सप्टेंबर महिन्यात धुवाँधार बरसात केल्यानंतर परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात दडी मारली. परिणामी, उन्हाचा पारा चढला असुन हवेत आद्रता असल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला असुन गेले काही दिवस तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यत पोहचले आहे. सोमवारी ठाण्यात ३५.०६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तेव्हा, कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा (हीटस्ट्रोक) धोका वाढला आहे.
Read More
काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या मढ येथे असलेल्या कथित स्टुडिओशी संबंधित एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणला होता. या घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. ६ ऑगस्ट) नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत.
पालिकेच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के, तर नदीकिनारी संरक्षक भिंतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
'नॅशनल वेटलॅण्ड अॅटलास'मधील प्रत्येक पाणथळींचे संरक्षण करण्याची सूचना
नव्या सर्वेक्षणानुसार राज्यात केवळ १५ हजार ८५६ पाणथळी
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.