खरेच ऋतूंची फुले होतात की फुलांचे ऋतू असतात? प्रश्न पडलाय का की ठराविक महिन्यामध्येच फुले का फुलतात? या सगळ्याचे कुतूहल शमवणारा हा लेख...
Read More
( comprehensive policy benefit local industries from thermal power plants Chief Minister Devendra Fadnavis ) औष्णिक केंद्रांमधील राखेबाबत २०१६ मध्ये शासनाने केलेल्या धोरणात २० टक्के राख स्थानिक उद्योगासाठी आणि ८० टक्के लिलाव असे प्रमाण होते. परंतु केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार १०० % लिलाव करावा लागतो. या राखेचा स्थानिक उद्योगांना लाभ होऊन उद्योग वाढीसाठी शासन सर्वंकष धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
भारतीय जंगलांमध्ये काही विदेशी झाडे, झुडूपे आणि वेलींनी आपली पाळेमुळे पसरली असतानाच यामध्ये अजून दोन प्रजातींची भर पडली आहे (exotic plant species). आफ्रिका खंडात आढळणाऱ्या 'हिबिस्कस सिडिफॉर्मिस' या औषधी वनस्पतीची आणि 'कॉन्व्होल्वुलस फॅरिनोसस' या वेलीची भारतामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे (exotic plant species). या प्रजाती अनुक्रमे गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामुळे भारतीय प्रजातींवर अजून दोन नव्या विदेशी प्रजातींचे आक्रमण झाले आहे. (exotic plant species)
पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण प्रकल्प अशा माध्यमातून सर्वस्वी ‘जीवनदायिनी’ ( Life Giver ) ठरलेल्या डॉ. विनिता आपटे यांच्याविषयी...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई मेट्रो३च्या विविध स्थानकांवर इन-सीटू मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत १०००हून अधिक झाडे लावली.
(Jalgaon) जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावातील कातळ सड्यावरून कोथिंबिरीच्या कुटुंबातील वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे (sindhudurg new plant species). पावसाळ्यामध्येच उगवणार्या या प्रजातीचे नामकरण ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावे ‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ असे करण्यात आले आहे (sindhudurg new plant species). या प्रजातीच्या शोधामुळे जगात केवळ आंबोली-चौकुळ या जैवसंपन्न प्रदेशामध्येच सापडणार्या प्रजातींची संख्या २३ झाली आहे. (sindhudurg new plant species)
देशभरातील ३६ कोळसा आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून एकूण ६२,१९४ मेगावॅट क्षमतेसह, एनटीपीसी लिमिटेडने कोळशासोबत बायोमास मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उद्देशाने, एनटीपीसीने एक निवेदन (ईओआय) जारी केले आहे, ज्याद्वारे त्यांचे किंवा इतर भागीदारांद्वारे त्याच्या केंद्रांसमोर निर्माण होणाऱ्या पॅलेट प्लांट्ससाठी बायोमास पुरवठादारांना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी एनटीपीसी लिमिटेडच
(ReNew power plant) राज्यातील प्रकल्प गुजरातला आणि राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेस आणि मविआ सातत्याने करत आहे. नुकतेच काँग्रेसने आमदार आणि विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘रिन्यू पॉवर प्लांट’ महाराष्ट्रातून गुजरातला गेला, अशी माहिती दिली. मात्र या अपप्रचाराची खुद्द कंपनीनेच निवेदन काढत पोलखोल केली. इतकेच नाही, तर महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवणार असल्याची माहितीही दिली. याच निवेदनाचा हवाला देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
पुणे जिल्ह्यातील लोणावळास्थित भुशी धरण परिसरातून १९१८ साली शोधण्यात आलेली ‘लिम्नोफिला लिम्नोफिलॉइड्स’ ही पाणवनस्पतीची प्रजात नामशेष झाली आहे (Limnophila limnophiloides plant species endemic to bhushi dam). ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) या संदर्भातील घोषणा केली आहे. ‘आययूसीएन’ने आपल्या ‘लाल यादी’त या प्रजातीला ‘नामशेष’ म्हणून नमूद केले आहे. या प्रजातीच्या शोधानंतर गेल्या कित्येक वर्षांत या प्रजातीचा मागमूस न लागल्याने आणि भुशी धरण क्षेत्रात झालेल्या पर्यटनवाढीमुळे जगात केवळ या परिसर
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरुन कंदीलपुष्प म्हणजेच 'सेरोपेजिया' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of ceropegia). या प्रजातीचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे करण्यात आले आहे (new species of ceropegia). वेलवर्गीय असणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या केवळ चार वेल संशोधकांना विशालगडावर आढळून आल्या आहेत. (new species of ceropegia)
टाटा इलेक्ट्रॉनिकसने देशात चिप उत्पादनात मोठी गुंतवणूक केली आहे. आसाम राज्यात टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट या अंतर्गत आसाममधील जागीरोड येथे प्लांट उभारणार असून याचे भूमीपूजन सोहळ्याकरिता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकणातील पुष्पप्रजातींची राणी म्हणून ओळखळी जाणारी 'एकदांडी' म्हणजेच 'दिपकाडी कोंकणेन्स' (Dipcadi concanense) ही प्रजात प्रथमच दापोली तालुक्यात बहरली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही निवडक सड्यांवर सापडणाऱ्या या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रज्ञांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते (Dipcadi concanense). या रोपण यशस्वी झाले असून या 'संकटग्रस्त' प्रजातीच्या संवर्धनाला हातभार लागला आहे. (Dipcadi concanense)
टीजेएसबी सहकारी बँक अधिकारी व कर्मचारी संघ सलंग्न भारतीय मजदूर संघ ही संघटना दरवर्षी सामाजिक कर्तव्य म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम त्यांच्या पाच राज्यांतील विविध विभागामध्ये राबवत असते. ठाणे विभागाचा वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (ता.१४ जुलै) पानखंडा, घोडबंदर रोड, येथे संपन्न झाला.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ‘भाबरी’ (bhabari) या दुर्गम गावातील गावकर्यांनी अधिवास संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांना जाणवणार्या समस्यांची घेतलेली दखल...(bhabari)
झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असतानाच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील या चित्रपटाचा ट्रेलर बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यातील माउली थिएटर येथे लाँच करण्यात आला. याप्रसंगी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, पीएस आय राजेश पाटील, दिलीप गीते, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होते. १००० वृक्षांची लागवडही याप्रसंगी उपस्थित मंडळींच्या हस्ते करण्यात आली. २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
नुकतेच मुंबई शहराला सलग तिसर्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने मुंबई शहरातील वृक्षगणना, वृक्षांचे प्रकार आणि एकूणच या महानगराला लाभलेल्या या हरित कवचाच्या संरक्षण आणि संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
राज्यातील रेकॉर्डब्रेक उन्हाच्या झळांनी केवळ तापमानातच लक्षणीय वाढ झालेली नाही, तर उष्माघाताच्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तेव्हा, ऋतुनुसार जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, उन्हाळ्यात केवळ द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याबरोबरच अन्य पथ्येही पाळणे तितकेच गरजेचे. तेव्हा एकूणच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
पुणे मनपा शाळा, पुणे विद्यार्थी गृह आणि अभिनव कला महाविद्यालय असा प्रकाश ढगे यांचा शैक्षणिक प्रवास. निसर्गाशी घट्ट मैत्री टिकवणार्या प्रकाश यांची एकूणच वाटचाल प्रेरक आणि उत्सावर्धक आहे.
वेलस्पून एंटरप्राईज ४१२४ कोटी रुपयांचा पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा महाराष्ट्रात उभा करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मुंबईतील भांडूप येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.'
राम मंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जा निर्मितीवर सरकारने विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट केले होते. वाढत्या ऊर्जेची मागणी व गरज लक्षात घेता सोलार रुफटॉप योजनेवर आपले लक्ष केंद्रित केले होते. यासाठी सरकारने ' प्रधानमंत्री सर्वोदय योजना ' सुरू करत १ कोटी कुटुंबांना रुफटॉप सौर उर्जा देण्याचे ठरवले आहे. या प्रयत्नांना जोड देण्यासाठी एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) ने राजस्थानात ७० मेगावॉटचा पहिलावहिला सौर उर्जा निर्मितीसाठी कंबर कसली आहे.
टाटा पॉवरने आपल्या विस्तारीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जलपूरा खुरजा पॉवर प्रकल्प हा टाटा पॉवर कंपनी खरेदी करणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. यासंबंधी जलपूरा खुरजा पॉवर ट्रान्समिशन प्रकल्प सुमारे ८३८ कोटी रूपयांनी खरेदी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी टाटा पॉवरने शुक्रवारी आपल्याला आर ई सी पॉवर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीडून लेटर ऑफ इंटेट ( एल ओ एल ) पत्र मिळाल्याचे जाहीर केले होते. टाटा पॉवरकडून हा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास स्पेशल परपज व्हेईकल ( एस पी व्ह
'इंटरनॅशनल यूनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'च्या (आययूसीएन) (iucn red list plant) लाल यादीत महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनस्पतीच्या तीन प्रजातींना धोकाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. निसुर्डीच्या कुळातील दोन प्रजातींना 'संकटग्रस्त' (एनडेंजर्ड) आणि कोच कुळातील एका प्रजातीला 'नष्टप्राय' (क्रिट्रीकली एनडेंजर्ड) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. (iucn red list plant) यामुळे सह्याद्रीत अगदी मोजक्याच ठिकाणी सापडणाऱ्या या प्रजातींच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. (iucn red list plant)
केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा रूपांतरणासाठी छोट्या अणुभट्ट्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. बुधवारी संसदेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अणुऊर्जामंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, अणुऊर्जा हा वीज निर्मितीसाठी सर्वात आशादायक स्वच्छ ऊर्जा पर्यायांपैकी एक मानला जातो. आगामी काळात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर पडत आहे.
मुंबई महानगपालिकेत कोविड काळात झालेल्या ऑक्सीजन घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या एका निकटवर्तीयाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये रोमीन छेडा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या असोसिएट्सविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
आज पुन्हा एकदा कोविड काळातील मुंबई महापालिकेकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याची बातमी आली. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. आणि उबाठा गटाचे आदित्य ठाकरेंशी संबधित एका व्यक्तीवर कोविड घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने धाड टाकली.आणि आता पुढचं नाव कोणाचं? कोण आहे कोविड घोटाळ्यातील पुढचा आरोपी? असे बरेच प्रश्न निर्माण झाले.
भारतातील पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात आला आहे. पहिल्या स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पाने (केएपीपी) वीज निर्मिती सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदनही केले आहे.
जपान सध्या त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पातील किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडण्याच्या तयारीत आहे, ज्याला खुद्द जपानी नागरिकांकडून जोरदार विरोध सुरू झाला. त्यानिमित्ताने जपानकडे हे किरणोत्सारी पाणी कुठून आले आणि ते समुद्रात का सोडले जाणार आहे, हे जाणून घेऊया.
केवळ देवदर्शनाला शुचिभूर्त होऊन चाललेल्या ललनेचे हे वर्णन नाही, तर शांताबाई शेळके यांनी चक्क बरसणार्या त्यातही श्रावणातल्या सरीचे वर्णन व सरीच्या धरतीवर कोसळणार्या नृत्य प्रकाराला चक्क ‘लावणी’ नाव देऊन ‘लावणी श्रावणाची’ या गाण्यात चक्क लावणी सादर केली.
कल्याणच्या टिटवाळा - आंबिवली रिंगरोडवर राबवण्यात आलेल्या ग्रीन स्माईल उपक्रमाच्या माध्यमातून कल्याणकरांनी नविन इतिहास घडवला. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच, कडोंमपा आणि आयुष हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीसाठी पहिल्यांदाच शहरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य नागरिक एकत्र आले. रिंगरोडच्या टिटवाळा, आंबिवली भागात रविवारी सकाळी ग्रीन स्माईल उपक्रम राबवण्यात आला.
पर्यावरण आणि अध्यात्माची सांगड घालून जैवविविधता, वनस्पती वर्गीकरणशास्त्र, परागीभवन शास्त्र, औषधी वनस्पती यांच्याविषयी ‘बायोस्फियर्स संस्थे’मार्फत काम करणारे डॉ. सचिन पुणेकर यांच्याविषयी...
पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.वनपरिक्षेत्र कार्यालय, शिरोली खेड येथे वनरक्षक निवासस्थान, वन्यजीव रुग्णवाहिका लोकार्पण, अमृतवन निर्मित रोपवन वृक्ष लागवड आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झालेल्या व्यक्तींच्या वारसास अर्थसहाय्य प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसरंक्षक अमोल सातपुते, सहायक वनसरंक्षक संदेश पाटील, अमित भिसे, वनप
निलगिरीतील ‘किस्टोन फाऊंडेशन’च्या प्रमुख डॉ. अनिता वर्गीस यांच्या पुढाकाराने ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप’ (थॠझडॠ) याला ‘आययुसीएन’ची मान्यता मिळाली. जवळपास 60 शास्त्रज्ञ, स्थानिक वनस्पतींच्या लागवडीचे तज्ज्ञ, स्थानिक ज्ञानाचे अभ्यासक आणि दहा संस्था याच्या सदस्य आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकटग्रस्त वनस्पतींना जीवनदान देणार्या अशा या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षलागवडीचा पर्याय हा कधीही फायदेशीर. परंतु, मुंबईसारख्या फारसे मोकळे भूखंड नसलेल्या शहरात वृक्षलागवडीलाही मर्यादा येतात. त्यावरच उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मियावाकी वनांच्या उभारणीला वेग दिला. तेव्हा, या मियावाकी वनांचे फायदे व मुंबईतील या वनांची सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख...
‘स्वप्नपूर्ती फाऊंडेशन’च्या माध्यमातून वनवासी पाडे, खेड्यातील ५२ हजार विद्यार्थ्यांना वैदिक गणित, करिअर मार्गदर्शन करणार्या सचिन काकडे-पाटील याच्या ‘स्वप्नपूर्ती’चा हा प्रवास...
अणुऊर्जा प्रकल्प स्थापत्य अभियांत्रिकी विशेषतज्ज्ञ म्हणून डोंबिवलीचे माधव हरी जोशी यांची ख्याती. अणुऊर्जा, रसायन आणि कृषी क्षेत्रांमध्ये त्यांचे संशोधनकार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्याविषयी...
रवी चौधरीने छत्रपती संभाजीनगरसह देशातील अनेक शहरांत चार लाखांहून अधिक वृक्षांची केवळ लागवडच केली नाही, तर ती जगवलीसुद्धा. अशा या ‘ट्री मॅन’ रवी चौधरीच्या हरित स्वप्नपूर्तीचा हा प्रवास...
जमिनीवरील सर्वांत मोठा सस्तन प्राणी म्हणून हत्तीची ओळख. जगातील सात खंडांपैकी दक्षिण आफ्रिका या खंडात या हत्तींचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो. दक्षिण आफ्रिकेतील जंगल हे जगातील दुसरे मोठे वर्षावन आहे. त्याचे संवर्धन करायचे असेल, तर हत्तींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे अलीकडेच काही अहवालांतून स्पष्ट झाले आहे. तेव्हा, यानिमित्ताने या अहवालाच्या खोलात जाण्याआधी हत्ती आणि त्यांच्या अधिवासाविषयी थोडी माहिती अधिक जाणून घेऊया.
विनम्र सेवाभावी स्वभाव आणि स्वकष्टाच्या बळावर आज सटाण्याचे रामदास पाटील यांनी स्वकर्तृत्वाने यशाचे विश्व उभे केले आहे. त्यांच्या यशोशिखराचा घेतलेला आढावा...
जुलै २०१९ पासून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा लीलया सांभाळली. आता फडणवीस-शिंदे सरकारमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने अभाविप ते भाजप आणि आता पुन्हा कॅबिनेट मंत्री असा चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा हा लेख...
भारतात वनस्पतींचे आभासी हर्बेरियम (माहिती सहित साठवलेले विविध वनस्पतींच्या पानांचे नमुने) या वर्षी जुलै महिन्यात लॉन्चलौंच करण्यात आले. या संग्रहात सुमारे एक लाख फोटोंचा डेटाबेस आहे. फक्त भारतातच नाही, तर जग भारत या हर्बेरियमचा अभ्यास होत आहे. आता पर्यंत ५५ देशातून तब्बल दोन लाख लोकांनी ही वेबसाईट वापरली आहे. भारतातील एकूण एक वनस्पतींच्या नमुन्यांच्या छायाचित्रासहित माहितीचा संग्रह या व्हर्च्युअल हर्बेरियम'द्वारे केला जात आहे.
देशात काही लोक नकारात्मकतेच्या गर्तेत पूर्णपणे बुडला आहेत. सरकारविरोधात सातत्याने अपप्रचार करूनही जनता विश्वास ठेवण्यास तयार नसल्याने ते आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत.
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून वृक्ष लागवडीचा शुभारंभ
आंतरराष्ट्रीय वृक्षारोपण दिनाच्या निमित्ताने 'स्पीहा' या संस्थेने चार खंडातील २००हून अधिक ठिकाणी ५५ हजारहून अधिक रोपे लावून सर्वात मोठी वृक्षारोपण मोहीम राबवली आहे. स्पीहा या संस्थेने २००६ मध्ये भारतातील आग्रा येथून आपले कार्य सुरू केले. आणि आज जगभरात २०० हून अधिक ठिकाणी शाखा आहेत.पर्यावरण आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्दिष्टांचा आणि वचनबद्धतेचा एक भाग म्हणून स्थापना झाल्यापासून वार्षिक वृक्षारोपण करत आहे.
दि.2 जून रोजी आमच्या सांदीपनी प्रभात शाखेचा ‘हिंदू साम्राज्य दिना’चा उत्सव सकाळी देवीच्या मंदिरात घेण्याचे ठरले. मी आमच्या शाखा कार्यवाह/मुख्यशिक्षकांना सुचवले की, आपला उत्सव संपला की, लगेचच आपण जयप्रकाश नगरात वृक्षारोपण करुया. रा. स्व. संघाने 2019 पासून गतिविधीमध्ये पर्यावरण हा विषय अंतर्भूत केला. त्यासंदर्भातले काही...
मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. आता राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी बरसतील. पावसाळा म्हणजे सजीव सृष्टीत नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू. निसर्गाचे चक्र पुनरुज्जीवित करणारा हा पावसाळा माळरानावरदेखील विविध अधिवासांना आधार ठरतो. परंतु, गेल्या काही वर्षांत याच माळरानांवर पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले गेले. माळरान ही एक वेगळी परिसंस्था असून त्यावर अनेक जीव अवलंबून आहेत. हे वृक्षारोपण कितपत योग्य आहे, याचा आढावा घेणारा हा लेख...
नदीकिनारी वृक्षारोपण करून गेल्या १०० दिवसांपासून सुरु असलेल्या वालधुनी नदी आणि संवर्धन अभियानाची सांगता करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील पठरांवरून एका प्रदेशनिष्ठ वनस्पती प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'लेपिडागेथिस महाकस्सपेयई' ही 'अक्यांथेसी' कुळातील वनस्पती शोधण्यात आली आहे. याबाबतचा शोधनिबंध 'नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी' ह्या जागतिक जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला. यातून जैवविविधतेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.