मुंबईमध्ये जो कोणी येतो त्याची स्वप्ने पूर्ण होतात. मात्र, आपण बाहेर नोकरी करत भटकतोय, हे दिपक यांना कुठेतरी मनात खटकायचं. आयुष्यात जर मोठ्ठं काही करायचं असेल, तर ते नोकरीमध्ये शक्य नव्हतं. त्यासाठी स्वत:चा उद्योग-व्यवसाय करणेच योग्य आहे, हे त्यांना उमजले होते. लग्न झाले होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून उद्योग करणे, खरेतर धाडसाचे होते. घरी सांगितले असते, तर या अनिश्चिततेला त्यांनी नकारच दिला असता. सारासार विचार करुन त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. ती मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली. दिपकना आभाळाएवढ
Read More