एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्
Read More
वारकरी संप्रदायात त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भक्तीमार्गातील त्यांचे योगदान अनमोल असून हरिपाठातील अभंग आजही प्रेरणा देतात. ज्ञानेश्वर माउलींनी आळंदी येथे समाधी घेतली, परंतु त्यांची माणूसधर्माची विचारधारा अजरामर आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाजाला समता, मानवता आणि प्रेम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. त्यांच्या शिकवणीतून अखंड माणुसकीचा, करुणेचा झरा वाहतो म्हणून त्यांना ‘माऊली’ असे संबोधले जाते.
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेल्या पवन कल्याण यांनी तमिळनाडूतील हिंदी विरोधावर टीका करताना, तमिळ राजकीय नेते ढोंगी असल्याचा आरोप केला. त्यांनी विचारले की, "तमिळनाडूतील नेते हिंदीच्या सक्तीला विरोध करतात, पण त्याचवेळी त्यांच्या चित्रपटांचे हिंदीत डबिंग करून व्यावसायिक लाभ घेतात. यामध्ये नेमका कोणता न्याय आहे?"
'छावा' चित्रपटात रायाजीची भूमिका साकारलेला मराठी अभिनेता संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, "मी अक्षय खन्नाशी बोललो नव्हतो," असं म्हटलं होतं. त्यावरून त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अखेर या विषयावर फोकस इंडियन या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने मनोगत व्यक्त केलं आहे.
भारतीय चित्रपटसृष्टी पारंपारिकरित्या बॉलिवूडच्या वर्चस्वाखाली होती, परंतु सध्या दिग्दर्शक सर्जनशील स्वातंत्र्यासाठी या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदलत्या प्रवृत्तीमुळे भारतीय सिनेमाच्या कथा सांगण्याच्या शैलीत होणाऱ्या बदलांबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराग कश्यप यांनी आपल्या असामान्य कथनशैलीसाठी आणि प्रस्थापित नियमांना धक्का देण्याच्या तयारीसाठी ख्याती मिळवली आहे. मात्र, अलीकडील घडामोडींमध्ये कश्यप बॉलिवूडपासू
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. ‘छावा’मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर "औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता" असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं. अबू आझमीने केलेल्या वादग्रस्त विधानावर "औरंगजेबाची कबर उखडून टाकावी", असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले होते. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असताना याच दरम्यान औरंगजेबाच्या थडग्याबाबत लेखक व गीतकार मनोज मुंतश
कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही 'फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत.
मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. त्यातच गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. या ८ मार्च रोजी,खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ घेऊन आले आहेत 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर! महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आपल्या जवळच्य
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे ९४ व्या वर्षी निधन झाले. प्रेमाताई नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखरदांडे या प्रसिद्ध संगीत कंपनी हिज मास्टर्स व्हॉइस (एचएमव्ही) चे वसंतराव कामेरकर यांची कन्या होत्या. अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबातच होता—त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या.
प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही. वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम, आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. "माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा", लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे, जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.
दक्षिण भारतीय संगीतसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि गीतकार कल्पना राघवेंद्र बेशुद्ध अवस्थेत आढळली असून, त्यांना तातडीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा कल्पनाचे घर दोन दिवसांपासून बंद असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, कल्पना बेशुद्धावस्थेत आढळल्या. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्या व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प