( Twist in Legislative Council elections ) विरोधकांकडे एकही आमदार निवडून आणण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना, नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. सोमवार, दि. १७ मार्च रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या दि. २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
Read More
दि. कुर्ला नागरिक सहकारी बँकेची निवडणूक दि. १६ मार्च रोजी नियोजित आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने शासकीय नियमाला बगल देत शाखा निहाय निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. हे गंभीर असून, ही निवडणूक तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सहकारी निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ च्या नियम ३ (ह) नुसार, मतदान केंद्रे अधिक संख्येने व सोयीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधि
(Maharashtra Legislative Council Elections 2025) राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जर्मनीत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे फ्रेडरिक मर्झ जर्मनीचे अध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे. युरोपातील जर्मनीचे स्थान बघता, एकूणच युरोपच्या भवितव्यावर परिणाम घडवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकातील निकालांचा आणि संभाव्य परिणामांचा घेतलेला हा आढावा...
भारतात सत्तापालटासाठी ‘युएसएड’चा वापर झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आरोप अर्थहीन ठरवित, काँग्रेसने या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील.
२०२४च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या कामगिरीतून धडे घेत भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल केले. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची कामगिरी चमकदार ठरली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही लालू आणि काँग्रेसवर भाजप कुरघोडी करून विजयी होईल, हे निश्चित.
युरोपियन महासंघातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणार्या जर्मनीमध्ये रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पडतील. तेव्हा, या निवडणुकीत जर्मनीला भेडसावणार्या समस्यांना सामोरे जाणार्या पक्षाला तेथील नागरिक मतदान करतात की, पुन्हा एकदा विविध विचारसरणींचे पक्षच एकत्र येऊन खिचडी सरकार बनवितात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आगमनामुळे या निवडणुकीवर काय प्रभाव पडू शकेल, याचे विश्लेषण करणारा हा लेख...
भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार, असे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेली १० वर्षे असलेले दिल्लीकरांवरचे 'आप'चे संकट दूर झाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या विजयाच्या मार्गावर असून आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे कृपया मला फोन करू नका, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
‘दिल्ली हैं दिलवालों की’ असा हा देशाच्या राजधानीचा स्वभावगुण. तेव्हा, यंदा दिल्लीकरांनी मतपेटीतून कुणाला आपला ‘दिल’ दिला आणि कुणाला दगा दिला, ते उद्याच्या शनिवारी स्पष्ट होईलच. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे, ‘आप’विषयी नाराजी आणि मतांची टक्केवारी काय सांगते, याचा उहापोह करणारा हा लेख...
“दिल्लीत यंदा भाजपलाच बहुमत मिळेल,” असा अंदाज अॅक्सिस माय इंडिया च्या आणि ‘टुडेज चाणक्य’ या दोन मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी समोर आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी ‘अॅक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांचे ‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध झाले आहेत. या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपलाच बहुमत दाखविण्यात आले आहे, तर आपला सत्ता गमावावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशात दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका ( Delhi Elections ) जवळ येऊन ठेपल्या असून, उद्या यासाठी मतदान होणार आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. हा उत्सव नीट साजरा व्हावा यासाठी अनेक यंत्रणांनी कंबर कसली असून, त्यांनी निवडणूक काळामध्ये रेवडी वाटपांना चाप लावण्याचे कार्य उत्तमपणे पार पाडले आहे.
Narendra Modi दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतील दहावीच्या बोर्डाचे निकाल सुधारण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ते दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना म्हणाले आहेत.
Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की
(AAP Manifesto Delhi Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मध्यमवर्गीय लोकांना आकर्षित करण्यासाठी १५ हमी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला धडा शिकवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पददेखील त्यांना मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उबाठा गटाची धडपड सुरू असल्याचे दिसते. मुळात या पदासाठी अपेक्षित संख्याबळ नसताना, असे धाडस करणे मूर्खपणाचेच. पण, देवेंद्र फडणवीस दया दाखवतील, या एकमेव आशेने उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात. फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्या उद्धवरावांनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली. ते देवेंद्र फडणवीस होते म्हणून
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेपासून एकत्र असाणार्या ‘इंडी’ आघाडीतील बेबनाव समोर आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये पुढे जाण्यास ‘इंडी’ आघाडीमधील इतर पक्ष तयार नाहीत. ‘आप’ने तर काँग्रेसशी ( Congress ) उभा दावा मांडला आहे. त्यामुळे काँग्रेसला देखील मुस्लीम मतांवर डोळा ठेवत, त्यांची वेगळी चूल मांडावी लागली आहे.
काँग्रेसचे ( Congress ) युवराज राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ’जितनी आबादी उतना हक’चा नारा दिला आहे. एके काळी जातीपातीविरोधात घोषणा देत लोकसभा निवडणूक लढवणार्या काँग्रेसची पुढची पिढी सत्तेसाठी जातींचे राजकरण करत आहे, यावरूनच काँग्रेसचे कोणतेही धोरण स्वार्थकेंद्रित असते, हे स्पष्ट होते. आज राहुल गांधी रोजगाराच्या मुद्द्याची शिडी करून जातीनिहाय आरक्षणाचा डाव मांडत आहेत. देशाच्या प्रगतीचे विभाजन करण्याचा हा डाव आहे. भारताच्या प्रगतीसाठी आसवे वाहणार्या काँग्रेसने, गेली कित्येक वर्षे देशातील शैक्षणिक धोरण बदलण्
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या तीन पक्षांमध्ये ही लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी भाजपने आपले संकल्पपत्राचे अनावरण केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये यशस्वी झालेली लाडकी बहिण योजना दिल्लीमध्ये भाजप राबवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्ली विधानसभा ( Delhi Assembly ) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सध्या राजधानीत गोठवणारे शीतवारे आणि पावसांच्या सरींतही राजकीय वातावरण मात्र तापलेलेच. दिल्लीचे रण आता पूर्णपणे पेटले आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘आप’ तिसर्यांदा राजधानीचे कारभारी होणार की जनता काँग्रेसला पुन्हा धुडकावून भाजपला संधी देणार, हे आता सुज्ञ दिल्लीकरांच्याच हाती...
(Prithviraj Chavan) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकांचा मौसम आला की ‘इंडी’ आघाडीच्या ( Indi Aghadi ) तोंडदेखल्या एकतेला आणखीन तडे जातात. तसाच अपेक्षित प्रकार आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही समोर आला असून, ‘आप’ आणि काँग्रेस हे पक्ष निवडणुका स्वतंत्र लढविणार आहेत. तसेच ‘एकला चलो रे’चे वारे बिहारमध्येही वाहू लागले आहेत. त्यामुळे ‘इंडी’ आघाडीचा पोपट अखेरीस मेला का, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच.
Congress विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आधीच काँग्रेसमध्ये गळती सुरू असताना ठाणे काँग्रेसमध्ये आजी - माजी पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात येत आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणास्तव ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांना पक्षातुन निलंबीत केले आहे.
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभेची घोषणा झाली असून पुढील महिन्याभरात दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. यंदाची दिल्लीच्या सत्तेची खरी लढाई ही गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेला आम आदमी पक्ष (आप) आणि भाजप यांच्यामध्येच आहे.
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी पत्रकारपरिषदेत केली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
(AAP) गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. मात्र, आप सरकार आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी ठेवला आहे.
(Chandrashekhar Bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी विधानसभा विजयाबद्दल बावनकुळेंचे अभिनंदन केले.
वर्ष २०२४ संपण्यास आता अवघ्या चार दिवसांचा कालावधी उरला आहे. हे वर्ष विशेषतः राजकीयदृष्ट्या धक्कादायक वर्ष म्हणून लक्षात राहील. लोकसभा निवडणुकीपासून विविध विधानसभा निवडणुकांपर्यंत जनतेने असा जनादेश ( Results ) दिला, ज्याचा अंदाज मोठ्या राजकीय विश्लेषकांनाही आला नाही.
नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) ( NDA ) घटकपक्षांसोबत उतरण्याची तयारी केली आहे. ही एकजूट आम आदमी पार्टी(आप)साठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
नवी दिल्ली : भाजपने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारविरोधात ‘आरोपपत्र’ जारी केले. भाजपने भ्रष्टाचार आणि यमुना प्रदूषणासह ( AQI ) अनेक मुद्द्यांवरून ‘आप’ला लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या तरतूदीच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेने शुक्रवारी ३९ सदस्यीय संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ( JPC Members ) स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्षपद माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार पी. पी. चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
One Nation One Election- एकाच वेळी होणार देशभर निवडणूका!
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावर खुश असलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही आता राहुल गांधी नकोसे झाले आहेत. ‘इंडी’ आघाडीचे ( Indi Aghadi ) नेतृत्व ममता बॅनर्जी यांना देण्यास आपली हरकत नसल्याचे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
कलाकारांचे व्हिडिओ किंवा त्यांचे चेहरे वापरुन ते मॉर्फ करत त्याचा गैरवापर करण्याचे अलिकडे प्रमाण फार वाढले आहे. अशात २०२५ मध्ये दिल्लीत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अभिनेते पंकज त्रिपाठी भाजप पक्षा विरोधात प्रचार करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा नसून आम आदमी पार्टीने पंकज यांच्या जाहिरातीमधील एक व्हिडिओ मॉर्फ करुन भाजप विरोधात पंकज बोलत आहेत असं दाखवण्यात आलं आहे.
मुंबई : 'मातोश्री' म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर ( Matoshree ) जमायचे. पण, बाळासाहेबांच्या पश्चात 'मातोश्री'चा रुतबा कमी झाला. 'मातोश्री'वरील राजकीय दरबाराची जागा 'किचन कॅबिनेट'ने घेतली. त्यांचेचे निर्णय पक्षात अंतिम ठरू लागले. संघटनात्मक पातळीवर कर्तृत्वशून्य असलेल्या शिलेदारांचा भरणा त्यात असल्यामुळे अधोगतीशिवाय काहीच हाती लागले नाही. विधानसभा निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण. परंतु, विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर
Harshavardhan Patil : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय विठोबा भरणे यांचा विजय झाला. कधी स्वतंत्र तर कधी काँग्रेसच्या सोबत जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव नेमका का झाला ? एकेकाळी मुख्यमंत्री पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा झाली होती, त्यांची आता पिछेहाट का झाली ? सत्तेची समीकरणं इंदापुर मध्ये नेमकी कशी बदलली ? हेच जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून.
मुंबई : सरकार स्थापन करताना गावाला यायचे नाही? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुकीत एवढे दौरे आणि प्रचार झाले. निवडणूक आम्ही महायुती मोठ्या मताधिक्यांनी जिंकलो, अशी माहिती राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, मी नेहमी सांगायचो की, जनता आम्हाला कामाची पावती देईल. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामे थांबवल
नवी दिल्ली : “दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू,” असे रविवार दि. १ डिसेंबर रोजी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दिल्लीतील त्यांनी ‘इंडी’ आघाडीला धक्का देत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आता येथील विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपविरोधी इंडी आघाडीमध्ये एकूण २६ पक्ष आहेत. आघाडीने दिल्लीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, सर्वच जागांवर भाज
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे भाजप महायुतीला मोठा फटका सहन करावा. या नॅरेटिव्हला ( Fake Narrative ) ‘ब्रेक’ लावण्याची जबाबदारी भाजपने आमदारअमित गोरखे यांच्यावर दिली. त्यांनी राज्यभरात ‘बहुजन संवाद यात्रा’ काढत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराची पोलखोल केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सजग होत महायुतीला कौल दिला. जनमत बदलण्यासाठी फायदेशीर ठरलेल्या या यात्रेविषयी आमदार अमित गोरखे यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात याआधीही मोठा भाऊ असलेल्या भाजपने १८ पैकी नऊ जागा जिंकून ठाणे ( Thane ) जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. २०१९ सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली असून, एकूण झालेल्या मतदानाच्या ५६ टक्क्यांपैकी २६ टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली आहेत. तर, जिल्ह्यात २० टक्के मते मिळवून शिवसेना दुसर्या स्थानी आहे.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ येऊन ठेपले आहे. पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाची तयारी सुरु आहे. यावेळी आम आदमी म्हणून दिल्लीच्या सत्तेवर जवळपास एक दशक बसून दिल्लीकरांचा अपेक्षाभंग करणार्या केजरीवालांना दिल्लीची जनता धडा शिकवणार की, त्यांच्या रेवडी वाटपाला भुलून पुन्हा एकदा आपल्या भविष्याचा खेळ मांडणार हे पाहणे ही महत्त्वाचे होणार आहे.
मुंबई : “भाजप महायुतीने ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर येत्या दि. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी ( Shapathvidhi ) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता भव्य सोहळा होईल,” अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी केली.
ठाणे : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची सद्दी असलेल्या ठाणे जिल्ह्यात यापूर्वीही भाजप मोठा भाऊ होता. २०१९ सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकून आताही भारतीय जनता पक्षाने १८ पैकी नऊ जागा जिंकत ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे भाजपचे ( BJP ) ठाणे करण्यासाठी विभागवार पदाधिकार्यांच्या बैठकांचा धडाका सुरू झाला आहे.
ठाणे : “जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhad ) यांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते आहे, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे,” असे खडेबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुनावले. बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये घेऊ. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा टोलाही त्यांनी आव्हाड यांना लगावला.
महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला कौल विरोधकांच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. हा निकाल स्विकारणार नसल्याची भूमिका काही जणांनी मांडली असून ईव्हीएम वर आपल्या अपयशाचे खापर फोडले जात आहे. अशातच आता यूट्यूबर अभिसार शर्मा खोट्या आकडेवारीचा आधार घेत जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत आहेत.
(Eknath Shinde) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने तब्बल २३२ जागांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीच्या या विजयानंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार दि. २७ नोव्हेंबर प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
'हे' आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही साहित्यिक