वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर असल्याचा दावा करणारे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांना गुरुवार, १८ एप्रिल रोजी बीड पोलिसांनी अटक केली आहे.
Read More
आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. परंतू, आपण ती नाकारली, असा खळबळजनक दावा निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बीड जिल्हा सत्र न्यायालयात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. आपणच देशमुखांची हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
बीडमधील २६ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी याबाबतची माहिती दिली.
बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली असून वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाल्मिक कराडच्या बातम्या बघितल्याने अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे.
वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस? असा सवाल करत बीडमधील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
निवडणूकीच्या आधी धनंजय मुंडे आणि कराडने माझी भेट घेतली होती असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीच्या ताब्यात असलेला आरोपी वाल्मिक कराड याला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, बुधवार, १५ जानेवारी रोजी परळीमध्ये व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.
मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाल्मिक कराडवर मकोका लावल्याची बातमी पुढे आली असतानाच आता कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळी शहरात मोठे आंदोलन सुरु असून सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणातील दोषींना अजिबात थारा दिला जाणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर मंगळवार, १४ जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सभागृहात बीड प्रकरणावर चर्चा सुरु असताना वाल्मिक कराड पुण्यात एका हॉस्पीटलमध्ये टीव्हीवर तमाशा बघत होता, असा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवार, ४ जानेवारी रोजी परभणी येथे मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बीड सरपंच हत्या प्रकरण सध्या चांगलेच तापले असून यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर चढवणे, हा आमचा सर्वात पहिला प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मुंडेंचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
वाल्मिक कराडने पोलिसांना घाबरून शरणागती पत्करली, अशी प्रतिक्रिया रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांनी कोल्हापूर येथील अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(Sudarshan Ghule) सीआयडीच्या कारवाईनंतर खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना मंगळवारी ३१डिसेंबरला सीआयडीच्या पुणे मुख्यालयात शरण आला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे. मात्र मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुदर्शन घुले हा शरण येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून यातील फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआडीची तीन पथके पुण्यातून रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वाल्मिक कराड शरण आला, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने मंगळवारी सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नसून गुंडांचे राज्य चालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने सीआयडीपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत असून आता त्याची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
(MLA Suresh Dhas) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असे सुरेश धस म्हणाले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडले जाऊ नये, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवार, २६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
: (CM Devendra Fadnavis) बीडच्या मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येचा मास्टरमाईंड कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई होणार असून या घटनेची दोन प्रकारे चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी विधानसभेत बीड प्रकरणावर त्यांनी सविस्तर निवेदन दिले.