भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Read More
राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. या कामात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार कर्मच
विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधीत होत आहेत. सुमारे ३० हेक्टर जागा संपादन करावयाची असून यामध्ये जे बाधीत होतील त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. ७ मे रोजी दिले.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून आपण सारे याच क्षणाची वाट पाहत होतो. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार देण्याऐवजी, त्यांना जो मोबदला अपेक्षित आहे, त्यासह आपण आपल्या मागण्या सरकारकडे सात दिवसांत मांडण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते म्हणाले, कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सरकार शेतकऱ्यांवर करणार नाही. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना तसेच, भागातील तरुणांचे हाताला काम मिळेल."
राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील नागरिकांना ही योजना दिलासा देणारी ठरणार आहे. यापुढे एकाच जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार असल्यामुळे वेळ आणि कागदपत्रांचा त्रास टळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवून, त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२ मोहीम – टप्पा २’ सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
जातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असल्याने प्रदेश भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी केली.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
हिंगणा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा दणका बसला आहे. शनिवार, २६ एप्रिल रोजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी घेतला.
महाड नवेघर येथील २५ एकर जमीनीपैकी ३ गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाजमंदिर आणि विद्यार्थी वस्तीगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे म्हाडामार्फत दोन हजार ५०० आणि महादुला येथे एनएमआरडीए मार्फत एक हजार २०० घरकुलांच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. या प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता आणि अन्य मागण्यांवर आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
Chandrashekhar Bawankule पुणे जिल्ह्यातील भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराच्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांनंतर भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्या विरोधात पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केली.
विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत इंटरनॅशनल लीडर आहेत. त्यामुळे त्यांनाच प्रश्न विचारू द्या आणि त्यांनाच उत्तरे देऊ द्या, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. गुरुवार, १० एप्रिल रोजी त्यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर ग्रामीणमधील तब्बल ९ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आणि भाजप नेते राजू पारवे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला.
Chandrashekhar Bawankule राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या जमिनींच्या मालकी हक्कावरून मोठा गोंधळ आहे. याबाबत एक समिती नेमण्यात आली असून त्यानंतर देवस्थान इनाम जमिनींबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधान परिषदेत दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील अनेक तृतीयपंथींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. बुधवार, १९ मार्च रोजी मुंबईत तृतीयपंथी समाजातील डॉ. सान्वी जेठवानी यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Chandrashekhar Bawankule राज्याचे महसूल मंत्री आणि व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे जनसंवाद कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदने सादर केली. विशेष म्हणजे दररोज निर्माण होणाऱ्या मुलभूत समस्यासह रोजगार आणि वैयक्तिक कामासंबंधी निवेदन देण्यात आली. संबंधित सर्व निवेदनाची दाखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
Chandrashekhar Bawankule शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा केल्यास, हस्तांतरणास निर्बंध या अटीवर ही जमीन त्यांना परत करण्यात येईल. याचा लाभ राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Chandrashekhar Bawankule जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भितीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. एआय, आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा, दहशतीत असलेल्या गावांना कुंपण, याबाबत प्रशासनातर्फे लवकरच योग्य ती पावले उचलून शक्य ती कामे लवकर सुरु केली जातील, या शब्दात राज्याचे महसूल मंत्री तथा नागपुर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची माहिती पुढे आली असून या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने त्यांची भेट घेतली असल्याचे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात योग्य समन्वय राहावा या उद्देशाने भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्य सरकारमधील मंत्र्यांची जिल्हा संपर्क मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी ३३ टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ( Mahad's Super Specialty Hospital ) उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार
तुमची आणि तुमच्या नेत्यांची वृत्तीच रावणासारखी असुरी आहे, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केला आहे. राऊतांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
नागपूर : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांची नागपूर व अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने १८ जानेवारी रोजी सायंकाळी शासन निर्णय जारी केला. नागपूर व अमरावतीचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
Chandrashekhar Bawankule प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली स्वामीत्व योजना सर्वसामान्याला त्याच्या मालकीच्या जागेचे कायदेशीर सामीत्व मिळावे आणि ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलविणारी ही योजना आहे. या योजनेमुळे कायदेशीर मालकत्व प्राप्त होणार आहे. बँकेचे कर्ज घेण्यासह विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मुंबई : “सोसायटी आणि विकासक यांच्यातील वादामध्ये समजुतीच्या करारनाम्याचा दस्त सात दिवसांत तक्रारीसोबत सहजिल्हा निबंधकांकडे प्राप्त न झाल्यास उपलब्ध छायांकित प्रतीच्या सत्यतेबाबत विकासकाला काही म्हणायचे नाही, असे समजून छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्कनिश्चिती आणि आवश्यकतेनुसार वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात येईल,” असा निर्णय महसूलमंत्री ( Revenue Minister ) चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी घेतला आहे.
मुंबई : “यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहिवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत आहे. त्यामुळे वाहन प्रकारानुसार शेतजमीन वहिवाट रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता यावा, यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्या,” अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी दिल्या.
उबाठा गटाचे पुण्यातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबातची माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
उबाठा गटाच्या पुण्यातील पाच नगरसेवकांसह विभागप्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षात मोठे खिंडार पडले आहे. मंगळवार, ७ जानेवारी रोजी महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विकासाची गती थोडी धीमी राहीली तरी भारतच जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असा विश्वास टाटा समुहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे.
मुबई : राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी आणि गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमतेसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आता गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी हे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे असायचे, परंतु वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
येत्या ५ वर्षात टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांकडून ५ लाख रोजगार निर्माण केले जातील असा विश्वास टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. सरत्या २०२४ या वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्रशेखर यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे
जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे कर्तव्यावर असताना एका रस्ते अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला. या दोन्ही जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जवानांना श्रद्धांजली वाहिली.
नागपूर : (Chandrashekhar Bawankule ) देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात येत्या २७ डिसेंबर रोजी होत आहे. राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे.
नागपूर : अकोला विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवणाऱ्या आमदार रणधीर सावरकर ( Randhir Sawarkar ) यांची भाजपच्या मुख्य प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे.
( Syria ) सिरीयातील परिस्थितीबद्दल इस्त्रायली पत्रकारांना काय वाटतं? लेव अरान यांच्याशी गप्पा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक स्वाती तोरसेकर, चंद्रशेखर नेने आणि अनय जोगळेकर यांचे परखड विश्लेषण
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी, १२ जानेवारी २०२५ रोजी प्रदेश अधिवेशन ( BJP Adhiveshan ) होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या वेळी केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : मारकडवाडी येथे ‘इव्हीएम’विरोधी आंदोलन कोणी घडवून आणले, हे जगजाहीर आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी या गावाला भेट देत विषय चिघळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक मतदार अत्यंत जागरूक असल्यामुळे त्यांची डाळ शिजली नाही. भाड्याच्या कार्यकर्त्यांना जमवून घेतलेली सभा त्यांना आटोपावी लागली. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, ज्या थापा मारून हे आंदोलन उभे करण्यात आले, त्याचा बुरखा फाटला आहे.
Swatantryaveer Savarkar कर्नाटकात काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणार असल्याचे ट्विट महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेअर केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अहवेलना करण्याचा डाव काँग्रेसचा असल्याचे ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या ६ आमदारांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत निवडून आल्याने त्यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर मिळण्याचा क्षण नजीक आला असून दि. ४ डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे. त्याआधी आझाद मैदानावर ‘महा’शपथविधीची ( Shapathvidhi ) ‘मेगा’ तयारी सुरू करण्यात आली आहे. दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होईल.
खानिवडे : “वसई-विरार जिल्ह्यात राजकीय परिवर्तन घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. समाजाला कृतिशील व लोकाभिमुख कारभाराचे परिवर्तन द्यावयाचे असून, त्या दृष्टिकोनातून सातत्यपूर्वक प्रयत्न सुरूच राहतील,” अशी ग्वाही भाजपचे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील ( Mahendra Patil ) यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीतील दणदणीत विजयानंतर अखेर महायूती सरकारच्या अधिकृत शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत शपथविधीच्या तारखेची घोषणा केली.
मुंबई : महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने मते दिली आहेत. महाविकास आघाडीकडून ( MVA ) ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहे. जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० वॉल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
नागपूर : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मजबूत आणि अभेद्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी जी भूमिका घेतली, ती राज्याच्या चौदा कोटी जनतेसाठी एक मोठी भूमिका असून आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व जो निर्णय करेल तो सर्वांनाच मान्य असेल, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आमची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणसाठी आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक, खातेदार, संस्था पदाधिकारी आणि सभासदांसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. डिजिटल बँकिंग क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मुंबई बँक सज्ज झाली आहे. ग्राहक व सभासदांसाठी मुंबई बँकेने ( Mumbai Bank ) मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध केली आहे. या बँकिंग सेवेचा उदघाटन सोहळा उद्या गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फोर्ट येथील पद्मश्री वसंतदादा पाटील सभागृह येथे होणार असल्याची माहिती
मुंबई : “विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात ‘पक्ष सदस्यता ( Member ) नोंदणी अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानात १ कोटी, ५१ लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे,” अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजप प्रदेश कार्यालयात रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी आ. जयकुमार रावल, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदे