Umar Khalid दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या दंगलीच्या कटाशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या कड़कड़डूमा न्यायालयाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला एकूण ७ दिवसांसाठी अंतरिम जामीन देण्यात आला आहे. खालिद .याला त्याच्या चुलत भावाच्या निकाहाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने हा जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले गेले आहे.
Read More
ISIS मुंबई येथे २००२- ०३ च्या साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणारा मास्टरमाईंड साकिब नाचनने ISIS ला दहशतवादी संघटना म्हणू नका अशी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आयएसआयचे भारताचे प्रमुख असलेले नाचन यांनी इस्लामिक स्टेट आणि इतर गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारी सरकारी अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या शेवटच्या टप्प्यासाठी दि. १ जून रोजी मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मतदान आजच्या टप्प्यात नोंदवले गेले आहे. तर बिहार मात्र पिछाडीवर आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु आहे. टीएमसी कार्यकर्त्यांकडून मतदारांना धमकावण्याच्या आणि बॉम्बस्फोटाच्या घडवल्याच्या घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालमधील जयनगर लोकसभा जागेवर मतदानाजदरम्यान टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या दगडफेकी.त एएनआयच्या पत्रकाराला गंभीर दुखापत झाली. पत्
लोकसभा निवडणुकीचा २०२४ चा तिसरा टप्पा पार पडला आहे. याशिवाय निवडणुकीचे ४ टप्पे बाकी आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर येथील भाजप नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती काही वृत्तसंस्थानी दिली आहे. भाजपच्या या नेत्याकडे पक्षाचे पंचायत प्रमुख पद आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी सहा बॉम्ब पेरण्यात आले होते. यातील २ बॉम्बचे स्फोट झाले. दि. १० मे २०२४ रोजी मध्यरात्री ४ सक्रीय बॉम्ब जप्त करण्यात आले आणि ते निकामी करण्यात यश आले आहे.
२०१९ मध्ये, देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये थंडीचे वातावरण होते. जेव्हा जहाँजेब सामी आपली पत्नी हिना बशीर बेग हिच्यासह जम्मू काश्मीरमधून दिल्लीत स्थलांतरित झाला. मोदी सरकारने कलम ३७० कलम हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक फुटीरतावादी नेते नजरकैदेत असताना त्याच वर्षी दि. ६ ऑक्टोबर रोजी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर दोघेही दिल्लीला रवाना झाले. जहाँजेब सामी एका ब्रिटीश कंपनीत काम करत होता.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३५ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी भाजपला रोखण्यासाठी, ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला घडवून आणला का, हा प्रश्न आहे. हिंसाचाराला बळ देणारी, ममता बॅनर्जी यांची तालिबानी प्रवृत्तीच यामागे आहे. संदेशखाली प्रकरणातील शाहजहान शेख याला पाठीशी घालणार्या, ममता बॅनर्जी याच होत्या. आता बॉम्बस्फोटातील आरोपींची पाठराखण त्या करत असल्याचे दिसून येते.
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याची माहिती नितेश राणे यांनी विधानसभेत मांडल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.
छत्तीसगडमध्ये मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. मात्र, इथे मतदानाची सुरुवातच बॉम्बस्फोटाने झाली आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी ३ आयईडी स्फोट केले आहेत. यामध्ये सुरक्षा दलाचे तीन जवान आणि २ मतदान कर्मचारी जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मणिपूर पोलिसांच्या मदतीने मोहम्मद इस्लाउद्दीन खानला अटक केली. २१ जून २०२३ रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता भागात कार बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
मुंबई, पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी अज्ञातांकडून देण्यात आली होती. मात्र या अज्ञातास अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह, अंधेरी, कुर्ला भागात उद्या २४ जून २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली होती. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505 (1) (बी), 505 (2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी टेलिग्राम चॅनेलवरील अमाक न्यूज एजन्सीच्या गटाने सांगितले की, शनिवारी जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांवर तीन आणि रविवारीए एक हल्ला झाला. या सर्व घटनांमध्ये ३५ हून अधिक तालिबान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.
मालेगाव स्फोटाबाबत माहिती नसल्याचे स्पष्टीकरण
पाकिस्तानातील लाहोर शहर बुधवारी शक्तिशाली स्फोटाने हादरले. येथील प्रसिद्ध सुफी दर्ग्याबाहेर स्फोट झाला. त्यात किमान नऊ जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले.
आपल्याकडे छद्मी पुरोगामी आपल्या सेक्युलरिझमचा खोटा बुरखा फाटू नये म्हणून ज्या प्रकारचे तर्क देत असतात, त्याच्या चिंध्या करणारी ही कृत्ये आहेत. श्रीलंकेत झालेला हा हल्ला काही पहिला नव्हे आणि शेवटचा नाही. उलट याला जोपर्यंत कठोर उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत अशी कृत्ये करणार्यांचे मनोबल वाढतच राहणार आहे. श्रीलंका त्याचा मुकाबला कसा करते ते पाहावे लागेल.
आत्मघाती बॉम्ब हल्ल्याने हादरलेल्या श्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने साऱ्यांचा थरकाप उडाला आहे. राजधानी कोलंबोपासून ४० किमी दूर असलेल्या पुगोडाजवळ स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली आहे.
बॉम्बस्फोटांमुळे होणारे मृत्यू, अशांतता यामुळे लोकांची ऑनलाईन शॉपिंगवर झुंबड वाढत आहे