(Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्प
Read More
'भारतीय निवडणूक आयोग’ ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची एक अत्यंत विश्वासार्ह आणि संविधानिक संस्था आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगाची भूमिका केवळ निवडणुका पार पाडण्यापुरती मर्यादित नसून, देशाच्या लोकशाही मूल्यांची रक्षण करणारी ती आधारशिला आहे. मात्र, कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या संस्थेवर जे आरोप केले आहेत, ते अत्यंत घातक आहेत. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर ‘अपयशी आणि निष्क्रिय’ अशी टिप्पणी करताना जे राजकारण केले, ते नेमके विरोधकांची मानसिकता दर्शवते.
भारतातील लोकशाहीला ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ म्हणून गौरवले जाते. मात्र, सध्या काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकशाही संस्थांबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. लोकशाहीचा आत्मा असलेल्या संस्थांवर संशयाचे ढग निर्माण करणे, त्यांचा हेतुपुरस्सर अपमान करणे आणि त्यांची विश्वासार्हता धूसर करण्याचा प्रयत्न करणे, हीच काँग्रेसची नवी राजकीय नीती आहे
(Dinesh Waghmare) राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले.
संजय राऊत यांनी केवळ पक्षनेतृत्वाच्या आशीर्वादामुळे आजवर राज्यसभेचे सदस्यत्व भूषविले आहे. पण, आपल्याला मिळालेले हे पद म्हणजे आपल्या (नसलेल्या) कर्तृत्वाची पावती असल्याच्या थाटात संजय राऊत हे भंपक, बिनबुडाची आणि बदनामीकारक वक्तव्ये करीत सुटले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादामुळे सत्तेची मलई खाण्याची संधी मिळालेल्या या बोक्याने महापालिका निवडणूक लढविण्याचे धारिष्ट्य दाखविल्यास त्यांना जनतेत आपले खरे स्थान काय आहे, ते दिसून येईल. महापालिका निवडणुकीतही त्यांचे डिपॉझिटही जप्त होईल, अशा राऊत यांनी भाजप आणि मोदी
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी पत्रकारपरिषदेत केली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
(Election Commission of India) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदानाबाबतचे गैरसमज दूर केले आहेत. काँग्रेस पक्षाला दिलेल्या सविस्तर प्रतिसादात आयोगाने मतदारांची नोंदणी अथवा नावे हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
(Kirit Somaiya) सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
मुंबई : ( Municipal Commissioner ) मुंबई क्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकार्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सुटी देणे संबंधित नियोक्तांसाठी बंधनकारक राहील. या नियमांचे पालन न करणा़र्यां नियोक्तांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण
( ECI on BVA Symbol Whistle )राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता ४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे.
‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी!’ म्हणत दारोदारी फिरणार्या शरद पवार गटाला ‘केंद्रीय निवडणूक आयोगा’ने झटका दिला आहे. ‘तुतारी’ चिन्हासारखे दिसणारे ‘पिपाणी’ हे चिन्ह यादीतून हटवण्याची त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. आता हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार असल्यामुळे ‘तुतारी’ची ‘पिपाणी’ वाजणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्सची (एडीआर) याचिका तहकुब केली आहे. त्यावर आता उन्हाळी सुटीनंतर सुनावणी होईल. लोकसभेचे मतदान झाल्यानंतर ४८ तासांच्या आत केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी संकेतस्थळावर द्यावी, अशी एडीएआर या एनजीओची मागणी आहे.
काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली असतानाच निवडणूक काळात सरकारने मिशन काळा पैसा हाती घेतले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिनटेक पेमेंट कंपन्यांना व विना बँकिंग प्रणाली ऑपरेटरस (PSOs) ला लोकसभा निवडणुक काळात संशयास्पद व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,आँनलाईन व इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणालीत बारकाईने नजर राखत मतदानावर परिणाम करणारा व मतदारांना पैशाने भूलवणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
लोकसभा निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये १ हजार ६५६ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या माध्यमातून अवैध रोख रक्कम, दारू, ड्रग्जवर करडी नजर ठेवली जात असून, त्यांच्या दिमतीला २ हजार ९६ गस्ती पथके देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
निवडणूकीपूर्वीच सरकारने मनरेगा (MGNREGA) योजनेबद्दल मोठी घोषणा केली आहे.आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या मजूरीत वाढ करण्याचे सरकारने ठरवले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. सरकारने यावर नोटिफिकेशन काढत या निर्णयाला मंजूरी दिली आहे. यानुसार ३ ते १० टक्क्याने मनरेगा योजनेतील मजूरीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अखेर एसबीआयने (State Bank of India) ने निवडणूक आयोगाला इलेक्ट्रोल बाँडबद्दल विस्तारीत माहिती दिल्याचे न्यायालयात स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाला मेघा इंजिनिअरिंग व इन्फ्रास्ट्रक्चरने सर्वाधिक देणगी दिल्याचे यात स्पष्ट केले आहे. मेघा इंजिनिअरिंगने ६०० कोटींची या बाँड इन्स्ट्रुमेंटसच्या माध्यमातून देणगी दिली आहे तर क्विक सप्लायचेन मॅनेजमेंट (३७५ कोटी) वेदांता ग्रुप (२३६ कोटी) भारती ग्रुप (२३० कोटी) यांनी दिली आहे. तर काँग्रेसला सर्वाधिक देणगी वेदांता ग्रुप (१२५ कोटी) वेस्टर्न युपी पॉवर ट्रान्समिशन (११० क
भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार राव याची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी ही अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात येईल. दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांआधी अभिनेता राजकुमार राव याची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. यावेळी भारतीय निवडणूक आयोगातर्फे राजकुमार राववर खास जबाबदारी देखील सोपवण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यांतील मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष करून बस्तर आणि दंतेवाडा या नक्षलप्रभावित लोकसभा मतदारसंघात भयमुक्त वातावरणात मतदान झाल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघासह देशभरातील ९१ लोकसभा मतदारसंघात गुरुवारी पहिल्या टप्प्प्यातील
सोशल मीडियावर मतदानापूर्वी प्रचारासाठीचा राजकीय मजकूर प्रसारित करण्याची बंदी घालण्याची तयारी निवडणूक आयोग करीत आहे. निवडणुका केवळ सोशल मीडियामुळे जिंकता येत नाहीत, तर त्यासाठी आणखी काहीदेखील लागते.