कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीसीपी) च्या एका नेत्याने म्हटले आहे की चीनमध्ये इस्लामचे चीनीकरण खूप महत्वाचे आहे आणि ते होईल. चीनच्या मुस्लीम लोकसंख्येच्या शिनजियांग राज्याबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. चीन दीर्घकाळापासून शिनजियांग प्रांतामध्ये राहणाऱ्या मुस्लीमांवर दडपशाहीची धोरणे अवलंबत आहे.
Read More
चीनने मुस्लिमांचे प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदींना बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चीन आता शिनजियांग प्रांताबाहेरील मशिदींविरोधातही कारवाई करत आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार चीन अनेक वर्षांपासून शिनजियांगमधील अल्पसंख्याक उईगुर मुस्लिमांवर अत्याचार करत आहे.
चीनने मशिदी बंद करण्याची मोहीम तीव्र केली आहे. तो आता शिनजियांग प्रांताबाहेरील मशिदींविरोधातही प्रचार करत आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. ह्युमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार चीन अनेक वर्षांपासून शिनजियांगमधील अल्पसंख्याक मुस्लिमांवर कारवाई करत आहे. दरम्यान १८०० चीनमधील मशिदी बंद करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला होता. चीन तर अजूनही त्यातून सावरलेला दिसत नाही. कोरोनाचे पडसाद आजही चीनच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात उमटताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटने’ने चीन सरकारकडे १०० व्यक्तींच्या सुटकेची मागणी केली आहे. या १०० जणांवर यापूर्वी कधीही कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. आताही या १०० जणांना अटका का झाली, तर त्यांनी खून, चोरी, बलात्कार अपहरण खंडणी कोणत्याही प्रकारचे भेदभावपूर्ण वर्तन वगैरेपैकी एक गुन्हा केला आहे का? तर नाही, या सगळ्यांचा गुन्हा एकच
संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले. गेल्या अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या यासंबंधीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. आता तो अहवाल समोर आला आणि चीन वगळता स्वतःला मानवाधिकारवादी, उदारमतवादी वगैरे म्हणवून घेणार्या देशांमध्ये खळबळ माजली.
पाकिस्तानचे चीनसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी उघडपणे उइगर मुस्लिमांना पाठ दाखवली आहे. बीजिंग दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एक संयुक्त निवेदन दिले, ज्यात तैवानसह दक्षिण चीन समुद्र, हाँगकाँग आणि शिनजियांग प्रांताच्या मुद्द्यावर शी जिनपिंग यांच्या एक चीन-एक धोरणाचे पालन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. .
चीनमधील उघूर मुसलमानांवर होणाऱ्या घृणास्पद अन्याय-अत्याचारांविरोधात जगभरातील पाश्चात्त्य देशांनी वेळोवेळी चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘आम्ही कुणाला जुमानत नाही’, ‘आम्ही कोणालाही उत्तरदायी नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत चीनने वारंवार उघूरांच्या नृशंस हत्याकांडाला केराची टोपलीच दाखविली. उघूरांवरील चिनी अत्याचारांची कुकृत्ये यापूर्वीही बरेचदा अनेक अहवालांतून, काही सुखरुप सुटका करुन घेतलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून जगासमोरही आली.
आजवर तब्बल दहा लाख उघूर आणि अन्य मुसलमानांना चीनने ताब्यात घेतले आहे. उद्देश हाच की, त्यांनी इस्लामचा त्याग करावा; अन्यथा त्यांना चीनमध्ये जगण्याचा अधिकार नाही. चीन या शिबिरांना प्रशिक्षण शिबिराचे गोंडस नाव देत असला तरी ते तुरुंगापेक्षा किंवा एखाद्या छळछावणीपेक्षा नक्कीच कमी नाही.
इनर मंगोलियात मंगोलांची लोकसंख्या आधी ६० लाख इतकी होती. मात्र, चिनी सरकारने तब्बल पाच लाख मंगोलांची अतिशय निर्दयतेने हत्या केली. परिणामी, आजच्या घडीला इनर मंगोलियातील मंगोलांची लोकसंख्या कमी होऊन ती केवळ १५ लाखांवर येऊन ठेपली आहे. मंगोलांचा नरसंहार करतानाच चीनने उरल्या-सुरल्यांवर सांस्कृतिक व आर्थिक दडपशाही सुरू केली.
भारत- चीन सीमावाद वाढण्याची शक्यता
नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, चीनमध्ये केवळ उघूरांवरील अत्याचारच सुरु नसून, महिलांची बळजबरीने नसबंदीही केली जाते, जेणेकरुन उघूरांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल. चीनमधून हाती आलेले काही स्थानिक दस्तावेज आणि स्थानिक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतींच्या माध्यमातून ही माहिती समोर आल्याने चीनमध्येही एकच खळबळ उडाली.