादी सदस्यांची संपत्ती जप्त केली आहे.
मुळात ज्या संघटनेची स्थापनाच राष्ट्रद्रोहाचे विष पेरण्यासाठी झाली होती, तिने कितीही सभ्यतेचा बुरखा परिधान केला तरीही कधीतरी सत्य उघडकीस येणार होतेच. देशातील आठ राज्यांमध्ये विविध संघटनांना आपल्यात गिळून त्यांना विषारी दंश करण्याची शिकवण देणारी संघटना स्वत:च या विषाने कधीतरी संपणार होतीच. अशा या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘पीएफआय’ आणि याशिवाय 1) कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया 2) रिहॅब इंडिया फाऊंडेशन 3) अखिल भारतीय इमाम परिषद 4) नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन 5) नॅशनल वुमन फ्रंट 6)ज्युनियर फ्
गेल्या 12 वर्षांत उपसचिव ते सचिव ते मंत्री अशी वाटचाल करताना लिझ ट्रस यांनी पर्यावरण, व्यापार, महिला विकास ते परराष्ट्र व्यवहार अशी महत्त्वाचे विभाग सांभाळले आहेत. पण, आता ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून ‘ब्रेक्झिट’ पश्चात ब्रिटनला नवीन दिशा देण्याचे सर्वात मोठे आव्हान लिझ ट्रस यांच्यासमोर असणार आहे.
‘पीएफआय’सारखी धर्मांध संघटना कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झाली, त्याचे परिणाम काय होऊ शकतात व ‘पीएफआय’ने इस्लामी राष्ट्र स्थापनेसाठी आणखी २५ वर्षांचा कालावधीच का निश्चित केला? असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. त्यांच्या उत्तरांचा तपास केला असता ‘पीएफआय’च्या स्थापनेचे धागेदोरे ऑटोमन साम्राज्याच्या पतनापर्यंत मागे जातात.
२०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र रचल्याचा खुलासा पाटण्यातून पर्दाफाश केलेल्या ‘दहशतवादी नेटवर्क’मधून उघड झाला आहे.
जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी भाजपनेदेखील जोरदार तयारी सुरु केली आहे.
कोणताही मुस्लीम पुरुष तीन स्त्रियांशी ‘निकाह’ करू शकत नाही, असे सुनावतानाच आसामी मुस्लीम आपल्या म्हणण्याला पाठिंबा देत असल्याचे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केले आहे.
काशीमधील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही ईदगाहविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रार्थनास्थळ कायद्याचा भंग करणार्या आहेत. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अतिशय निराशाजनक असून देशभरातील मुस्लिमांनी त्याचा निषेध करावा; अशा शब्दात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या मुस्लीम कट्टरतवादी संघटनेने चिथावणी दिली आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी ढाचा, मथुरा येथील शाही ईदगाह यांसारख्या हिंदू मंदिरे पडून उभारलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदू संघटनानांनी न्यायालयीन मार्गाने आवाज उठवला आहे
केरळच्या पलक्कड जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एसके श्रीनिवासन (४५) या स्वयंसेवकाची शनिवारी (दि. १६ एप्रिल) रोजी हत्या करण्यात आली होती. त्याच्याशी संबंधित ७ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून सोमावार, दि. २५ एप्रिल रोजी आणखी दोन आरोपींना अटक केल्याचे उघड झाले आहे. यातले बहुतांश आरोपी हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याची राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे कार्यकर्ते असल्याचे स्थानिक पोलिसांयाकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या काळात अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कित्येक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे कोरोनामुळे निधन झाले.कोरोनामुळे निधन झालेल्या अशा कुटुंबातील किमान एका वारसालाअनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्यावे
‘सरल पोर्टल’ वरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर संचमान्यता करण्यात यावी, हे शासनाचे आदेश चुकीचे आहेत. हे आदेश तातडीने मागे घ्यावेत,” अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी नुकतीच शासनाकडे केली आहे.
कर्नाटकात सुरू झालेल्या बुरखा वादाचे कनेक्शन हळूहळू इस्लामिक कट्टरवाद्यांशी जोडले जात आहे. अलीकडेच, एक अहवाल समोर आला होता ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की वर्गात बसण्यासाठी हिजाब घालण्याचा आग्रह करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनी 'कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया' या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आल्या.
राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधुन दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
मध्य अमेरिकेतील निकारगुआ देशात गेल्या आठवड्यात झालेल्या ‘नॅशनल असेंब्ली’सह अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल लागले. डॅनियल ओर्टेगा सलग चौथ्यांदा अध्यक्ष बनले. मीडिया रिपोर्टस्नुसार, ओर्टेगा यांना ७६ टक्के मते मिळाली, त्यांचे प्रतिस्पर्धी वॉल्टर एस्पिनोझा यांना केवळ १४ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. म्हणजेच, ओर्टेगा यांनी पूर्णपणे एकतर्फी विजय मिळवला. ओर्टेगांनी एवढा मोठा विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरली
मेहबुबा मुफ्ती यांच्या या देशद्रोही वक्तव्याची गंभीर दाखल भारत सरकारने घ्यायलाच हवी. तालिबानी राजवटीचा एवढा कैवार असेल, तर आपले चंबूगबाळ आवरून त्यांनी आणि त्यांच्या पित्त्यांनी सरळ काबूल गाठायला हरकत नाही.
सध्या शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा तिसर्या आघाडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तूर्त हे प्रयत्न फारच प्राथमिक अवस्थेत आहेत. यानिमित्ताने आघाडी सरकारांनी आजवर देशहिताच्या दृष्टीने काही केले आहे का आणि आताच्या परिस्थितीत केंद्रामध्ये भविष्यात असे सरकार येण्याची कितपत शक्यता आहे, यांचा ऊहापोह करणारा हा विस्तृत लेख...
भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंचा शरद पवारांच्या दिल्लीतील बैठकीवरून खोचक टोला
कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, येत्या सोमवार, दि. २१ जूनपासून ही लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. १८ जून रोजी दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोविड-19 फ्रंटलाइन वर्कर्ससाठी क्रॅश कोर्स सुरू केला. पीएम मोदी यांनी २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून १ लाख योद्धा तयार होणार असून त्यांना रोजगार मिळणार आहे.
प्रभू श्रीराम मंदिरावर टीका केल्याच्या निषेधार्थ मोर्चा
कोरोना काळातदेखील स्वतःचा जीव धोक्यात घालुन वृत्तपत्र विक्रेते ग्राहकांना सेवा देत असुन एकप्रकारे समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत.