दिल्लीत बेकायदा राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या मुसक्या आवळा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनास दिले आहेत.
Read More
दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताकाळात अनेक घुसखोरांनी दिल्लीमध्ये स्वत:चे बस्तान बसवले. सरकारी कृपेने सर्व सुविधा मिळाल्याने या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे चांगलेच फावले. या घुसखोरांनी दिल्लीमध्ये आज सर्वत्र हातपाय पसरवले आहेत. त्यांच्या या घुसखोरीचे वास्तव मांडणारा अहवाल ‘जेएनयु’ने जाहीर केला, त्याचा मागोवा...
देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येचे स्वरूप बदलत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबई शहरातील लोकसंख्येच्या रचनेवर खोलवर परिणाम करणारे बदल नमूद केले आहेत. हिंदू लोकसंख्येमधील लक्षणीय घट आणि मुस्लिम लोकसंख्येतील लक्षणीय वाढ ही चिंताजनक बाब असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
रोहिंग्या मुस्लिमांचा गट ज्यामध्ये काही महिला व मुलांचाही समावेश होता, ते मलेशियाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा इंडोनेशियाच्या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर आले असता, स्थानिकांनी त्यांच्या घुसखोरीचा निषेध केला व त्यांना बोटीतून खाली उतरू दिले नाही.
काही वर्षांपूर्वी म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार झाले, म्हणून मुंबईच्या रस्त्यावर रझा अकादमीने नंगानाच केला. पुढे याच रोहिंग्या घुसखोरांनी बांगलादेशसह भारतात घुसखोरी केली. भारतात काही राजकीय पक्षांनी मतपेढीच्या स्वार्थासाठी रोहिंग्यांना अभयही दिले. पण, आता म्यानमारमध्ये उरल्यासुरल्या रोहिंग्यांनी हिंदू आणि बौद्धांची पाच हजार घरे पेटवली. यावर भारतातील रोहिंग्यांच्या रक्षकांचे आणि पुरोगाम्यांचे मौन त्यांच्या दांभिकतेचे दर्शन घडविणारेच!
परळच्या पोस्टगल्ली परिसरातील हिंदू तरुणांवर भ्याड हल्ला करणाऱ्या कट्टरपंथींविरोधात राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) बुधवारी चांगलेच आक्रमक झाले. हिंदूंवर हल्ले कराल, तर याद राखा, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास कुचराई करणाऱ्या भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.